कुंडलिनी शक्ती गुद्व्दाराच्या वरती शिवलिंगाला साडेतीन वेटोळे मारुन सुप्तअवस्थेत असते. कुंडलिनी सुषुश्मना नाडीवर चालते. कुंडलिनी शक्ती ही सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय जागृत होत नाही. कुंडलिनी जागरणामध्ये सदगुरुनी दिलेले नाम व नामस्मरण महत्त्वाचे आहे. तसेच सात्विक अन्नग्रहण करणे आवश्यक आहे. नामस्मरणातून मनोमय कोष ताणला जातो. तेव्हा मनुष्यदेहात धारणा तयार होते. सदगुरु अनुग्रहातून अन्नमय कोषातून ,मनोमय कोषातून त्यापुढे प्राणमय कोषातून पुढे ज्ञानमय कोषातून देहाचं ज्ञान होते. त्यातून जो आनंद मिळतो. त्याला ब्रम्हानंद म्हणतात. ज्योर्तिलिंगावर , शिवलिंगावर जो शेषनाग बघता तीच कुंडलिनी शक्ती असते. तिलाच काळभैरव, सदगुरु असं म्हटलं जात.
कुंडलिनी सुषुश्मना नाडी मध्ये प्रवेश करते तेव्हा साधकाला शिवकलेची प्राप्ती होते. डाकीणी शक्तीला ती जागृत करते. तिथे गणपती बाप्पा विराजमान असतो. मुलाधार चक्र भेदल्यानंतर ती स्वाधिष्ठान चक्राला भेदते. साधकाच्या देहात स्वा+अधिष्ठान जागृत करते. स्व म्हणजे द-त अधिष्ठान म्हणजे अंतरातच संन्यासाची सुरुवात करते. इथे साधकाला सर्व सुखे प्राप्तकरण्याची ताकद मिळते माणिपुरचक्र जे नाभीमध्ये असते. कुंडलिनीशक्ती जेव्हा उर्ध्वमुखी सूर्य अमृत ओकते मणिपूर चक्राची देवता शिव आहे. ते काळभैरवाचं स्थान आहे आक्रमक देवता आहे. कुंडलिनी शक्तीला नाभीपासून छातीपर्यंत येते व पुढे शिवलिंगात प्रवेश करते. वासना इथे योग्याला मोक्ष प्राप्ती होते. तो मोह – माया पासून दूर जातो. तो फक्तमहाराजांचे ऐकतो. कुंडलिनी विशुध्द् चक्राला भेदून जे कंठात आहे ती आग्याचक्रावर स्थिर होते. कुंडलिनी स्थिर झाल्यावर साधक त्रिकाल ज्ञानी त्याला अष्ट्सिद्धी प्राप्त होतात.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
0 Comments