महाकालेश्वर भस्म आरती ( Mahakaleshwar Bhasma Aarti ) आध्यात्मिक महत्व.


बारा ज्योतिलिंगांपैकी महाकालेश्वर ज्योतिलिंग मृत्युलोकातील कलियुगाच्या अंतिम पर्वातील निर्णायक भुमिका बजावणारे शिवतत्व आहे. खंड प्रलयकारक काळभैरव व महाप्रलयकारक महाकाल ही नियतीची विनाशकारक अविनाशी परमतत्वे आहेत. उज्जैन हे पृथ्वीचे नाभी केंद्र असुन या स्थानातुन आकाशस्थीत तारकेश्वर, मृत्युलोक स्थित महाकालेश्वर आणि पाताळस्थित काशीविश्वेश्वर एकसुत्री आहेत.


बारा ज्योतिलिंगांपैकी महाकालेश्वर ज्योतिलिंग मृत्युलोकातील कलियुगाच्या अंतिम पर्वातील निर्णायक भुमिका बजावणारे शिव तत्व आहे. खंड प्रलयकारक काळभैरव व महाप्रलयकारक महाकाल ही नियतीची विनाशकारक अविनाशी परमतत्वे आहेत. उज्जैन हे पृथ्वीचे नाभी केंद्र असुन या स्थानातुन आकाशस्थीत तारकेश्वर, मृत्युलोक स्थित महाकालेश्वर आणि पाताळस्थित काशीविश्वेश्वर एकसुत्री आहेत.

आकाशस्थित सुक्ष्म तारकेश्वर शिवतत्व

आकाशात स्वतंत्रपणे विचरण करणारी एकमात्र सुक्ष्मसत्ता म्हणजे तारकेश्वर तारकलिंग. हे तारकलिंग सद्गुरु मंत्रालयाआधीन असते. तारकलिंगाचे आपल्या चित्तात तारक मंत्राद्वारे आवाहन केले जाते. हा तारकमंत्र भगवान शंकराचा ' ॐ नमः शिवाय ', श्री दत्त महाराजांचा ' श्री गुरुचरित्र ' व स्वामींचा ' श्री स्वामी समर्थ ' अशाप्रकारे मतीतार्थात घेण्यात येतो. तारकेश्वर शिवलिंग चर्मचक्षूंनी पाहता येत नाही. ह्या ब्रम्हाण्डीत द्वारात एकसुत्री असलेल्या तिन्ही शिवलिंगाच्या माध्यमातून सृष्टिचे सृजन, पालन व संहार होत असतो. तारकेश्वर शिवलिंग नाभी स्थानातुन उत्पन्न झालेल्या ब्रम्हतत्वाचा वाचक आहे. सर्व साधारण अर्थात ब्रम्हतत्व सृजनात्मक उद्धार करण्याहेतु योगीजनांच्या सान्निध्यात सद्गुरु महाराजांच्या स्वरुपात सदैव तत्पर असते.


तारकेश्वर शिवलिंग अत्यंत सुक्ष्म व सद्गुरु साधनेच्याच माध्यमातून अनुभवास येणारे परमतत्व आहे. ईतर कोणताही मार्ग हे सत्व अनुभवण्याचा या पृथ्वीतलावर नाही. परंतु महाकालेश्वर भस्म आरती एकमात्र माध्यम सर्व सामान्य भक्तांना या तत्वाची ओळख करवुन देऊ शकते. भगवान शंकराने भारत वर्षात बरीच शिव मंदिरे स्वईच्छ्येने तयार केली. सर्व शिव मंदिरांना त्यांची स्वतःची प्रतिष्ठा मिळवुन दिली. या सर्व शिव मंदिरात महाकालेश्वर शिवधाम साक्षात अंतराळातील सुक्ष्म शिवलिंगाशी संलग्न आहे. त्यायोगेच प्रामाणिक व पारदर्शक मनोवृत्तीने महाकालेश्वर भस्मारती घेत राहील्यास जीवनातील सर्व तापांचे सहजच निराकरण होते.


सृष्टीचे सृजनात्मक दायित्व आकाशस्थित तारकेश्वर ज्योतिलिंगाचे आहे. त्याच प्रमाणे पालनात्मक भुमिका पाताळस्थित काशीविश्वेश्वर सुक्ष्म ज्योतिलिंगाची आहे. शिव पुराणाप्रमाणे भगवान शिवाने आपल्या त्रिशुळावर काशी धाम स्थापन केले आहे. या काशीधामाचे दोन प्रकार आहेत. ते खालीलप्रमाणे...


  • १. स्थुल काशी ( वाराणसीला आहे ती )
  • २. सुक्ष्म काशी ( पाताळात आहे ती )


१. स्थुल काशी


हे स्थान भारतात वाराणसीला आहे. गंगा नदीच्या तीरावर या स्थानाचे रक्षण आणि देवतंच्या तत्व मर्यादेचे पालन करण्यासाठी काशी कोतवाल श्री काळभैरव सदैव तत्पर व जागरुक आहे. यासंबंधी माहीती ईंटरनेट वर उपलब्ध आहे. त्यायोगे ईथे मी त्यासंबंधी माहीती पाठवत नाही.

२. सुक्ष्म काशी


ह्या काशीचे आख्यान, व्याख्यान व उल्लेख कुठेही, कोणत्याही ग्रंथात, पुराणात, दैवी संग्रहात उल्लेख केला गेला नाही. भागीरथीने भगवान शंकराला पृथ्वीवर गंगा अवतरण करणें हेतु याचना केली. कठोर तपापश्चात भगवान शंकराने आकाशगंगा पृथ्वीवर पाठवली परंतु अपेक्षित रामराज्य आणि सत्व नसल्यामुळे गंगा मृत्युलोकाची जमीन फाडुन सरळ पाताळात शिरलि. पाताळात भगवान शंकराने त्वरीत साक्षात काशी विश्वनाथारुपाने अवतार घेउन तेथे गंगेला परत मस्तकी ग्रहण केले. पाताळ लोकात सुक्ष्मकाशीस्थानी आजही पाताळगंगा प्रवाहीत होते. ह्या पाताळस्थित काशी विश्वेश्वराचे कार्यक्षेत्र निरीक्षण व संबंधित अतिक्रमणावर कारवाई हे श्री काळभैरव देवाच्या आधीन आहे.


पाताळगंगेचा आजही अनुभव तुम्ही या मृत्युलोकी घेऊ शकता. दत्त संप्रदायात ज्या योगी जनांनी भु मातेतुन गंगाप्रवाहीत केली, ती गंगा म्हणजे साक्षात पाताळातील गंगा आहे. त्यासाठी दाणोलीला जाऊन नागझरीचे दर्शन, हिरण्यकेशीत गंगेचा उगम, महाकालेश्वर उज्जैनला गंगाघाटावर उगम, राजापुरला गंगेचा उगम अशी अनेक स्थाने सद्गुरुकृपे पाताळगंगेने पवित्र झाली आहेत. ह्या तत्वाचा आपण अभ्यास करुन आपलं जीवृनही गंगेसारखं पवित्र करण्याचा प्रयत्न करायला पाहीजे.



ह्या पाताळस्थित काशी विश्वेश्वर शिवतत्वाचे माहात्म्य कोठेही पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध नाही. हे सर्व सुक्ष्म ज्ञानाच्या आधारावर व्यक्त होत असते. ज्याप्रमाणे पालनात्मक पाताळस्थित पाताळेश्वर शिव पाताळगंगेत विराजमान असतात. त्याचप्रमाणे संहारात्मक महाकालेश्वर ज्योतिलिंग उज्जैन येथे विराजमान आहे. हे उल्लेखित तिन्ही शिवलिंगे संंबंधित कार्यप्रणालीला अनूसरुन एकसुत्रीत असतात. कोणतीही शक्ती अथवा भौतिक व परमार्थिक नितीमत्ता ह्या तत्वात अनधिकृत हस्तक्षेप करु शकत नाही. या परमतत्वाचे नियम व निष्ठेचे रक्षण करणारी देवता अत्यंत भयानक व निष्ठुर मानली जाते. ती उज्जैनस्थित असलेली श्री काळभैरव महाशक्ती...!



बारा ज्योतिलिंगांपैकी महाकालेश्वर ज्योतिलिंग मृत्युलोकातील कलियुगाच्या अंतिम पर्वातील निर्णायक भुमिका बजावणारे शिव तत्व आहे. खंड प्रलयकारक काळभैरव व महाप्रलयकारक महाकाल ही नियतीची विनाशकारक अविनाशी परमतत्वे आहेत. उज्जैन हे पृथ्वीचे नाभी केंद्र असुन या स्थानातुन आकाशस्थीत तारकेश्वर, मृत्युलोक स्थित महाकालेश्वर आणि पाताळस्थित काशीविश्वेश्वर एकसुत्री आहेत.

मृत्युलोकस्थित महाकालेश्वर ज्योतिलिंग
महाकालेश्वर भस्मारतीत वापरले जाणारे स्मशान भस्म तयार करण्याची प्रक्रीया मोठी असते. हे भस्म अत्यंत पवित्र अशा संस्कारातुन उत्पन्न होत असते. यासंबंधी बरीच माहीती गोपनीय ठेवण्याची आज्ञा आदि दैवतांची आहे. त्यामुळे विस्तारभयास्तव ती माहीती येथे पाठवणे हितकारक नाही. संबंधित भस्म संस्कार, भस्म प्रकार व भस्म लेपन पद्धतीसाठी ' दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ' ला प्रत्यक्ष संपर्क करावा.

आध्यात्मिक साधनेत भस्माचे महत्व व नाथ संप्रदायातील भस्म महीमा संबंधी माहीती अपेक्षित असल्यस ट्रस्ट सभासद होणे बंधनकारक आहे.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...