दि. 19.8.2017 वार शनिवार श्रावण कृष्ण पक्ष, शिवरात्री शनिप्रदोष हया दिवशी भगवान महाकालेश्वराच्या उज्जैन येथील महास्मशानात श्री काळभैरव स्मशान साधना करण्याचे नियोजन दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्टचे श्री. कुलदीप दादा निकम यांनी सुमारे दोन ते अडीच महिन्यांपूर्वीच केले होते. त्याप्रमाणे किमान एक तासाचे पदमासन सिदध करण्याचे सर्व साधकांना सुचित केले होते. यासाठी ईच्छुक साधक सुमारे दोन महिन्यांपासुन प्रयत्नशिल होते.
![]() |
ओम काळभैरवाय नम: |
वास्तविक श्री काळभैरव सरकार हे कलीयुगात प्रगट आणि अप्रकट स्वरुपात कार्य करणारे एकमात्र प्रवासी दैवत. निरंजन समाधीत रममाण कल्याणकारी शिवाची ती प्रलंयंकारी उजवी बाजू. सर्व दहा भैरवांचे ते अधिपती. सदगुरुचरणांपाशी रममाण, महाकालीचा पुत्र म्हणुन ज्याची ख्याती, ज्याची भिमकाय काया आणि वज्रदाढ नीलवर्ण आहे, जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे, अशा शामवर्ण, सर्व दैत्य, पिशाच्च्, शैतानी शक्त्या ज्याच्या पायावर दीनपणे लोळण घेतात,नियती ज्यांच्या अधीन आहे अशा काळ आणि वेळेचाही स्वामी असलेल्या, जो पुर्वकर्मांचा नाशक असुन कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुन सोडविणारा आहे, अशा धर्मरक्षक आणि अधर्मनाशक श्री काळभैरव यांचे महात्म्य थोर धर्ममार्तंडांना, ॠषी, मुनी आदीनाही पेलवता आले नाही अशा अत्यंत उग्र अशी किर्ती असलेल्या श्री काळभैरवाच्या स्मशान साधनेला जायचे म्हटल्याने साहाजिकच छातीवर दङपण येणे स्वाभाविकच होते. कारण सेवेपेक्षाही शुध्द आचरणावर आणि संयमी पारदर्शी चारित्र्यावर श्री काळभैरवांचा भर असतो. त्यांचे तत्वात न बसणा-या साधकांचे आम्ही हाल पाहीले आहेत. पण दादांची ख्याती आम्हाला यापूर्वीच्या अनुभवांवरुन चांगलीच माहिती होती. त्यामुळे त्यांनी जी पुर्वतयारी करणे आवश्यक आहे असे सांगितले, ती कटाक्षाने पार पाडण्यावर आमचा भर होता.
दिवसेंदिवस जशजशी सेवा होत होती तसतसे मनावरचे दडपण कमी होत होते. पण दादांकडून सावध रहाण्याच्या सुचना येत होत्या. ते नेहमी म्हणायचे की माया या विश्वाला व्यापुन आहे.ती अध्यात्म्य मार्गावर आत्मक्रमण करणा-या साधकांस पुढे जावू देत नाही. नानाविध प्रलोभने दाखवुन ती अध्यात्म् मार्गापासुन परावृत्त् करते. ही सर्वव्यापी आहे. संपूर्ण प्रकृतीत ती जशी आहे, तशीच ती शरीरातही सुक्ष्म् रुपाने आहे. ती जशी सगुणात आहे तशीच निर्गुणातही आहे. सगुण क्षेत्र तिच्या अधिकारीते मधील आहे. निर्गुण तिच्या पकडीबाहेर असतं. आत्म्याचे मूळ निवासस्थान आकाश आहे. त्यामुळे भगवतमय अंतकरण आत्मगुहेतुन देहापलिकडे निर्गुणात गेले पाहीजे, म्हणजेच स्थूल पिंज-यापलिकडील असणा-या अंतराळात आपलं सुक्ष्म् शरीर शाश्वत स्थिर होईल. त्यापुढे निर्गुणाच्याही पलीकडील शिवतत्व आपल्या आकाशस्थित आत्म्याला सायुज्य स्थिती मिळवून, परमगती प्राप्त करवून देते. जी सुक्ष्म कर्दळीवन आणि सुक्ष्म गिरनारीत जाण्याचा मार्ग करुन देते. महाराज त्यायोगेच मल्ल्किार्जुन शिवलिंगात प्रवेश करुन गेलेत. पण निर्गुण भाव अधिक जालीम आहे. कारण निर्गुणात तर माया ईश्वराच्या अधीक समीप आहे.तिथे चुकांना माफी नाही. म्हणुन सगुण पेक्षा निर्गुण साधना अतिशय अवघड असते. पण सदगुरु कृपा असेल तर तितकीच सोपी देखील. सोपी किंवा अवघड हे तुमच्या धारणेवर आणि ध्यासावर अवलंबून आहे.
माया फक्त स्मशानातच नाही. कारण मायेला स्मशानात प्रवेश नसतो. मायेला जिंकायचं असेल तर स्मशानवासीच व्हावे लागते. आत्म्याला गेंडयाची चामडी चढते ती तिथेच. मग मायेचे सर्व वार बोथट व्हायला लागतात. परिपक्व योगी मायेला अशा प्रकारे शोधुन काढतो आणि भस्म करतो. यासाठी जबरदस्त मानसिक स्थैर्य लागते. आणि ते श्री काळभैरवाच्या स्मशान साधनेतुनच मिळते. मायेला शोधण्याची कला एकदा हस्तकी आणि मस्तकी आली की निर्गुणाचा मार्ग अधिक प्रशस्त होते. निर्गुण् भाव ब्रम्हांड, पंचमहाभुते यांच्याही पलीकडे आहे. तेथे जाणे अवघड. त्यासाठी सदगुरु चरणांप्रती समर्पण हवे. समर्पणातुन स्वामी नामाची ओढ लागते. मग सदगुरुकृपे अंतर्बाहय शत्रुंची ओळख होते. त्यातुन आपली अंतर्मुख अभिव्यक्ती साकारते. साधक अंतर्मुख झाला की, बाहयमन अंतर्मनाचे कक्षेत येते. अंतर्मन बुध्दीच्या कक्षेत येवून, स्वामीमय अंतकरण निर्माण होते. मग त्यातुन स्वामी प्रबोध होतो. त्याच्या पुढे दत्त् अधिष्ठान प्राप्ती होते. मग दत्तप्रबोध होते. त्यापुढे शिवतत्व् आहे. हया शिवतत्व् प्राप्तीसाठी अंतरात मोठा संग्राम होतो. येथे साधकास हलाहल पचवावे लागते. मग कुठे शिवतत्वाची प्राप्ती सुनिश्चित होवून साधक दत्त् स्वाधिष्ठान मार्गे दत्ततत्व् प्राप्तीकडे विदेहाच्या पलीकडे वाटचाल करु लागतो. हया सर्वांमध्ये श्री काळभैरव ते श्री दत्तअधिष्ठानापर्यंत आत्म्याचा निर्गुण अभिव्यक्तीव्दारे अंतर्मुख सुक्ष्म प्रवास दीर्घ काळानुरुप निर्धारीत आहे. यात वैराग्य् व आत्म ज्ञान आपण ठरवून निर्माण् करु शकत नाही. हे सर्व सदगुरु साधकांच्या दास्य् भक्तीवर अवलंबून आहे. ज्याची दिशानिर्देशने फक्त् दत्त महाराजच ठरवतात. दास्य् भक्ती, आत्म् ज्ञान आणि वैराग्य साधकाच्या धारणक्षमतेवर अवलंबून आहे. त्यासाठी आपले देहभांडे स्वच्छ् चारित्र्य् पुर्ण आणि अंतर्मुख असावे लागते. तरच चिकाटी, सुस्वभाव आणि संयमातुन स्वामी जवळ येतील. प्रथमदर्शनी पहाता श्री काळभैरव स्मशान सधना ही काहीतरी भयानक अघोरी व अंधश्रध्दा निर्माण करणारी साधना वाटते. पण तसे नाही. ही अत्यंत सात्वीक साधना आहे. त्यामुळे तिथे साधकाची कसोटी लागते.
दादांना मी विचारले की, दादा आपण हीच साधना कां निवडली ? आणि आपण नेहमी श्री काळभैरवाचे नामस्मरणावर भर कां देता ? तेव्हा ते म्हणाले की, श्री काळभैरवनाथ देहातील सुष्मना नाडी आहे. देवाचा वरदहस्त डोक्यावर आल्यावर नील सरस्वती सहजच जागृत होणार . त्यायोगे सहस्त्राधार स्थित परमगुरु दत्त महाराजांच्या चरण कमलांचा संयोग सामायिकरणाचा आत्मयोग मार्ग मोकळा होण्यास आंरभ होतो. जगातील सर्व दत्त विभुती हया श्री काळभैरव देवांच्या सहाय्यानेच शिवतत्व प्राप्ती करुन, दत्त्त तत्वास पोचल्या आहेत. श्री काळभैरवांना वळसा घालुन मोक्षमार्गाकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध नाही. देवांचा महिमा आणि तत्व् यांचे आकलन व्हावे या हेतुने ही साधना आता आवश्यक आहे म्हणुन निवडली आहे. अध्यात्मिक जीवनात घोर साधना हया सात्विक, वैराग्यपुर्ण व सदगुरु महाराजांचे अधिष्ठानयुक्त असतात. हया साधना सहज समाधी हया अंतिम ध्येयापर्यंत घेवून जातात.
तेव्हा तुर्त मायेला ओळखुन सावध रहा असे दादांनी बरेच वेळा सांगितले. पण काय सावधगिरी घ्यायची याबाबत विचारले असता, सदगुरु महाराज व श्री काळभैरव सर्व सांभाळून घेतील त्यांना घटट पकडून ठेवा असे ते बोलत. यातला गुढ अर्थ काही कळेना पण श्रध्दा मात्र पक्की होती. दादा नेहमी म्हणतात की, जे व्हायचे ते तर होणारच आहे, हे ही दिवस निघुन जातील आणि मी नश्वर आहे. असो
आजच्या आधुनिक युगात श्री काळभैरवांचे नामस्म्रण सर्व महिला आणि पुरुषांनी करावयास हवे. कारण त्यांच्या नामस्मरणातुन प्रचंड आत्म् विश्वास जाणवतो, आंतरिक विचारांमध्ये विशिष्ट् बल जाणवते, जीवनाचा दृष्टीकोन विशाल होतो, शैतानी विचारांच्या शक्ती आणि व्यक्तींपासुनही आत्मरक्षेची जाणीव होते, मनुष्य आंतर्बाहय शत्रुंच्या पकडीतुन दुर जातो, अध्यात्म जीवनात विशेष रुची निर्माण होते, आपल्या जीवनावर आपले वर्चस्व् निर्माण होते, भगवान शिवाची सहज कृपा प्राप्ती होते, भगवती काली मातेची कृपा होते. आजच्या विज्ञानयुगात राहणीमान उंचावले आहे, पण अध्यात्म् पासुन मनुष्य् दुरावत गेल्यामुळे विचारांमध्ये विकृती आली आहे. आपल्या अवतीभवती घडणारे महिलां व मुलींवरील अत्याचार घटनांमध्ये झालेली वाढ हे याचेच दयोतक आहे. अत्याचा-यांना शासन करण्यास कायदा तर आहेच. पण श्री काळभैरव नामस्मरणातुन जर मनामनामधील दृष्ट् विचार नष्ट् होत असतील तर आपण प्रथम ते केले पाहीजे. कारण विचार थांबविणे मनुष्याच्या हातात नाही. हे ही कबुल केले पाहीजे. ज्यायोगे शांत, आचरणशील व चारित्र्यवान समाजाची निर्मिती देशास अधिक मजबुत करेल.
साधनेसाठी पूर्वसाधनेची सर्व तयारी झाली. साहीत्यांची जुळवाजुळव झाली. उज्जैनला जाण्याचा दिवस जसा जसा जवळ येत होता, तस तसा एक एक साधकासमोर वेगळीच समस्या निर्माण होत होती.
श्री. प्रफुल्ल् तरडे ठाणे यांना मुलाची उच्च शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया दोन दिवसात पुर्ण करणे आवश्यकता होती. त्यासाठी लागणारी कागदपत्र पुर्तता करणे हया कालावधीत केवळ अशक्य होते. पण त्यांनी डयुटीला सुटी टाकली. प्रवेशाचे काम देखील श्री स्वामी समर्थ कृपेने झालेले तेही देखील एकाच दिवसात.
सौ. सुमन बद्रीनारायण गाडगे रा. मेहकर जि. बुलडाणा यांचे घरातील सर्व सभासद उज्जैन जाण्याचे 24 तास अगोदर अचानक आजारी पडले. काय करावे काही सुचत नव्हते. उज्जैन जाण्याचा बेत रदद करण्यापर्यंत विचार गेला. पण मी त्यांची स्थिती ओळखुन लगेच मोबाईल वर संपर्क साधले आणि म्हटले की, ताई आपण सेवेला जावू नये यासाठीच तर नकारात्मक शक्तीनी रचलेला हा बनाव आहे. आपण डगमगून न जाता जाण्याची तयारी करावी. सर्व सुरळीत होईल. त्या ताई केवळ स्वामी नामावर आपले पतीसोबत ज्यांचे अंग तापाने फणफण्त होते घरुन निघाल्या. उज्जैन जसजसे जवळ येईल तसातसा ताप वाढत होता. पण उज्जैनला पोचल्यावर मात्र ताप नाहीसा झाला. रस्त्याने तर औषध मिळालेच नव्हते.
मला देखील जाण्याचे 2 दिवस अगोदर दादांनी भ्रमणध्वनी केला. विचारले की, शरीरप्रकृती कशी आहे ? हया अचानक प्रश्नाने मी मात्र भांबावून गेलो होतो.कारण दादा कोणतीही बाब विनाकारण कधीच बोलत नाही हे मला माहित होते. तेव्हा हया प्रश्नामागचा अर्थ शोधण्याच्या उददेशाने हया प्रश्नाबाबत खोदून खोदून विचारले पण दादांनी काळजी घ्या एवढेच सांगितले.
दि. 18.8.2017 चे रात्री मी ट्रॅव्हलबसमध्ये बसलो. इंदोर केवळ 50 कि.मी. राहीले असता अचानक एका वळणावर काहीतरी मोठा आवाज झाला. गाडी अचानक एका बाजुला होवून थांबली. बसमधुन सर्वात अगोदर मी खाली उतरलो. एक कंटेनर बसवर धडकणारच होता. पण दोन्ही गाडयांचे चालकांनी प्रसंगावधान राखुन गाडया परस्परविरोधी दिशेने वळविल्या होत्या. त्यामुळे केवळ साईडग्लास तुटून फुटण्यावरच सर्व थांबले. गाडीजवळ येवून पाहीले तर गाडी रोड साईडपासुन केवळ अर्धा फुट अंतरावर होती. आणि लगेचच पुढे खोल दरी होती.पाऊस सुरु असल्याने जमीन निसरडी झाली होती. पुढे काय झाले असते ? हया विचारात असतानाच रोड साईडला असलेल्या एका पाटीकडे लक्ष गेले त्यावर भैरुघाट असे लिहीले होते. दादांचा ईशारा आठवला. श्री काळभैरवाची कृपा तर नुकतीच झाली होती. दोन्हीप्रती कृतज्ञता व्यक्त करीत मी उज्जैनला येवून पोचलो .
तिथे पोचल्यावर श्री. कुलदीपदादा आणि इतर दत्तप्रबोधिनी सभासद मंडळी सकाळी 7 वाजेलाच पोचल्याचे कळाले. त्यांना भेटलो, चर्चा झाली. नियोजन झाले.
सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आम्ही सर्व साधक मंडळी क्षिप्रा नदीच्या काठावर असलेल्या रामघाटापलीकडील नरसिंह घाटावर स्नानासाठी गेलो. स्नान आटोपल्यानंतर आम्ही आमचे बि-हाडावर आलो. तेथुन पुजेचे सर्व् साहित्य् घेवून, भैरवगढ येथे असलेल्या श्री काळभैरव देवांचे मूळ पीठावर आलो. तेथे पोचताच पावसाने पुन्हा धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली. मुख्य् महाव्दारापाशी प्रचंड मोठी दिपमाळ आहे. त्यावर शेकडो दिवे लागुन होते. पण पावसाचा त्या दिव्यांवर कोणताही परिणाम होताना दिसुन येत नव्हता. हे पाहून नवलच वाटले.
दर्शनासाठी गर्दी नव्हती. त्यामुळे श्री काळभैरवांचे दर्शन अगदी निवांतपणे व डोळेभरुन घेता आले. देवांची मुर्ती पाहून ते खरोखरीच निर्गुणाचा राजा असल्याचे पटत होते. शुध्द् सात्वीक भाव दर्शनाने आपोआपच मनात निर्माण व्हायला लागतात. दर्शन झाल्यानंतर मी मंदीराच्या गाभा-याबाहेर येवून, पायरीवर टेकलो. तोच तिथे एक काळया रंगाचा श्वान येवून माझेजवळ उभा राहीला. त्याच्याकडे बघितले असता, त्यानेही माझेजवळच जमिनीवर बैसकार केला. हे अभिनव दृश्य् माझे शालक श्री गोविंद रमेश सारसकर यांनी लगेच कॅमे-यात टिपले. काळभैरव देवांचे वाहन श्वान आहे.
हया मंदीराचे डाव्या हाताला समोरील बाजुस श्री दत्त महाराजांचे प्राचीन अधिष्ठान मंदीर आहे. तेथे जावून दर्शन घेतले. व स्मशानामध्ये जाण्यासाठी पायीच निघालो. स्मशानाचे शेडमध्ये एक चिता अजुनही पेटत होती. सगळीकडे संपूर्ण काळोख साठलेला. त्या काळोखात चितेचा धुर अधिकच वातावरण गुढ करीत होता. एकेक पाय-या उतरत आम्ही एकदाचे नदीच्या एकदम काठावर असलेल्या स्मशान भैरव उर्फ विक्रांत भैरवाच्या हजारो वर्ष् जुन्या मंदीरामध्ये पोचलो. दर्शन घेतले. तेथेच बाजुला असलेल्या शिवमंदीरात जावूनही दर्शन घेतले. आम्हा सर्वांचे मन निर्विकार झाले होतो. जगरहाटीपासुन दुर, शांत आणि कोलाहल नसलेल्या महास्मशानात येवून मन निर्विकार व निर्विकल्प् तर होणारच ना.
मंदीराचे मंडपामध्ये आम्ही साफसफाई करुन बसलो. दादा म्हणाले की, साधनेला सुरुवात करायची का ? तेव्हा प्रफुल्लजी तरडे म्हणाले की, दादा अजुन बारा वाजण्याला अवकाश आहे. दादांनी माझ्याकडे बघितले. तेव्हा मी बोललो की, दादा आपण ठरवाल ती पुर्वदिशा. मग काय दादांचे सुचनेनुसार साधनेची तयारी सुरु झाली. यज्ञकुंडाची पुजा केली. सदगुरु महाराजांना विनंती केली. श्री काळभैरव आणि विक्रांत भैरवांचे आवाहन केले. यज्ञाचा अग्नी आदरणीय दादांनी प्रज्वल् केला. यज्ञ कुंडात प्रथम ओम काळभैरवाय नम: स्वाहा चा स्वाहाकार सुरु झाला. तसे अचानक एक पांढ-या रंगाचा श्वान कुठूनतरी आला. त्यांने यज्ञकुंडाजवळ सांडलेले तुप खाल्ले. माझ्या आणि सचिनजी गायकवाड यांच्यामध्ये यज्ञकुंडाजवळच अंग टाकले. जणु त्याचे रुपाने श्री काळभैरवाची सात्विक रुपाने आगमनच झाले होते.
यानंतर श्री स्वामी समर्थ स्वाहा चा स्वाहाकार सुरु झाला. आजुबाजूचे वातावरण मंत्रोच्चार आणि स्वाहाकाराने भारावून जावू लागले. यज्ञाच्या ज्वालेच्या प्रकाशात त्या ठिकाणी एक वेगळीच विश्वनिर्मिती झाल्याची अनुभूती निर्माण झाली होती. अचानक कुठूनतरी चार श्वान अजुन आले. यज्ञाच्या भोवती आम्हा बसलेल्या साधकांना जणु काही अभेदय तटबंदी करुन संरक्षण करीत असल्याचे अविर्भावात उभे राहीले.
यानंतर सदगुरु परमहंसांचा मूळ शाबरी मंत्र आणि श्री काळभैरवांच्या चार चौकी शरीर रक्षा शाबरी मंत्राचा मागील एक महिन्यात झालेल्या जपाच्या सिदधतेबाबत स्वाहाराच्या आहुत्या सुरु झाल्या. आता तर सगळीकडे अदभुतता व सदगुरु चैतन्याचे साम्राज्य पसरल्याचे वाटत होते. जणुकाही त्या ठिकाणी श्री काळभैरव, विक्रांत भैरव, श्री स्वामी महाराज आणि दत्त महाराज यांचे सुक्ष्म रुपाने आगमनच झाले आहे अशी अनुभूती येत होती. सर्व साधकांचे संपूर्ण चित्त् केवळ यज्ञावर होते. साधारणत: तीन तासानंतर अकरा वेळा श्री काळभैरवाष्टकाचे पठन व आहुती झाली . यानंतर दत्तप्रबोधिनीमध्ये नियमित ऊबंटू साधनेमध्ये जो काळभैरवाचा मूळ मंत्र जपला जातो त्याच्या विनाअट आहुत्या यज्ञपुरुषास समर्पित करण्याचे कार्य सुरु झाले.मी पदमासनामध्ये बसलो असता अचानक सगळीकडे चंदेरी प्रकाशाची पखाल आसमंतातुन रिती झाल्याचे जाणवले. पण आहुती समर्पित करण्याचे कार्य सुरु असल्याने त्याकडे फारसे लक्ष देणे शक्य् झाले नाही. पण सगळीकडे सात्विकता ओतप्रोत भरुन व्यापून होती इतके मात्र निश्चितच होते. सर्व साधकांची शरीरप्रकृती, मन, बुध्दी यावरील गुरुत्वाकर्षण जणु काही नाहीसे झाल्यासारखे वाटत होते.
इतका वेळ जो पांढ-या रंगाचा श्वान माझ्या आणि सचिनजी गायकवाड यांचेमध्ये आरामात झोपून होता, तो देखील आता उठला, त्यांनी हातपाय लांबवून मोठा आळस दिला. आणि आल्यामार्गाने परत जावून दिसेनासा झाला. यज्ञकार्य चालु असेपर्यंत चारी दिशेने उभे असलेले चार श्वान देखील कुठे निघुन गेले ते समजले नाही.
यज्ञामध्ये एकूण 23 गोव-या समर्पित झाल्या होत्या, जणुकाही श्री काळभैरव यांचे सहाय्याने योगमायेस दुर सारुन, इंद्र आणि कलींना थारा न लागु देता, शरीरातील पंचमहाभुतांचे विघटन करुन, अक्ष्तरुपी आत्मा परमात्म्याशी सदगुरु कृपेने क्रियायोगाव्दारे भस्म् करुन कसा लीन करावा हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवाव्दारे शिकलो होतो. हा अनुभव अत्यंत दुर्मिळच होता. ज्याचे आम्ही साक्षीभावाने साक्षीदार होतो.
वयाच्या किशोरावस्थेपासुन सुरु असलेला आध्यात्माचा शोध दत्तप्रबोधिनीत येवून लागला होता. हे असे अध्यात्म आहे जो नदीचा उलटा प्रवाह आहे. प्रवाहाच्या दिशेने वहात जाल तर भोगविलासात संपून जाल. उलटया मार्गाने प्रवास कराल तर मिळेल शाश्वत् सत्याच्या शोधाचा आनंद. हा आनंद परमानंदात कसा रुपांतरीत करावा हे दादांनी श्री काळभैरव साधनेव्दारे क्रियायोगातुन अत्यंत सोप्या पध्दतीने शिकविले आणि ते साकारातही आले.
श्री काळभैरवनाथ स्मशान साधना मार्ग अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !
Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below
