धन मिळवण्याचे उपाय - Dhan milavnyache upay


मंत्र शास्त्रात मंत्राईतकेच यंत्रालाही महत्त्व आहे. यंत्र हे त्या त्या देवतेचे प्रतिक आहे. मंत्र ज्याप्रमाणे स्वयंसिद्ध अविनाशी आहेत त्याचप्रमाणे यंत्रेही स्वयंसिद्ध अविनाशी आहेत. मंत्रामधे गूढ असलेल्या देवता यंत्र सहाय्याशिवाय प्रकट होत नाही. परंतु त्यासाठी प्रथम यंत्राची प्राणप्रतिष्ठा करुन त्या त्या देवतेची त्यात स्थापना करणे आवश्यक आहे. विनाप्राणप्रतिष्ठा यंत्र पुजन केल्यास काहीच उपयोग होणार नाही. हे अधी लक्षात ठेवा. 


यंत्रामधे यंत्राच्या देवतेला अनुसरुन वेगवेगळे कोण आकारालेले दिसुन येतात. उदा. गायत्री मंत्रात तीन कोण व अष्टदले आढळतात तर सुर्य देवतेचे यंत्र द्वादश कोणात्मक आहे. चंद्राचे षोडश कोणात्मक तर मंगळाचे त्रिकोणात्मक आहे. बुधाचे अष्टकोणात्मक तर गुरुचे व शनिचे षट्कोणात्मक आहे. तसेच शुक्राचे पंचकोणात्मक आहे. 



यंत्रांचे एकुण प्रकार

  • १. भुपृष्ठ
  • २. कुर्मपृष्ठ
  • ३. पद्मपृष्ठ
  • ४. मेरुपृष्ठ

वरील यंत्रे अचल, चल व धारण करण्याजोगी अशी तीन प्रकारची आहेत. 

  • १. अचल म्हणजे मुळ जागेवरुन हलविता न येणारी.
  • २. चल म्हणजे हलविता येण्यासारखी. ही यंत्रे देवतेच्या कलेसह इकडुन तिकडे प्रस्थान करता येतात. 
  • ३. धारण करावयाची यंत्रे गळात घालुन किंवा दंडावार बांधुन स्वतः बरोबर बाळगता येतात. 

सामान्यतः प्रवाळ, पद्मपराग, नीलमणी, वैडुर्य, स्फटीक व पोवळे या रत्नांवर यंत्रे काढावीत. यंत्रांसाठी तांबे, रुपे, सुवर्ण व स्फटीकाचाही वापर केला पाहीजे. धातु यंत्राच्या वजनालाही महत्त्व आहे. सरासरी वजन एक ते सात तोळे ईतके असायला पाहीजे. 



लक्ष्मीदायक श्री यंत्र

श्री यंत्राचे एकुन तीन प्रकार आहेत...

१. भुपृष्ठ स्वरुपी - हे सपाट असते



२. कच्छपृष्ठ स्वरुपी - हे कासवाच्या पाठीप्रमाणे थोडे वर उचललेले असते. आतुन फुगीर व वरचा भाग अल्पबृहीर्गोलात्मक असतो. 


३. मेरुपृष्ठ - मेरु पर्वताप्रमाणे वर क्रमबद्ध ऊंच असलेले. 



श्रीयंत्र सोने, चांदी, तांबे या धातुंवर काढलेले असायला पाहीजे. लाकुड, पाट, फळी, भिंत व दगडावर कधीही काढु नये. धातुयुक्त श्रीयंत्र १ ते ७ तोळे ईतके सरासरी वजनाचे असायला पाहीजे. यंत्रावरील आकृती रेखा कोरलेल्या असतील तर त्या चंदन व कुंकुमाने भरुन घ्याव्यात. 


श्री यंत्र गुरु किंवा सद्गुरुंकडुनच घ्यावे. गूरुपुत्र, गुरुपुत्री किंवा गुरु पुत्राचे पुत्र असली नाती आध्यात्मिक विश्वात अमान्य व तत्वहीन आहेत. श्री यंत्र पुजनात शक्यतो तितकी विशेष खबरदारी घ्या. कारण या तत्वाचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या अष्टविध लक्ष्मी स्थैर्यावर होतो.

सद्गुरुकृपे श्री यंत्र पुजन त्रिशती, खड्गमाला किंवा श्री ललिता सहस्त्रनाम यांचे पठण करुन कुंकुमार्चनयुक्त करावी. महीलावर्गाने सौभाग्य वृद्धीसाठी या श्रीयंत्रावर लक्ष्मीचे नाव घेऊन कुंकुमार्चन करावे. त्यायोगे पतिबरोबरचे वाद विवाद कमी होऊन घरात शांतता व समृद्धी नांदते. त्याचप्रमाणे पुरुषवर्गाने श्री यंत्रावर कुंकुमार्चन केल्यास अर्थिक स्थिती सुधारेल व जीवन यशस्वी होईल.

श्री यंत्रावर रोज किंवा निदान प्रत्येक अष्टमीला श्री सुक्ताचा अभिषेक करावा. तात्विक अभिषेक केल्याने यंत्र देवता जागृत राहाते. 



लक्ष्मीप्राप्ती व व्यापार वृद्धीसाठी...

कमळावर बसलेल्या लक्ष्मीचा फोटो आणा जिच्या दोन्ही बाजुला सोंडवर केलेले हत्ती असावेत. अशा लक्ष्मीला गजलक्ष्मी असे म्हणतात. ज्या ठीकाणी पैशांची पेटी आहे त्यावर फोटो बसवावा. रोज अगरबत्ती दाखवुन व्यापाराची जागा स्वच्छ ठेवा. अडगळ नको. दुकानात व दुकानाबाहेर अधुन मधुन गोमुत्र शिंपडा. दुकानाच्या पुढील दर्शनी भागात स्वस्तिक चिन्ह लावावे.


दुकानात गल्ल्यावर बसण्यापुर्वी श्री सुक्तातील पुढील ऋचेचा १०८ वेळा मानसिक जप करावा.


मंत्र -

तामS आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् l
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावोदास्योS श्वान्विन्देयं पुरुषाहनम् ll 

प्राणप्रतिष्ठीत श्रीयंत्र गल्ल्यात ठेवावे. सकाळी गल्ल्याजवळ साजुक तुपाचे निरंजन लावावे. श्रीयंत्र रोज स्वच्छ पुसुन त्यास हळद कुंकू व फुल वाहावे. दूकानातील गल्ल्याचे तोंड दक्षिणेकडे नसावे.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...