प. पू. आक्काताई वेलणकर


आक्का गुरुंच्या चरणावर नतमस्तक झाल्या. घरी परतल्या. नियमांचे पालन सुरु होते. त्यांनी क्रोधावर विजया मिळविला होता. पुढे आठच महिन्यांनी सन १९५७ मध्ये त्या स्वतःहून इंदूरला गेल्या व जिजी महाराजांचे कडून अनुग्रह प्राप्त करुन घेतला.


आक्का गुरुंच्या चरणावर नतमस्तक झाल्या. घरी परतल्या. नियमांचे पालन सुरु होते. त्यांनी क्रोधावर विजया मिळविला होता. पुढे आठच महिन्यांनी सन १९५७ मध्ये त्या स्वतःहून इंदूरला गेल्या व जिजी महाराजांचे कडून अनुग्रह प्राप्त करुन घेतला.

   महाराष्ट्रात जळगावमध्ये २३ अॉक्टोबर १९२२ ( कार्तिक व. ३ शके १८४४) रोजी दुपारी दोन वाजता प. पू. आशालता वेलणकर उर्फ आक्कास्वामी यांचा जन्म झाला. घरची आर्थिक ओढाताण त्यातच पित्याचे छत्र वयाच्या ९ व्या वर्षीच हरपलेले अशा बिकट परिस्थितीत आक्कांनी आपले मॕट्रीक पर्यंतचे शिक्षण स्वतः शिकवण्या करुन व शाळेत शिक्षक म्हणून काम करुन पूर्ण केले. त्यांना लगेचच अंबरनाथ येथे इंग्रजी शाळेत नोकरी लागली. श्रीमती विमलाताई रहाळकर ह्या आक्कांच्या जीवाभावाच्या मैत्रीण झाल्या.

   दोघीमध्ये नेहमी सदगुरु प्राप्तीबद्दल चर्चा होत असे. आक्का फारच शीघ्रकोपी होत्या. स्पष्ट वक्त्या होत्या. त्यांना शरण जाणे, अनुग्रह घेणे वगैरे गोष्टी मान्य नव्हत्या. त्यामुळेच इंदौरच्या परंपूज्य वंदनीय भागीरथीबाई वैद्य म्हणजेच जिजी महाराज ४-५ वेळा विमलाताईच्या घरी आल्या होत्या, पण आक्कांनी एकदाही दर्शन घेतले नाही. त्या काहीना काही कारण सांगून टाळत असत. पण एका भाद्रपद वद्य एकादशीला जिजी महाराजांच्या सदगुरुंच्या पुण्यतिथीला आक्काला घेऊनच जायचे असा चंग बांधूनच विमलालाईंनी इंदूरची तीन तिकीटे आरक्षित करुन आक्कांना तेथे येण्याबद्दलचे निक्षून सांगितले. तेव्हा त्यांना इंदौर येथे जाणे भाग पडले. 

तुकोगंजात जिजी महाराजांचा आश्रम होता. तेथे उत्सवाला खूप गर्दी झाली होती. रोज काकड आरती ते शेजारती कार्यक्रम होत असे. तेथे आक्का रमल्या पण गुरुदेवांना साधा नमस्कार सुध्दा केला नाही. शेवटी प्रसादाचे दिवशी गुरू महाराज स्वतः सर्वाना प्रसाद वाटणार होत्या. एकेक जण जाऊन चरण स्पर्श करत व प्रसाद घेऊन पुढे जात. आक्कांना ते एक मोठे धर्मसंकटच वाटले म्हणून त्या सर्वात शेवटी रांगेत रहाण्याचा प्रयत्न केला. तो सुवर्ण दिन आहे हे आक्कांना लक्षात आले नाही पण सदगुरुंच्याजवळ पोहचताच गुरु महाराजांनी त्यांचा हात धरला व "आशाताई जरा बसा" असे म्हणताच आक्कांना आपले नाव कसे काय बरोबर घेतले? ह्याचे नवल वाटले. आक्कांच्या रागावर चर्चा झाली. गुरुदेवांनी काही नियम पाळायला सांगितले. आक्का गुरुंच्या चरणावर नतमस्तक झाल्या. घरी परतल्या. नियमांचे पालन सुरु होते. त्यांनी क्रोधावर विजया मिळविला होता. 

पुढे आठच महिन्यांनी सन १९५७ मध्ये त्या स्वतःहून इंदूरला गेल्या व जिजी महाराजांचे कडून अनुग्रह प्राप्त करुन घेतला. गुरुंच्याच उपदेशानुसार त्यांनी सर्वच संतांच्या तत्वज्ञानाचा व विशेषतः भागवताचा अभ्यास करुन प्रवचने व भागवत सप्ताह करण्यास सुरुवात केली. थोड्याच दिवसात म्हणजे ९ मार्च १९५८ रोजी आक्कांचे गुरुदेव पंचतत्वात विलीन झाले. परंतु त्यांचे मार्गदर्शन आक्कांना पुढे सदोरित होतच असे. आक्कांनी 'सखोल दासबोध अभ्यास' सुरु केला. त्यापूर्वी त्या प. दा. अ ( पत्राव्दारा दासबोध अभ्यास ) केंद्र प्रमुख होत्याच. भागवताचा सप्ताह तसेच दासबोध, ज्ञानेश्वरी वरील प्रवचने व अभ्यासाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. 

अनेकांनी त्यांच्या कडून अनुग्रह प्राप्त करुन घेतला. तसेच त्यांनी शेकडोंना प्रवचनकार तर तयार केलेच पण जवळपास किमान पन्नास तरी भागवतकार निर्माण केले. त्या सर्वांना वर्षातून एक वेळा अश्विन पौर्णिमा (कोजागिरी) ते पुढे ८ दिवस असा साधना सप्ताह शिवथर घळीत त्या घेत असत. असाच एक भागवत सप्ताह सन १९२८ च्या घळीतील साधना सप्ताह आटोपताच त्यांनी नांदेड येथे ठरविला होता. त्यावेळी त्यांची प्रकृती नरम - गरमच होती म्हणून त्यांनी स्वतः सकाळी एक तास प्रवचन करावे व दुपारी त्यांच्या पट्ट शिष्या सौ. लिलाताई गाडगीळ यांनी भागवताचे निरुपण करावे असा कार्यक्रम आखला गेला. सप्ताह सुरु झाला. 

आक्कांचा वाढदिवस त्याच सप्ताहात येत असल्यामुळे शिष्यमंडळी अतिशय आनंदात होते पण, याच सप्ताहमध्येच धनत्रयोदशीला भगवान श्रीकृष्णानं आपल्या या लाडक्या भक्ताला आपल्याकडे बोलावून घेतले. पुढील सर्व कार्यक्रम अंबरनाथ येथे झाले. तेथेच त्यांच्या मुरलीधर मंदिरात त्यांची मूर्ती बसविण्यात आली. अशा ह्या आक्कांना त्रिवार नंदन.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments