आत्मक्रिया योग व सहज समाधि प्रबोधन: नवरात्री शक्ती उपासना - नऊरंग अतिदुर्लभ माहीती - २ SEO

Dattaprabodhinee Sevaa Trust’ was started in the year 2014 with a vision to create a non-profit humanitarian proficient area for spiritual people to actively engage them in soulistic existences.

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

नवरात्री शक्ती उपासना - नऊरंग अतिदुर्लभ माहीती - २


भगवान शंकराने ज्या ज्या स्वरुपात अवतार कार्य केले,  त्या त्या शक्ती रुपात भगवती माता पार्वतीनेही संबंधित शिवपुरुषात्मक परमप्रकृतीचे स्वरुप धारण केले. उमापतीच्या तत्व मर्यादांचे अतोनात रक्षण व संबंधित नंदी गण, शिव गण, भैरव गण व दत्तचरण दासांचे भरण पोषण करणाऱ्या वात्सल्यरुपी महामातेला साष्टांग नमस्कार...! शक्ती साधना करणाऱ्या अथवा करण्याची ईच्छ्या असणाऱ्या साधकांनी कशाप्रकारे शिवशक्ती अभेद्य स्वरुप ओळखावं, यासाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून सर्व नवरात्रीसाठी सुक्ष्म तत्वसंधान प्रकाशित करत आहोत.


http://blog.dattaprabodhinee.org/2016/09/Navratri.html

सध्याच्या वर्तमानस्थितीत गणेश चतुर्थी व नवरात्री उत्सवात अनेक प्रकारच्या विटंबना होत आहेत. संबंधित माकडचाळ्यांचा देवतेच्या निष्ठेशी व तत्वाशी काडी मात्रही संबंध नाही. अशा वंगाळ आचरणाने कधीही मानवाला सद् बुद्धी येऊ शकत नाही. परिणामी दुःख, दारिद्रय, भरकटलेले मन, घरात भांडण, अशांती व दुर्दैव अशा त्रासांना स्वगृही येण्यास मार्ग उपलब्ध करुन दिला जातो. या नीच स्तरावरुन वर उठुन आपल्याला जीवनात शांती, संमृद्धी, सौख्य व आनंदाची प्राप्ती होणे अपेक्षित असल्यास तत्वनिष्ठीत आचरण व संबंधित साधन या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. श्री सद्गुरु महाराजांच्या तत्वांचे यथाशक्ति रक्षण व संगोपनाची सर्व जबाबदारी भगवती दुर्गा मातेची आहे. ती दिन व रात्रप्रहर कालगणनेत दर एका घटीकाला स्वतःचे स्वरुप बदलुन नियतीचे कार्य संक्रमण करते. नवरात्रीतील सुक्ष्म माहीतीचा आज लोप झाला आहे अथवा संसारविस्तार भयास्तव याचा प्रसार करण्यात आला नाही. या माहीतीतील निवडक व बहुहितोपयोगी माहीती येथे देत आहे.

एका वर्षाच्या कालगणनेत एकुण ३६५ दिवसांचे कालायमान आहे. दिन कालायमानाचे प्रत्येक शक्ती मंडळ एकुण ४० दिवसांचे असते. त्यायोगे एका वर्षात एकुण ९ नवरात्रींचे सुक्ष्म प्रावधान आहे. यासंबंधी प्रत्येक नवरात्रीचे स्वतःचे एक विशिष्ट महत्व आहे. या वार्षिक नवरात्री कालसाधनेची सुरवात शारदीय नवरात्री पासुन होते व पुढील वर्षी होणाऱ्या पितृपक्षात येऊन संपते. त्यायोगे गणेश चतुर्थीतील संबंधित मुहुर्तावर भगवती गौरीचे आवाहन केले जाते. साधकाने अश्विन शुक्लपक्ष प्रथमेपासुन ते भाद्रपद कृष्णपक्ष अमावस्येपर्यंत केलेल्या सर्व ४० दिवसांचे एकुण ९ शक्तीमंडळ नवरात्री पुजन साधना यथाशक्ति केल्याने भगवती गौरीचे आवाहन संबंधित साधकाला अभिष्ट वर अथवा मनोकामनापूर्ती हेतु होत असते.

नवरात्रीचे नऊ रंग हे नऊ दिवसांचे नऊ रंग आहेत हे मुर्ख व बावळट अंधकारमय अज्ञान आहे. मुळात नवरात्रीचे नऊ रंग हे एका वर्षात होणाऱ्या ९ नवरात्रींचे नऊ रंग आहेत. या रंगांचा अनुभव संबंधित साधनेतुन भगवती आपल्याला षट चक्रांच्या शुद्धीकरणाच्या माध्यमातुन करवुन देते. हे नऊ रंग देहाबाहेरील कोणतेही स्थुलरुप नसुन अंतरंगातील स्वतःच्या शरीरातुन नवरंग प्रसारीत होणे असा आहे. या नवरंगांचा संबंध आत्म सुर्यप्रकाशासोबत आहे. आत्म सुर्यप्रकाशांतर्गत करडा, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांरवा, जांभळा व तपकीरी हे नऊ रंग असतात. ह्या नऊरंगाचे आत्मसंधान सुक्ष्मरुपात सर्व नवरात्री साधनाने पांढरा रंगाचे आत्मिक अभिव्यक्तरुप तयार होते. अशाप्रकारे सात्विक साधकाच्या भोवती सफेद पांढऱ्या रंगाचे चमकदार आभामंडळ तयार होते.

मानवी देहातुन सर्व नवरात्री साधनांच्या यशस्वीरित्या परीपुर्णतेतुन जे नवरंगांचे आत्मवलय तयार होते त्या प्रत्येक रंगावर असलेली ग्रहांची सत्ता व नक्षत्र प्रभाव त्या त्या रंगाच्या तेजाने होणारे पुर्वपरीणाम पुन्हा कार्यान्वित होत नाहीत. त्यावेळी साधक पितृलोक, नक्षत्र, ग्रह, चंद्र व सुर्याच्याही पलिकडे जाऊन पोहोचतो. ती अवस्था येण्यासाठी सर्व प्रकारचा बावळट व मुर्ख अज्ञानीपणा झिडकारुन सद् गुरु महाराजांना अनन्य भावाने शरण जावं लागेल. ईतर कोणताही दुसरा तरणोपाय नाही. शोधुन, फिरुन, चौकशी करुन थकाल व वेळ, वय, उर्जाही निघुन जाईल पण ईतर कुठेही परिपक्व अंतःकरणात्मक ज्ञान मिळणार नाही.

आपल्या देहात असणारी प्राणशक्ती देवी ही सृष्टीचे नियमन, संचलन व संगोपन करणारी, स्थुल शरीरात रक्तकार्य व्यवस्थित चालवणारी माता भुवनेश्वरीची महान शक्ती आहे. आपल्या देहातील रक्ताचे नियमन करणाऱ्या प्राणमयी देवतेचे स्मरण न होणे ! योग्य की अयोग्य याचा विचार ज्याचा त्यानेच करावा. अज्ञानात राहुन जीवनाची दीशाभुल होऊ देऊ नये कारण आयुष्य एकदाच मिळते. ह्या संधीचा डोळस सदूपयोग व्हावा यावर विचार करावा...!

पहील्या शारदीय नवरात्रीला सर्व दैवतांचे घट का बसतात ? असं काय कारण आहे जे घट बसलेच पाहीजे ? दैवतं घटात बसल्यावर येणाऱ्या वर्षातील ९ नवरात्रींचे सत्वनियोजन करण्याहेतुने एकत्र येतात. जेणेकरुन ४० दिवसांची प्रत्येक नवरात्रीय कार्यप्रणाली व्यवस्थित व सुरळीत राहावी. अशा शारदीय नवरात्रीत दैवतांचे घट बसणे आणि भुतं उठणे तर स्वाभाविकच आहे.भारतीय संस्कृतीत मातीपासुन मानवाच्या सहस्त्रारापर्यंत सर्वांना मान आहे. ज्याप्रमाणे पितृपक्षात १५ दिवसांचे पितर प्रावधान आहे त्याचप्रमाणे प्रथम नवरात्रीय ९ दिवस भुतं, प्रेतं व अनंग जीवांना संचरणहेतु मोकळीक असते. 

संबंधित शक्ती साधना व अधिक माहीतीसाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क करावा.

नवीन सभासद नोंदणी हेतू येथे क्लिक करा

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?

त्राटकाद्वारे रोगोपचार ( Tratak therapy ) - १

स्फटिकगोलदर्शन त्राटक ( Crystal Gazing ) - गोलक दिव्यदृष्टी साधना

पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!

आध्यात्मिक श्रीफळ व चारित्र्यपूजनाचे माहात्म्य ( Spiritual Disciplines )

भगवती महाकाली( Goddess Mahakali ) साधना सुमेरु तत्व विश्लेषण व शक्ति उपासना - १


महत्त्वाची सुचना :

संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227Click here to subscribe DATTAPRABODHINEE SEVAA TRUST

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Enter your email address:

Delivered by FeedBurner

लोकप्रिय पोस्ट

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज