श्री विद्या कलश अथवा घटस्थापना रहस्य - ३ - Real unknown secrets explained


घरात देवारा कळसाची स्थापना होणे वा मंदिराच्या घुमटावर बाहेरील बाजुने कांचनमय कांतीयुक्त ताम्रकलश स्थापन होणे हे दोन्ही तत्वे समान आणि स्वयं शक्तीसंपन्न आहेत. ब्रम्हाण्डात भ्रमण करणाऱ्या दैवतांना तत्व गाभाऱ्यात प्रवेश करणे हेतु श्री कलश अथवा श्री घटाची स्थापना होणे म्हणजेच घटस्थापना. श्री घट तत्वाचा विचार करण्यावर ज्यांचे प्रेम आहे असे लोक बर्हीबुद्धी म्हणजे केवळ बाहेरचे पाहाणारे असत नाहीत. अर्थात् असे लोक श्रीपदयुक्त अशा घरगुती व धार्मिक स्थळांच्या कळसाचे महत्व जाणतात. 


भगवती आदीमाताच्या मते, ' आध्यात्मिक जीवनातील सर्वोच्च शिखर जर काही आहे तर ते विदेही अवस्थेतील भरुन वाहीलेले नाम घट ' श्री विद्या कलशाचा आत्मतत्वानेच अभ्यास करता येतो. ईतर दुसरा कोणताही विकल्प नाही. अशा श्री विद्या कलशाची अथवा नाम घटाची सगुण स्थापना नवरात्री वर्षातील पहील्या शारदिय नवरात्रीला होते. दैवतपुजनाचे अग्रस्थान श्री कलश आहे. प्रथम नवरात्रीत सर्व देव घटावर बसतात. नऊ दिवसांची वैराग्यरुपी शक्ती साधनेने आत्म संपन्न होतात. त्याच नऊ दिवसांसाठी भुतं खेतांना मोकळीक दिली जाते. अशा ९ नवरात्रींची सुरवात परम पवित्र अशा आदिशक्ती भगवतीप्रिय नामामृत आत्मकलशाने होणे आवश्यक आहे. त्यायोगे गांभीर्याने विचार केल्यास शक्तीमंडळाकडुन आपल्या आत्मपुर्तीसाठी संकेत येण्यास सुरवात होते. 

श्री कलश अथवा घटाला आपण आपल्या आत्म संवादनेने व्यापक केल्यास त्याचे कुंभ बनते. नवीन वास्तुत प्रवेश करण्यापुर्वी कुंभ ठेवण्याची प्रथा आहे. जलपुर्ण कुंभाप्रमाणे घरही भावपुर्ण व नवपल्लित राहावे अशी मंगल कामना त्याच्या पाठीमागे आहे. कलशरुपी कुंभकावर श्रीफळ ठेवल्याने त्याची शोभा व सत्व द्विगुणीत होते. श्रेष्ठ व्यक्तींच्या आगमनावेळी माथ्यावर श्रीफळयुक्त कलश घेऊन उभ्या राहाणार्या कुमारिकांना आपण खुप वेळा पाहातो. भावार्द् आतिथ्य सत्काराचा हा एक पुरातन प्रकार आहे. त्यायोगे नवरात्रिच्या भगवतीच्या पुजनेत श्री कलशाची स्थापना तत्वाला अनुसरुन करण्यात यावी असे सद्गुरु महाराजांचे मत आहे. 

आपल्या स्थुल देहाला आध्यात्मिक जीवनात घट कुंभात्मक साधन प्राप्त झाले आहे. ह्या देह कुंभाला ' सतेज कलश ' असे म्हाणतात. त्याचबरोबर नवरात्रीला स्थापन होणाऱ्या घरातील कुंभाला ' सजल कलश ' असे म्हणतात. ह्या दोन्ही घट कुंभात तात्वित साम्यता आल्याशिवाय भगवती प्रसन्न होत नाही. नवरात्री घट स्थापनेतील घटाचे आध्यात्मिक जीवनात एकुण तीन प्रकार पडतात. ते खालीलप्रमाणे आहे.

  • १. पुण्य घट
  • २. पाप घट
  • ३. नाम घट

१. पुण्य घट व श्री कलशात्मक आत्म विश्लेषण


मानवी सत्कर्मांना अनुसरुण होणाऱ्या कर्मांचे योगसंधान ज्या घटात साठले जाते त्या घटाला पुण्य घट म्हणतात. पुण्य घटाद्वारे मानवी सद्बुद्धी आध्यात्मिक जीवनातील श्री कलशाचे रहस्यमयी ब्रम्हाण्डीय आवेग सद् गुरु कृपे शिवआत्मयोगाद्वारे सहजच प्राप्त करु शकते. जेणेकरुन देह घटाचे निधान कुंभात रुपांतरण होऊ शकेल. अशा पुण्य घटात उत्तरोत्तर वाढ होणे हेतु मन, काया, वाचा स्थिर करुन आत्मावलोकन करता आले पाहीजे.

२. पाप घट व कर्मसंधानात्मक विश्लेषण

मानवी दुष्कर्मांना अनुसरुन होणाऱ्या कर्मांचे भोगसंधान ज्या घटात साठले जाते त्या घटाला पाप घट म्हणतात. पाप घटाद्वारे मानव कधीही योग्य मार्गावर प्रवाहीत होत नाही. घाणेरड्या अंतरिक व बाह्य कर्मांमुळे पाप घटाच्या दलदलीत अनायासे फसत जातो. त्या वेळी पाप घटाची मर्यादा संपते तेव्हा नरकगामी दाहकुंभीपाकात पडुन सहस्त्रवर्षे अनंत दुःख भोगत बसतो. अशा दुर्दैवी व तामसी संगतीचा नेहमी त्याग करावा. पाप कर्मे करताना मानवाने त्यांचे परिणामपुर्वक मनन केल्यास बुद्धी एकदातरी सावध होण्याचा ईशारा देतेच. ह्या पाप घटाचे पाप कुंभात रुपांतार झाल्यास त्या दुष्कर्मी मानवाचा उद्धार होणे अती कठीण...! 

३. नाम घट व नवविधा तत्वविश्लेषण

मानवी अकर्मांना अनुसरुन होणाऱ्या स्वामीकर्माचे शिवयोगी आत्मसंधान ज्या घटात साठले जाते त्या घटाला नाम घट म्हणतात. नामघटाद्वारे मानवाच्या सर्व कर्मांचे क्षालन होऊन त्याचा योगक्षेम साक्षात सद्गुरु महाराज चालवतात. नाम घटाच्या आत्म वहनाने मानव जीवनमुक्त अवस्था प्राप्त करुन घेतो. नाम घटाच्या परिपक्वतेने नाम घटाचे नाम कुंभात रुपांतरण होते. ज्याप्रमाणे घरातील नवरात्रीला बसवण्यात येणाऱ्या घटाला सजल घट म्हणतात. त्याचप्रमाणे देहातीत श्री विद्या अथवा सद्गुरु विद्या कलश स्थापनेला सतेज घट असे म्हणतात. सद्गुरु महाराजांच्या आज्ञेने संबंधित साधकाचे सतेज नाम घटाचे नाम कुंभात परीवर्तन झाल्यास त्त विभुती राजयोग सिद्धावस्थेला येतो. त्या अर्थी नाम घटाचे नाम कुंभात व नाम कुंभाचे नामामृत सुवर्ण कुंभात परीवर्तन होते. ही क्रीया दिर्घ काळाची आहे. कृपया ९ दिवसात अथवा एका वर्षात घडत नाही. आपलं जीवन महाराजांना समर्पित केल्यास सरासरी १ तपानंतर संबंधित बुद्धी प्रकट होते. 


भारतीय संस्कृतीत नवरात्री शक्ती साधनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. अशा आत्म निर्भरी साधनेला स्वतःच्या स्वाधिष्ठानातुन उर्ध्वमुखी करण्याचे आत्मप्रयोजन असल्यास प्रामाणिक व पारदर्शकपणा तर असायलाच पाहीजे. जेणे करुन शक्ती साधनेशी जोडलेले शिवा मंडळ, योगिनी मंडळ, भूत वेताली मंडळ आणि भैरवी यंत्र मंडळाच्या नजरेत आपण सहजच येऊ शकु. त्यायोगे सद्गुरु कृपेची सुमेरुयुक्त आवश्यकता आहे. विना गुरु आपण कधीही शक्ती उपासना करु नये कारण साधनेत काही गफलत, त्रुटी अथवा चुकी घडल्यास संबंधित शक्ती आधिष्ठान रक्षण करण्याऐवाजी आपलं भक्षणच करेल. असे अनेक प्रकार आम्ही पाहीले आहेत. कृपया स्वार्थी हेतुने कोणत्याही कठोर दशमहाविद्या, नवदुर्गा अथवा चौसष्ठ योगिन वेतालीयुक्त कठोर साधनेत सद्गुरुंच्या मार्गदर्शनाशिवाय सहभागी होऊ नये. सुरवात सहज सोपी वाटणे स्वाभाविक असते पण कालांतराने विचित्र मानसिकतेला बळी पडण्याचा संभव उद्भवतो. त्याअर्थी सद्गुरु महाराजच आपले योग्य मार्गदर्शन करतात. 

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?

त्राटकाद्वारे रोगोपचार ( Tratak therapy ) - १

स्फटिकगोलदर्शन त्राटक ( Crystal Gazing ) - गोलक दिव्यदृष्टी साधना

पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!

आध्यात्मिक श्रीफळ व चारित्र्यपूजनाचे माहात्म्य ( Spiritual Disciplines )

भगवती महाकाली( Goddess Mahakali ) साधना सुमेरु तत्व विश्लेषण व शक्ति उपासना - १





0