अध्यात्माअभावी मानवी जीवनाची दुरावस्था आणि शेवट- Read right Now


प्रापंचिक महाभारत आणि अध्यात्मिक रामायणात अनुक्रमे वर्चस्व्‍ आणि विजय प्राप्त् करणाराच कैवल्य् पदाला जावून पोचतो. संसार करावयाचा नसतो. तो आपोआप होत असतो. अध्यात्म्‍ आपोआप होत नसतं, तर ते करायचं असतं. पण लोक उलट करतात.

प्रापंचिक महाभारत आणि अध्यात्मिक रामायणात अनुक्रमे वर्चस्व्‍  आणि विजय प्राप्त् करणाराच कैवल्य् पदाला जावून पोचतो. संसार करावयाचा नसतो. तो आपोआप होत असतो. अध्यात्म्‍ आपोआप होत नसतं, तर ते करायचं असतं. पण लोक उलट करतात.

काजळी पेक्षाही कलंक काळा आहे. पृथ्वीपेक्षा जड प्रकृती आहे. अणू-रेणू-जीव-जंतु-पृथ्वी-अंतराळ- त्रिलोक हे सगळं प्रकृतीमध्ये सामावलेले आहे. शिवाने सृष्टी निर्मितीसाठी प्रकृती आणि पुरुषाची निर्मिती केली. सृष्टी निर्मितीनंतर जीव प्रकृतीच्या अंमलाखाली आल्याने स्वत्:चे मूळ स्वरुप विसरला. प्रकृती जड आहे म्हणुन तो भटकला. कर्माच्या खेळाने अधिकच सुस्तावला. साधु-योगीजनांनी  प्रकृतीच्या हया खेळाला माया म्हटले आहे.

कबीर माया जिनि मिले, सौ बरियॉ दे बॉह l नारद से मुनियर मिले, किसे भरौसॉ त्यॉह ll

प्रकृती वजनाने हलकी होणं म्हणजे मन, बुध्दी व शरीर यांवरील गुरुत्वाकर्षण नाहीसं होणं. अर्थात देहात आणि देहापलिकडे जावून अनुभवता आलं म्हणजे ही क्रिया होते. त्यासाठी नामस्म्रणच करायला पाहीजे असं नाही. पण एवढंही कुणी करत नाही.
    
जीवाला लागलेली चटक. मग ती देहवासनेची असो कि अन्य् लालसा अथवा हव्यासाची. प्रार्थना आणि विश्वास अदृश्य् असतात तसेच अहंकार आणि वासना व मोह देखील अदृश्य्च असतात. पण देहाला सर्वनाशासाठी कसं वाकवायला तत्पर् असतात ?.  आपणच आपली वासना, अहंकार, लालसा, हव्यासाला पाहीजे असलेलं खादय नित्य् नेमाने पुरवित असतो. त्यामुळे त्या कमी न होता अधिकच पोसल्या जातात. मन आणि बुध्दीला व देहाला त्या आतुन घटट जखडून ठेवतात. त्यामुळे हयांच्या ताब्यातुन बाहयमन सुटून अंतर्मनाकडे जावू शकत नाही. परिणामी मन बुध्दीच्या ताब्यात येवून, नामाशिवाय भगवत्म्य अंत:करणाची निर्मिती होवू शकत नाही. म्हणुन जीवाच्या  अधोमुखी पिंडात कायापालट होवू शकत नाही.


शरीरातील वासनाबिजाचे दहन झाल्याशिवाय जीव योग, ध्यान आणि अर्थपुर्ण नामस्मरणाचे माध्यमातुन प्रकृतीच्या कक्षेबाहेर येवू शकत नाही. त्यामुळे जीवाला निगुर्णापलीकडे असलेला शिव आणि देहात असलेला जीव हा एकच असल्याचे कळत नाही. परिणामी त्याच त्या संसारात  राहूनही संसाराचा सार कळत नाही. किंबहुना संसार आणि विखार यातला फरक मिळत नाही. वासनेचा जोर वाढतच रहातो. व्यसन् व्याभिचार  करुनही ती शमत नाही.

जीवाने संचित कर्मामधुन सोबत आणलेल्या प्रारब्धात जोवर चांगले कर्म आहेत, तोवर तो भौतिक सुखाच्या गादीवर लोळून, गात्रांची कामना पुर्ती करीत राहतो. ते संपले की, मग जीवनात संकटे आणि दु:खांची मालिका सुरु होते. जीवाला स्व्त:च्या सामर्थ्याबाबत इतका काळ जी अहंता निर्माण झालेली असते, ती केवळ कपोल कल्पना असल्याचेच त्याचे दृष्टीपथात येते.

कबीरा तेरे पुण्य्‍ का जब तक रहो भंडार l तब तक अवगुण माफ है करो गुनाह हजार ll

मग त्याची पाऊले मंदीरे आणि मठाकडे वळायला लागतात. एक देव झाला कि दुसरा, मग तिसरा. पण दगडाचा देव बोलत नसल्याचा बोध होतो.देव कधीच भौतिक मागणी पुर्ण करीत नाही. हयातुन जीव वैतागून देवाला बोलते करण्यासाठी- देवाच्या मनधरणीसाठी देवांच्या प्रख्यात मध्यस्थांकडे धाव घ्यायला लागतो. हयांचे गळाला लागल्यावर तर जीवाची अवस्था अक्षरश: मेल्याहून मेल्यासारखी होते. दुरुन दिसणा-या त्या तेजपुंज चेह-यांमागचे जवळची वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे  कळायला लागते.  

अध्यात्मिक अधिष्ठान नसलेल्या देहातील आत्मा तर क्षयरोग्यापेक्षाही जास्त् जर्जर होवून बसतो. मग त्या देहावर पितृदोष, वास्तुदोष, स्व्त:च्या दुष्कर्माचे भोग, सोबतच भूतकाळात ज्याचेवर अन्याय केला त्याच्या आत्म्याची हाय ही शाप, आत्म्घात, अथवा दोषांच्या स्वरुपात मानगुटीवर बसते. इतका वेळ दबा धरुन बसलेल्या नकारात्म्क शक्ती देखील आपला डाव साधायला लागतात. एकाचवेळी हजारो आघाडयांवर हे महाभारताचे युदध सुरु असते. एकटा अभिमन्यू हया चक्रव्युहात लढत असतो. मग एखादया अवसानघातकी समयी अखेर तो धारातिर्थी पडतो. हीच आजच्या आधुनिक काळातील बहुतांश मानवांची थोडया बहुत फरकाने असलेली जीवनस्थिती आहे.
 
   

प्रापंचिक महाभारत आणि अध्यात्मिक रामायणात अनुक्रमे वर्चस्व्‍ आणि विजय प्राप्त् करणाराच कैवल्य् पदाला जावून पोचतो. संसार करावयाचा नसतो. तो आपोआप होत असतो. अध्यात्म्‍ आपोआप होत नसतं, तर ते करायचं असतं. पण लोक उलट करतात. जीवनाच्या हया नदीच्या उलटया प्रवाहात सरळ मार्गाने भोगी विलासी जीवन जगण्याच्या प्रयत्नात ते कधी संपून जातात हेच त्यांना कळत नाही. आणि ज्यावेळी योग्य् वेळ येते त्यावेळी काही ठेवायला विश्वास शिल्लक् रहात नाही. केवळ  भौतिक कामनांची पूर्ती करीत बसल्याने हे ही नाही व तेही नाही अशी स्थिती होवून बसते. आणि नेमका जीव कशाने गेला तेही कळत नाही.

वर विश्द केलेल्याप्रमाणे आपल्या जीवनाचे मार्गक्रमण होत असेल वेळीच सावध व्हावे. दत्तप्रबोधिनीच्या  blog.dattaprabodhinee.org  हया संकेत स्थ्ळावर जावून, निखळ अध्यात्माबाबत जाणून घेवून,  भौतिक जीवनात अशा प्रकारची वादळे निर्माण झाल्यावर काय कार्य करावे याबाबत मार्गदर्शन घ्यावे. व पुढील आत्म्क्रमण सुनिश्चित करावे असे वाटते. मनुष्य् जीवन ज्या ध्येय प्राप्तीसाठी परमात्म्याने सुनिश्चित केलेले आहे, ती ध्येय प्राप्ती व्हावी हया हेतुने दत्तप्रबोधिनी कार्यरत आहे. 

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...