व्यवसाय अथवा नोकरीत त्रास होणाऱ्या महिलावर्गासाठी विशेष तोडगा


आर्थिक चिंतेने पीडलेल्या अनेक माता माऊली समाजात आहेत. मोठा प्रपंच व पतीचे अल्प उत्पन्न यामुळे त्यांना नित्याच्या गरजाही भागविणे कठीण होते. काही महिला स्वतः अल्पशिक्षित असल्यामुळे त्यांना काही उद्योग, नोकरीही फार काळ करता येत नाही अथवा टिकाव लागत नाही. यात त्यांच्या संघर्षाची तर परिसीमाच ओलांडुन जाते. अशा माता माऊलींनी ईश्वराची सद्गुरुस्वरुपात काही उपासना केली तर त्यांच्या कृपेने घरात लक्ष्मी येते हे निश्चितच सत्य आहे. घरात व समाजात अतोनात कष्ट करणाऱ्या देवीस्वरुप महिलांना विशिष्ट संरक्षणात्मक ( Protected ) आधार मिळुन आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.

परिवाराची खळगी भरायला समाजासोबत त्यांना दोन हात करावेच लागतात आणि त्या वस्तुस्थितीला पर्याय नसतो. म्हणुन माता माऊलींनी हि सोपी व सहज उपासना केली तर जीवनात मानसिक व आर्थिक दैवी आधार प्राप्त होणार ! 


जसा विचार तशी घटना घडते हा मानसशास्त्राचा सिद्धांत.  यासाठी माता माऊलींनी ही उपासना सुरू करण्यापूर्वी सुमारे एक महिना नेहमी असा विचार ठेवावा की ' काहीतरी अगम्य रीतीने मला खूप पैसे मिळणार आहेत.'  रोज रोज हा विचार मनात आल्यामुळे ती बलवान व प्रवाही होऊन अंतर्मनात जाणे शक्य आहे.  ही विचारकृती कालांतराने मूर्त स्वरूपात ( materialize ) येईल यात शंका नाही,  

माता माऊलींनी या योगक्रियेचा अनुभव घेऊन पाहण्यास काहीच हरकत नाही.  एक महिना अशा अवस्थेत राहिल्यावर शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत रोज पुढील व्रत करावे :  एका शुभ्र कागदावर केशराने चंद्राची कोर व शनीची आकृती काढावी.  चंद्राच्या वरील भागात शनीची आकृती असावी.  शनी ला कंकण काढावे.  नंतर एका पाटावर तांब्या ठेवून त्यात एक रुपयाचे  नाणे ,  मूठभर गहू,  पाव वार कापड , एक हिरडा व मूठभर नागकेशर घालावे.  तांब्यावर तो कागद ठेवून सुवासिक फुलाने पाणी शिंपडावे.  नंतर कागदाला गंध, फूल व हळदकुंकू वहावे.  साजूक तुपाचे निरांजन व सुवासिक उदबत्ती ओवळावी.  खोबऱ्याच्या वाटीत पाच खारका घालून त्या तांब्यासमोर ठेवून त्यांचा नैवेद्य  दाखवावा.  

कागदावर हात ठेवून  "ॐ नमो विष्णवे नमः"  या मंत्राचा 108 वेळा एकाग्र चित्ताने जप करताना डोळे मिटून घ्यावेत म्हणजे मन एकाग्र होण्यास मदत होते.  जप संपल्यावर निरांजनाकडे एकाच दृष्टीने 2-3 मिनिटे पाहावे.  ज्योतीत तुम्हाला अनेक वेळेला काही दैवी आकृती दिसतील,  इतके झाले म्हणजे उपासना संपली असे समजावे.  असे व्रत आठ दिवस करावे.  या आठ दिवसांत उपास करण्याची जरुरी नाही.  फक्त जेवणात कांदा व लसूण नसावी.  सात दिवस व्रतस्थ राहावे व शक्यतो कोणाशी बोलू नये.  आठव्या दिवशी जेवणात काही पक्वान्ने करावे व त्याचा देवाला नैवेद्य दाखवावा.  आठ दिवस पूर्वेकडे तोंड करून झोपावे. हे व्रत केल्यावर तुमच्या पतीला अगर तुम्हांला अगम्य रीतीने पैसे मिळविण्याचे योग येतील.  तुम्ही काहीही उद्योग करा किंवा नोकरी करा ; त्यात आर्थिक यश येऊन तुमचा संसार मंगल होईल.  या उपासनेत शनीचंद्र युती व भगवान विष्णूचे आवाहन आहे.  जेथे विष्णू तेथे लक्ष्मी या न्यायाने ही उपासना केल्यास तुमच्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य शाश्वत होऊल, हे त्रिवार सत्य.


महत्त्वाची सुचना: 


नोकरीत छळवणुक सहन करणाऱ्या महिला व पुरुषवर्गासाठी गोपनीय श्री कालभैरव साधना अग्रणीय आहे. याहेतु सभासद होणे आवश्यक आहे. फक्त गंभीर व प्रामाणिक व्यक्तींनीच संपर्क करावा


श्री दत्त जय दत्त

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
All about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !


Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code BelowPost a Comment

0 Comments