चांगला पती मिळावा यासाठी अनुभवसिद्ध अत्यंत प्रभावकारक श्री कृष्ण गोपाळ व्रत. Lagna honyasathi upay todage


मनाप्रमाणे विवाह होऊन चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत कुमारिकांनी करावयाचे असते. एका रविवारी सायंकाळी पावशेर अच्छेर दूध निराळे आणून (रोजच्या रातिबातील नको)  ते तापवून विरजावे.  

सोमवारी सकाळी स्नान करून पांढरे पातळ व ब्लाऊज परिधान करावा.  केसात शक्य तो पांढरी फुले माळावीत.  प्रसन्न चित्ताने ते दही रवीने घुसळून त्याचे निघेल तेवढे लोणी एका चांदीच्या नैवेद्याच्या वाटीत ठेवावे.  ( चांदीची वाटी नसेल तर दुसरी कसलीही वाटी वापरण्यास हरकत नाही.)  व त्यावर दोन तुळशीपत्रे व खडीसाखरेचे २-४ खडे ठेवून मनोमनी गोपाळकृष्णास नैवेद्य दाखवावा.  नंतर प्रार्थना करावी की, "गोपाळकृष्णा, मी तुझी एक लेक आहे.  माझा विवाह उत्तम रीतीने पार पडून मला पति-सुख लाभण्यासाठी  व सौभाग्यासाठी मी तुला हा नैवेद्य अर्पण करीत आहे.  तो गॉड मानून माझी मन:कामना पूर्ण करावीस अशी प्रार्थना आहे."  नंतर लोणी-साखर स्वतः खावी इतरांस देऊ नये, असे चार सोमवार व्रत करावे.  


चौथ्या सोमवारी वरीलप्रमाणेच नैवेद्य दाखवावा,  घरात मोठे आनंदी वातावरण असावे.  काही तरी  गोडधोड करावे व ताट तयार करून गोपाळकृष्णाला नैवेद्य दाखवावा.  नंतर गोग्रास  घालावा व कुत्र्याला चतकोर-अर्धी भाकरी अगर पोळी टाकावी.  शक्य तो पक्ष्यासाठी भाकरी-पोळीचे तुकडे करून टाकावेत.  त्या दिवशी भोजनास इतर लोकांस बोलावू नये.

मासिक पाळीची अडचण निर्माण झाल्यास पुढील सोमवारी व्रत करावे.  परत चार सोमवारी व्रत करण्याची जरूर नाही.

भगवान गोपाळकृष्णाला अशा रीतीने प्रसन्न केल्यावर तो परमात्मा मुलीच्या मागे उभा राहून तिचे कल्याण करतो हे निश्चित.  मी हे व्रत अनेक भगिनींना सांगितले आहे व सर्वांनाच आश्चर्यकारक अनुभव आला हे लिहिण्यास आनंद वाटतो.  भगिनींनो, आपणही हे अत्यंत दिनखर्चाचे व प्रभावी व्रत करून सुखी व्हा !
 खलील सूचना लक्षात ठेवा

 


  • (१)  सोमवारी उपास करण्याची जरूर नाही.  मात्र त्या दिवशी कांदा व लसून खाऊ नये.
  • (२)  शुभ्र किंवा आळणी पदार्थच न खाता नेहमीचे जेवण करावे.
  • (३)  शेवटच्या दिवशी गोड जेवण व्रत करणाऱ्या  भगिनींनी जरूर जेवावे,  त्या दिवशी उपास करण्याची आवश्यकता नाही.
  • (४)  लोणी काढल्यावर उरलेल्या ताकाची कढी करून सर्वांनी खावी.
  • (५)  व्रत मोठ्या श्रद्धेने करावे.  सोमवारी गोपाळकृष्ण आपला पिता आहे असा भाव दिवसभर ठेवावा.  त्वरित शुभ अनुभव येईल.
  • (६)  रात्री पांढरे पातळ वैगेरे बदलण्यास हरकत नाही.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

वास्तु दिशा रहस्य - Real unknown secrets explainedPost a Comment

0 Comments

0