आकस्मात अपघात टाळण्याहेतु बाईक, कार व अवजड वाहनांसाठी संरक्षणात्मक प्रभावी ' वाहन यंत्र ' - Protection Yantra


आज कोणतेही वाहन रस्त्यावर सुरक्षितपणे चालवणे ; विशेषतः हेवी ट्रेफिक आणि एक्सप्रेस मार्गावर अतिशय कठीण झाले आहे. बहुतेक वेळी आपली गाडी चालवताना काहीही चुकी नसताना आजुबाजूने किंवा पाठीमागुन कोणीही गाडी ठोकणे अथवा क्षती पोहोचवण्याचे प्रसंग घडत असतात.


माझ्या पहाण्यात काही ठिकाणी अदृश्य शक्तींद्वारे अपघात घडवला गेलेला पहाण्यात आला आहे. अशा नकारात्मक ऊर्जा बाईकस्वार, कार चालकाला काळाच्या आवेशात ओढुन घेतात. या नकारात्मक शक्तीला ' तुल्पा ' असे म्हणतात. हि शक्ती तीन रस्ता, चार रस्ता अथवा अधिक रस्ते एकत्र येणाऱ्या ठिकाणी जमिनी अंतर्गत वास करतात.

एक प्रकारची काळी सावलीच्या रुपात बरेच ओढले गेलेले प्रेत पिशाच्च एकत्र येऊन तुल्पा समुह बनतो त्याची उच्चस्तरीय शक्ती संक्रमणाची वेळ सरासरी रोज रात्री १२ ते ३ व दुपारी १२ ते ३ मधे असते. अशा वेळी वाहने जरा जपुन चालवावीत.


आज सर्व जणं कोणते ना कोणते वाहन चालवतच असतात म्हणुन वाहन चालवताना अपघात होऊ नये यासाठी खालीलप्रमाणे उपाय दत्तप्रबोधिनी ट्रस्टद्वारे प्रकाशित करत आहोत.

एक कोरा जाड कागद घेऊन त्यावर दिलेले यंत्र काढावेत.


 हे यंत्र पाटावर ठेवुन त्यासमोर बसावे. नंतर चौकटीतील एका आकड्यावर बोट ठेवुन खालील मंत्र जितका आकडा असेल तितका संख्या जप करावा. जसे सात आकड्यावर बोट ठेवले म्हणजे सात वेळा जप झाला पाहिजे.
मंत्र
" अंजनीसुत हनुमान रक्षतु रक्षतु स्वस्ति "

असे प्रत्येक चौकटीवर बोट ठेवुन मंत्रोच्चार करावा. नंतर सहाण्यावर हिरडा उगळुन त्याचा गंध तयार करा. ते प्रत्येक चौकटीला वाहावेत. उदबत्ती ओवाळुन रुईच्या वाळलेल्या पानांचा धुप करावा. नंतर त्या यंत्राला फुटाणे गुळाचा नैवेद्य ठेवावा. इतके झाल्यावर यंत्राची घडी करुन लाल कापडात घट्ट शिवुन घ्यावे.

गाडी चालवताना हे नेहमी खिशात ठेवावे. वाहनाला बांधु नये. हनुमान देवता ड्रायव्हरचे रक्षण करते. हे यंत्र एखाद्या पौर्णिमेला तयार करावेत. चार पौर्णिमेनंतर पाचव्या पौर्णिमेला परत नवीन यंत्र बनवणे अगत्याचे आहे.


वाहानात ड्रायव्हर सोबत बसणार्या व्यक्तींनीही हे यंत्र बाळगण्यास हरकत नाही. टँक्सी चालक, रिक्षावाले व वैमानिकाने यंत्राचा उपयोग साधुन आकस्मात होणारे अपघात टाळावेत. हे यंत्र बाळगण्यात काहीहि बंधने नाहित. फक्त गाडीवर बसताना यंत्र खिशातुन काढुन काही क्षण यंत्राकडे बघुन मंत्र स्मरुन परत खिशात ठेवा.

श्रीरामदुत मारुतीच्या अगम्य शक्तीवर श्रद्धा व विश्वास ठेवा. 


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
Post a Comment

0 Comments

0