आत्मक्रिया योग व सहज समाधि प्रबोधन: त्राटकाद्वारे रोगोपचार ( Tratak therapy ) - १ SEO

Dattaprabodhinee Sevaa Trust’ was started in the year 2014 with a vision to create a non-profit humanitarian proficient area for spiritual people to actively engage them in soulistic existences.

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

मंगळवार, ५ जुलै, २०१६

त्राटकाद्वारे रोगोपचार ( Tratak therapy ) - १


आपल्या ईच्छ्याशक्तीच्या बळावर व प्राणशक्ती संक्रमणावर व्याधीग्रस्ताची व्याधीतून मुक्तता करणे हेतु साधकाचा आपल्या विद्येवर पुर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. विश्वास हेच या त्राटक विद्येचे मुख्य तत्व आहे. ज्याच्या अंतःकरणात दृढ विश्वास आहे, त्यालाच फलप्राप्ती आहे.


http://blog.dattaprabodhinee.org/2016/09/tratak-therapy.html

मानवी जीवनात व्याधी, व्यसन, पीडा, दोष व रोगांची वर्णी असणे तर स्वाभाविकच आहे. संंबंधित त्रास अनायासे काळाच्या ओघाने आपल्या प्रकृतीवर घात करतात. कदाचित त्याच वेळी आपल्याला जीवनाची खरी ओळख कळत असावी. मनुष्य संबंधित मानसिक अथवा शारीरिक पीडेच्या असहनीय अवस्थेत गेल्यावरच सद्बुद्धीच्या दृष्टिकोनातून विचार विनीमय करतो. तोपर्यंत स्वतः अमर अथवा चिरंजीवी समजुन समाजात वाळवी किड्याचे जीवन जगतो. हिच वृत्ती खोडुन काढण्यासाठी आज संबंधित रोगांबद्दल आवश्यक व निवडक माहीती देत आहे.

सामान्यतः दैहिक रोगांचे दोन प्रकार पहीला मानसिक रोग व दुसरा शारीरिक रोग असे आहेत. मानसिक रोगांवर त्राटकाद्वारे उपचार गेले बरेच आठवडे मी अमलात आणत आहे. त्यायोगे संबंधित मानसिक पीडेवर प्रभावकारक परिणाम पाहीले आहेत. त्यापैकी काही आवश्यक व सर्वसामान्य स्तरावरील त्राटक चिकित्सा माहीती प्रकाशित करत आहे. ही माहीती प्रत्यक्षात माझ्या सान्निध्यात असलेल्या व्याधीग्रस्त लोकांचे सुक्ष्मवादात्मक संरुपण आहे. ह्या मानसिक व्याधींचा परिणाम आज समाजात ९८% आहे. त्यायोगे मला योग्य माहीती पाठवणे महत्त्वाचे वाटते.

समाजात सर्वसामान्य स्तरावर मानवी दैनंदिन जीवानात हस्तमैथुन हा प्रकार निदर्शनास येत आहे. संंबंधित पीडाग्रस्तांचे मनोगत त्यांच्या मानसिक सुक्ष्मवादावरुन निदर्शनास येते. त्यायोगे हस्तमैथुनाचा आपल्या जीवनात मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक परिणाम काय आहेत हे खालीलप्रमाणे आहे.

१. हस्तमैथुनाचा मानवी मानसिकतेशी संबंध

संबंधित व्याधी व्यसनाच्याच माध्यमातुन आपल्या मानसिकतेवर तणाव उत्पन्न करते. हा तणाव भार तात्काळ कमी होणे हेतु हस्थमैथुनादी क्रिया केल्या जातात. ह्या संबंधि आपल्या बर्हीमनातील तणाव नियंत्रण करण्याचे सामंजस्यत्व कमी होऊन आपली भुमिका असंयमी व आक्रमक होते. या स्वभावातील आतिरेक समाजात तीव्रतेने उमटुन गुन्हे अथवा कांड घडत आहेत. हस्तमैथुनामुळे मानसिक स्तरावर होणारा दुर्बल, अस्थिर व असामंजस्य प्रभाव कमी होणे हेतु खालीलप्रमाणे दोन पर्याय आहेत.

१. दैनंदिन स्वरुपात संबंधीत क्रिया न करणे. जास्तीतजास्त नैसर्गिक स्वरुपात आठवड्यातुन एक वेळ अथवा पंधरावड्यातुन एक दोन वेळा केल्यास ( दररोज नाही ) अस्थिर मानसिकता नियंत्रणात येण्यास मदत होईल.

२. त्राटक साधनेतुन मानसिक बळ वाढवुन संबंधित व्याधीवर अंकुश बसवणें व संयमीवृत्तीतुन जीवनात स्थैर्य प्रस्थापित करणे.

२. हस्तमैथुनाचा मानवी शरिराचा संबंध

देहातील धातु उत्सर्जन क्रिया हा एक शरिराचा अद्वीतीय देहधर्मच आहे. संबंधित क्रियेचा मानवी देहावर सखोल परिणाम होत नाही. काही प्रमाणात देहात अशक्तपणाची भावना येते पण मुळात संंबंधित क्रियेमुळे अशक्तपणाही येत नाही. हा फक्त आपल्या मनाचा खेळ समजावा. ह्या व्याधीचा शारीरिक अवस्थेवर काही परीणाम होत नाही.

३. हस्तमैथुनाचा मानवी आध्यात्मिकतेशी संबंध

योगी, सिद्धपुरुष अथवा महात्मे त्यांच्या जीवन काळात कोपीन्य ( लंगोट )घालत असत. कारण जोपर्यंत शरिरधर्म आहे तोपर्यंत वासनेला देहात घर करुन न देणे. यासाठीच कमरेला घट्टवस्त्रांची तयारी केली जात असे. त्या अर्थी अंतर्बाह्य दोन्हीही माध्यमातून संबंधित वासनाकृत व्याधींचे अतिक्रमण होणार नाही याची प्राधान्यतः दक्षता घेतली जात असे. ह्या स्वभावाला अनुसरुन योगीजने आपल्या सद्गुरु साधनेत अतिउच्च स्तरावर पोहोचत आणि सहज समाधी अवस्था प्राप्त करुन घेत असत.

हस्तमैथुनाचा आध्यात्मिक जीवनावर फारच मोठा परिणाम होतो. त्यामधे आपल्या देहातील सुक्ष्म चैतन्य व संबंधित दैवीशक्तींचा अविर्भाव होण्यास अवरोध उत्पन्न होतो. नामस्मरण, पारायण, योग क्रीया व तत्वचिंतनातुन इत्मज्ञानाची वृद्धी होते परंतु दैवीशक्तींचा देह व देहातीत अविर्भाव होणे हेतु हस्तमैथुन न केलेले योग्य. ज्या साधकांना आध्यात्मिक जीवनात इहलौकिक व पारलौकिक सामर्थ्य अनुभवण्याची ईच्छ्या आहे त्यांनी आध्यात्मिक जीवनात हस्तमैथुनादी कर्म टाळावेत. जेणेकरुन झालेल्या आत्मश्रमाचे फलित योग्यप्रकारे प्राप्त होऊन त्यातुनच भावी साधना साध्य करता येईल. हस्तमैथुनामुळे आध्यात्मिक जीवनात होणाऱ्या त्रासाचे निराकरण करण्याहेतु खालीलप्रमाणे मार्ग आहेत.

१. स्वतः कोपीन्य धारण करुन स्वतःशी कर्मगाठ मारुन घ्यावी व विघ्नदायक संबंधित क्रिया टाळावी.

२. हस्तमैथुनामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई त्राटक विद्येतुन करता येते. त्यायोगे आपल्या प्रकृतिला अनुसरुन योग्य असलेल्या त्राटकविद्येवर दररोज ( प्रारंभिक ) फक्त ५ मिनिटे मार्गदर्शनयुक्त सराव केल्यास, आपले हरवलेले चैतन्य काही महीन्यातच परत प्राप्त होईल. जेणेकरुन आध्यात्मिक जीवनात बळ येऊन दत्त महाराज व आपल्यातील चैतन्यापायी रिक्त असलेली जागा योग्यप्रमाणात भरुन काढता येईल.

अशाप्रकारे परिपक्वतेला येण्यास ईच्छुक साधकांसाठी आजची निवडक माहीती पाठवली आहे. जेणेकरुन आपण न्युनगंडातुन बाहेर येऊन भौतिक व आध्यात्मिक स्तरावर चांगल्याप्रकारे अग्रेसर होऊ शकता.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
महत्त्वाची सुचना :

संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Enter your email address:

Delivered by FeedBurner

लोकप्रिय पोस्ट

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज