स्फटिकगोलदर्शन त्राटक Crystal Gazing - गोलक दिव्यदृष्टी साधना

काचेच्या गोळ्यात पाहुन भविष्यातील घडामोडींचे पुर्व ज्ञान करवुन देणारी स्फटिकगोलदर्शन त्राटक विद्या अतिप्राचीन काळापासुन अनेक देशांत पाहाण्यात आली. गोळ्या पाहुन भुत - भविष्याचे वर्णन करता येते मात्र त्यासाठी साधनेची तयारी अतिशय उच्च स्तरावर असायला पाहीजे. खुप पुर्वी पार्शियन लोक काचेच्या गोळ्यात पाहुन भविष्य सांगत असत. रोमच्या ईतिहासत आरश्यात पाहुन भवितव्य सांगण्याचे प्रकार त्यांच्या ग्रंथात उल्लेखित आहेत. ग्रीस देशात स्वच्छ आरशात पाहुन परलोकातील व्यक्ती व स्थळाचे वर्णन करत असत. जगज्जेता अँलेक्झाँडरने सुद्धा काचेच्या गोळ्याचा उपयोग केल्याने दोन - तीन दिवसापुर्वीच शत्रुची जहाजे आपल्यावर सर होत आहेत हे ओळखुन घेत असे. 

स्फटिकगोलदर्शन त्राटक साधनेचे महत्व

स्फटिकगोलदर्शन त्राटक करण्यापुर्वी साधकाने प्रतिबिंब त्राटकाचा चांगला अभ्यास करायला हवा. त्यायोगे गोळ्याच त्राटक योग्यप्रकारे अनुभवीत करेल यात शंका नाही. जेव्हा आपण एकाग्र मनाने समोरच्या गोलात पाहात असतो, तेव्हा आपले जागृत मन हळुहळु लुप्त होत असते त्यायोगे आपण मनात आणलेले देखावे आपल्या अंतर्मनात प्रतिबिंबीत होत असतात. जागृत मन लुप्त होताच अंतर्मनातील सुक्ष्म प्रतिबिंब देखाव्याच्या स्वरुपात गोलकाच्या प्रकाशात अनुभवास येतात. अंतर्मनात निर्माण झालेली विचाररुपी आकृती दृश्य स्वरुपात समोरच्रा गोलकात दिसायला लागते. ह्या साधनेची ही प्रार्थमिक अवस्था आहे.

साधकाला या साधनेतील परिपक्वतेसाठी स्वतःच्याच मनात व्यक्ती अथवा देखावे बघण्याची आवश्यकता नाही. यासाठी साधकाने आपल्या ऐखाद्या मित्राला गोलकाच्या पलिकडे बसवावे व त्याला बोलावं की, ' मी आता गोळ्यात पाहात आहे. तु तुझ्या मनात मी न पाहीलेले एखादे दृश्य किंवा व्यक्तीचे विचार आण ' विचाराबरोबरच त्याच्या मनात त्या घटनेचे व व्यक्तीचे प्रतिबिंब उभे राहील. त्याने मनाता आणलेला देखावा व व्यक्ती स्पष्टपृणे गोलकात दिसुन येतो. ही दृश्ये तंतोतंत मित्राला सांगितल्यास तो आश्चर्यचकितच होईल.

या प्रयोगात साधकाचे बर्हीमन जागृतावस्थेतुन लुप्त होऊन अंतर्मनाचा व्यापक व्यवहार सुरु होतो. अशाप्रकारे मित्राने मनात आणलेली आकृती साधकाच्या अंतर्मनात प्रतिबिंबित होऊन ती साधकाला गोळ्याच्या प्रकाशात स्पष्ट दिसते. गोळ्यात पाहुन एखाद्या दुरच्या गावातील घडत असलेल्या घटनेचे वर्णन करणे, आपल्या निकटवर्तीयाचे दुरवर होत असणाऱ्या कृतीची माहीती घेणे, भुत - भविष्य ज्ञान करवुन घेणे हे सर्व रहस्यमय पद्धतीने आज प्रचलित विद्यासाधने उपयोगात आहेत. काचेच्या गोळ्यात पाहाणार्या साधकाचे अंतर्मन कार्यप्रणव झालेले असल्यामुळे त्या नातलगाने पाहीलेला देखावा साधकाच्या अंतर्मनात प्रतिबिंबित होतो कारण अंतर्मान हे सर्वगामी व सर्वव्यापी आहे.

गोलाया दिसणारे दृश्य साधारणपणे तीन - चार मिनिटे टिकूनृ राहाते. काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यस मन ऐकाग्र केल्यास अनपेक्षित दृश्ये दिसायला लागतात. अशावेळी संबंधित दृश्यांचा तत्वाच्या आधारावर सुयोग्य अनुमान आपल्याला ग्रहण करता आले पाहीजे. साधकाचा जसजसा अभ्यास वाढत जाईल, तसा गोलकाचे स्थुलरुप डोळ्यांसमोरुन नाहीसे होत जाते व हळुहळु दिव्य प्रकाशवलयाची दृश्ये दिसायला लागतात. गोलकात दिसणाऱ्या दृश्यांची अर्थसंगती मात्र साधाकाला अचुक लावता आली पाहीजे. कारण एखादे शुल्लक दिसणारे दृश्यही अतिमहत्वाचे ठरते.

स्फटिकगोलदर्शन त्राटक साधनेत प्रगत अवस्थेला येण्यासाठी साधकाला अत्यंत चिकाटीची आवश्यकता आहे. याचबरोबर साधकाने दैनंदिन जीवनात शुद्ध व शुचितापूर्वक राहायला पाहीजे. संबंधित साधनेसाठी सत्वयुक्त, सात्विक अन्न व चांगल्या सवयींकडे लक्ष दिले पाहीजे.

स्फटिकगोलदर्शन त्राटक साधनेतील अतिसंवेदनशीलता लक्षात घेता विस्तारभयास्तव, अतिगहन व कृतीपुर्ण माहीती देणे संभव नाही. संंबंधित साधनेची सखोल माहीती व कृतीपुरस्कर जाण्यासाठी ' दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ' मधे संपर्क करावा.

महत्त्वाची टिप...

संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.