भगवती काली साधना कलियुगी माहात्म्य व आत्मविद्या गहनतादक्षिणेश्वर दैवतांमध्ये सद्गुरु दास्यभक्तांसाठी अत्यंत सात्विक, शांत व स्वभावाने भोळी अशी भगवती अंबा काली मातेची कृपा झाल्याशिवाय आपल्या देहातील पाप शरीराचे पुर्णतः विसर्जन होत नाही. ही कृपा होण्यासाठी प्रामाणिक व पारदर्शक प्रयत्नांची पराकाष्ठा करुन अंबेचा वरदहस्त कसा प्राप्त होईल व आपले अंर्तबाह्य शत्रुंचा नाश होऊन मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक उन्नतीहेतु राजमार्ग कसा प्रस्थापित होईल याच उद्देशाने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून संबंधित अभिलेख प्रकाशित करत आहोत.


दक्षिणेश्वर दैवतांमध्ये सद्गुरु दास्यभक्तांसाठी अत्यंत सात्विक, शांत व स्वभावाने भोळी अशी भगवती अंबा काली मातेची कृपा झाल्याशिवाय आपल्या देहातील पाप शरीराचे पुर्णतः विसर्जन होत नाही. ही कृपा होण्यासाठी प्रामाणिक व पारदर्शक प्रयत्नांची पराकाष्ठा करुन अंबेचा वरदहस्त कसा प्राप्त होईल व आपले अंर्तबाह्य शत्रुंचा नाश होऊन मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक उन्नतीहेतु राजमार्ग कसा प्रस्थापित होईल याच उद्देशाने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून संबंधित अभिलेख प्रकाशित करत आहोत.

भगवती काली मातेची उत्पत्ती पार्वती मातेच्या सावलीतुन झाली अशी पुराणोक्त कथानक आहे. ह्या सावलीचे स्वरुप म्हणुन आध्यात्मिक क्षेत्रात पाप देह असे गणले जाते. आपल्या स्थुल देहाची जमीनीवर पडणारी सावली ही आपल्या देहातील पाप शरीराचे अद्वैत द्योतक असते. ज्याक्षणी यौगिक स्तरावर उच्च अवस्थेला प्राप्त झालेल्या योगीयांच्या सावलीचे परिक्षालन होऊन ते सुर्यापेक्षाही अधिक तेजोमय होतात. अशा अवस्थेत सिद्ध पुरुष सुर्यग्रहस्थित हिरण्यलोकामधे आवागमन करु शकतो. श्री दत्तात्रेय स्वामी महाराजांच्या पाताळस्थित राजदरबारात १६००० महासिद्धपुरुष आणि हजार फण्यांचे सुवर्णकांतीमय नाग देवता सदैव महाराजांच्या चरण पादुकांच्या आश्रयात सेवारत असतात. सद्गुरु महाराजकृपे पाप देहाचे नाश झालेल्या योगियालाही महाराजांच्या चरण पादुकांचे दर्शन व सेवारत होण्यास अनमोल व परम दुर्लभ अशी सुक्ष्म संधी प्राप्त होते.


माता पार्वतीच्या सावलीतुन उत्पन्न झालेल्या क्रुर व निष्ठुर पण भक्तवत्सल अशा काली मातेची सेवा सद्गुरुंच्याच मार्गदर्शनाखाली होते. काली मातेच्या साधनेत प्रांरभावस्थेत असणाऱ्या साधकांनी संबंधित त्रिकोणीय चालीसा मंडळाचे महत्व सुरवातीलाच समजुन घ्यायला पाहीजे कारण आपण ज्या क्षणी भगवती काली मातेची जी काही साधना करण्यास प्रारंभ करतो त्या वेळेस अंबेच्या अनंग मंडळाकडे साधकाची फिर्याद येते. या चालीसा मंडळाचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे.  • १. बाह्य संरक्षक दैत्य व वेताळ शक्तीगण
  • २. मध्यम संरक्षित चौसष्ठ योगिनी शक्तीसमुह
  • ३. निकटवर्तीय भीषण भैरवादी गण व भैरवी द्विपसमुह
  • ४. स्वयं भगवती कालिका माता आधिष्ठान१. बाह्य संरक्षक दैत्य व वेताळ शक्तीगण

कोणत्याही साधकाने काली साधनेत प्रारंभ केल्यास साधकाची प्रार्थमिक भिडंत संबंधित दैत्य व वेताळ शक्तीगणांशी होते. उदा. तुम्ही तुमच्या कुलदैवत, ग्राम दैवत अथवा आराध्य दैवतांच्या प्रतिमेभोवती एक कमान पाहात असता. त्या कमानीवर वरच्या बाजुला बरोबर मधे बाह्य संरक्षक द्वारपाल दैत्य किर्तीमुख विराजमान असतो. ह्या दैत्यगणांसोबत कमानीच्या वेशीवर मोठ्या संख्येत वेताळादी गण तळ ठोकुन असतात. कोणताही साधक या शक्तीगणांचे आगाऊ व अतिरेकी वृत्तीने नियम उल्लंघन करुन पुढच्या शक्तीकक्षेत प्रवेश करु शकत नाही. अशा आगाऊ व मुर्खाचे हाल आम्ही जवळुन पाहीले आहे. त्यायोगे साधानेत प्रवेश करण्यापुर्वी संबंधीत कार्यप्रणाली व्यवस्थित समजुन घ्या.


२. मध्यम संरक्षित चौसष्ठ योगिनी शक्तीसमुह


प्रार्थमिक दैत्य किर्तीमुख आदी शक्तिगणांया आज्ञेनेच आपण पुढील शक्ती कक्षेत प्रवेश करु शकतो. त्यायैगे सद्गुरु महाराजांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे. ' मनोमार्गे जो गेला l तो सहज जीवाला मुकला ' हे ध्यानात ठेवावेत कारण आपण मृत्युवर आधिराज्य गाजवणार्या दैवतांशी व्यवहार करत आहोत हे समजुन घ्यावेत. आपल्या नितीमत्तेतील व कर्मातील एक चुक आपल्याला क्षती पोहोचवु शकते परंतु आपले आत्मसमर्पण व भक्तीभाव साक्षात वेताळादी भैरव गणांना आपल्याकडे सहज आत्मिकदृष्ट्या ओढु शकतो. त्यायोगे चोसष्ठ योगिनी शक्तीसमुहात पदार्पण करण्यापुर्वी संबंधित दैत्य व वेताळ गणांसोबत सख्यभक्तीयोगात्मक आचरण असणे महत्त्वाचे आहे जेणेकरुन तेच आपले पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करतात. चौसष्ठ यौगिनी मातासमुह भगवती काली मातेचे देहगण आहेत.


३. निकटवर्तीय भीषण भैरवादी गण व भैरवी द्वीपसमुह


चोसष्ठ योगिनी मातांच्या चरण अनुकंपाने पावन झालेल्या भक्तांना संसार सागारात कोणतेही दुःख हात लावु शकत नाही. योगी स्तरावर साधक सायुज्यमुक्तीचे संधान प्राप्त करतो. त्यायोगे भैरवावस्था आत्मस्थिती प्राप्त होऊन योगी भगवान श्री काळभैरव महाराजांच्या कृपाशीर्वादाने ६४ भैरव गणांच्या साक्षाकाराचा पदोपदी अनुभव घेत असतो. भगवान शिवाचे भवसागरातील शिवशक्तीस्वरुप काळभैरव आदी गणांच्या कृपा प्रसादानेच शक्ती उपासनेतील उच्चस्तरीय अवस्था साधकाला सहजा प्राप्त होते. श्री काळभैरव व ईतर भैरव अवतारांच्या आज्ञेशिवाय तीळमात्रही प्रगती होणार नाही, हे ध्यानात असायला हवे. त्यायोगेच संबंधित आध्यात्मिक परीपक्वता येते.


४. स्वयं भगवती कालीका माता आधिष्ठान


पंच तत्वयुक्त शक्तीमंडळाचे पंचप्राणातुन समग्र अवलोकनात्मक साधन, साध्य व सहज समाधी आत्मनिरुपणाद्वारेच आपण भगवती कालीका मातेचा वरदहस्त प्राप्त करु शकतो. पंचतत्वात अनुक्रमे सद्गुरु महाराज आधिष्ठान, दैत्य व वेताळादी गण, चौसष्ठ योगिनी गण, भैरवादी शक्तीसमुह व कालिका माता आधिष्ठान यांचे शिवस्वामीआत्मानुसंधान साधले पाहीजे.


या कलियुगात " कलौ चण्डीविनायक ' हे तत्व संचारीत आहे. याचा अर्थ असा की, ' कलिच्या या पर्वात साधकाला नितिमत्तेच्या जोरावर चार मंगलमय पुरुषार्थ व चार कुरुक्षेत्रीय युद्धात्मक पाठबळ येण्यासाठी प्रांरभी विनायकाच्या स्मरणाने काली उपासना करणे आवयक आहे.


भगवती कालिका मातेची साधना विधियुक्त व सद्गुरु तात्विक पद्धतीने कशी करावी यासाठी ' दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ' संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क करावा.ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?

त्राटकाद्वारे रोगोपचार ( Tratak therapy ) -

स्फटिकगोलदर्शन त्राटक ( Crystal Gazing ) - गोलक दिव्यदृष्टी साधना

पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!

आध्यात्मिक श्रीफळ व चारित्र्यपूजनाचे माहात्म्य ( Spiritual Disciplines )
संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीतीAll about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !


Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below