नजर लागू नये यासाठी उपाय - १ दिवसात फरक पडेल. nazar lagu naye mhanun upay


एखाद्या वाईट नजरेच्या व्यक्तीची दृष्टी जर लहान बालकावर, मोठ्या व्यक्तीवर, पशु पक्षी अथवा ईतर सुंदर वस्तुवर पडली म्हणजे त्याचे काय परीणाम होतात याची सर्वसामान्य कल्पना सर्व जणांना येत असते. दत्तप्रबोधिनी तत्वाधारे वाईट नजर कशाप्रकारे उतरवता येते हे पुढील प्रमाणे देत आहोत. 

दृष्ट लागणे म्हणजे निरोगी व समृद्ध मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक परिस्थितीत विस्मयकारक दुःखद बदल घडतात. उदा. लहान बालके आजारी पडणे व सतत रडणे, प्रौढ व्यक्तीला दृष्ट लागणे म्हणजे अपचन विकार, भुक मंदावणे व अर्थिक नुकसान आकस्मितरित्या होणे, गाई म्हशींचे दुध आटणे अर्थात त्यांच्या आचळातुन रक्त निघु लागणे, दृष्ट लागणे म्हणजे एखादी सुंदर वस्तु अगर मुर्ती भंग पावणे. संबंधित त्रासातुन सहज मुक्तिप्राप्ती हेतु दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट द्वारे मांडलेल्या डोळस व परीणाम कारक उपाय योजना पुढील प्रमाणे साधाव्यात.दृष्ट उतरवण्याच्या खालील प्रक्रीया फक्त सजीव प्राण्यांसाठीच आहेत.

१. मीठ, मोहरी, लसुण व कांद्याची वाळलेली टरफले व सुक्या मिरच्या विस्तवावर टाकुन तो विस्तव दृष्ट लागलेल्या माणसाभोवती सात वेळा ओवाळुन फेकून द्यावा.


२. दत्तप्रबोधिनी ब्लाँगवरील मारुती स्तोत्र हनुमानासमक्ष बोलुन तेथील मारुतीच्या खांद्यावरील शेंदुर आणुन तो शनिवारी दृष्ट लागलेल्या माणसाच्या कपाळी लावल्यास दृष्टीची बाधा नष्ट होते.


३. कणकेच्या दिव्यात काळ्या सुताची वात घालुन तो पेटवावा व त्या ज्योतीत दोन लाल मिरच्या घालुन दिवा दृष्ट लागलेल्या माणसाभोवती ओवाळावा.


४. एखाद्या माणसाच्या जेवणास दृष्ट लागल्यास पुढील प्रयोग करावा


चिंचेच्या झाडाच्या ३ काड्या आणुन त्याची जुडी पेटवावी व दृष्ट लागलेल्या माणसाभोवती ७ वेळेला ओवाळुन पाण्यात विझवावी व ते पाणी त्या माणसास पाजावे म्हणजे दृष्ट निघेल. ५. रविवारी अथवा शनिवारी दृष्ट लागलेल्या माणसाच्या डोक्यावरुन तीन वेळेला दुध ओवाळुन ते एका मातीच्या परळात ठेवावे. हे दुध कुत्र्यापुढे ठेवावे.


६. ज्वारीच्या पिठाची भाकरी एका बाजुने भाजावी व भाजलेल्या बाजुस तुप लावुन भाकरीला पिवळा दोरा गुंडाळुन ती दृष्ट लागलेल्या माणसावरुन ७ वेळेला ओवाळुन चार रस्त्यावर सोडुन यावी.


७. बाळाला एखाद्या बाईची दृष्ट लागली असेल तर त्या बाईस घरी बोलावुन तिला मुलाच्या डोक्यावरुन हात फिरवण्यास सांगावे.


८. दृष्ट लागलेल्या माणसाला घराच्या ऊंबरठ्यावर बसवावेत ( घराचा उबंरठ्याची सविस्तर माहीती दत्तप्रबोधिनी ब्लाँगवर वाचा ) त्याच्या वरुन उडीद, मीठ व माती ७ वेळेला ओवाळावीत.


९. कुमरिकेंकडुन पाच रंगांचे रेशीम वळवुन घ्यावेत. त्याला सात गाठी माराव्यात. अश्विन वंद्य चतुर्थीला हा दोरा मनगटात बांधल्यास दृष्ट नाहीशी होते. 


१०. महीलेस दृष्टी बाधा झाल्यास म्हणजेच समारोह अथवा कार्यक्रम साधुन घरी परतल्यास डोकेदुखी होण्याची तक्रार केल्यास ; घरातील बिब्वा त्यांच्या वरुन पुढुन व पाठीमागुन तीन वेळा मंत्राने फिरवुन गँस वर टोचणीच्या सहाय्याने लांठ धरुन पेटवावा. दृष्ट जळुन जाते. हा प्रयोग लागोपाठ सलग तीन दिवस करा.ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

वास्तुदोष उपाय - Works Quikly

दत्ततत्व ( साध्य ) व हठयोग ( साधन ) म्हणजे दत्तप्रबोधिनी आचरण ( समाधि )

बाधिक वास्तुसाठी ( Hunted Vastu } काय उपाययोजना कराल ? नवीन वास्तु विकत घेण्यापुर्वी काय खबरदारी घ्याल ?- Read right Now

घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २- Read right Now


पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!
0