पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!


अध्यात्मिक सान्निध्या अनुसार आणि आधुनिक विज्ञानाच्याही पलिकडे , आपल्या आयुष्यात ५०% समस्या फक्त आध्यात्मिक कारणांमुळे होतात आणि ३०% समस्या ह्या आध्यात्मिक, मानसिक / किंवा शारीरिक कारणांमुळे होतात. आणि २०% मानसिक /शारीरिक कारणांमुळे होतात.


आपल्या आयुष्यातील दुःखाचे मुळ आध्यात्मिक कारण म्हणजे मृत पूर्वजांची अतृप्ति आणि त्याचा वंशावलि (कुळावर) होणारा दुष्प्रभाव.

पितृदोषांमुळे होणारे हनिकारक परीणाम खालील प्रमाणे आहेत.

पितृदोषांमुळे आपल्याला संसारीक जीवनात व आध्यात्मिक उपासनेत अनेक अडचणी उत्पन्न होतात. कधीकधी तर असं वाटतं की पुर्ण परिवारावर काळं सावट आहे. आपण याचा कितीही उपाय केलात तरीही समाधानकारक परीस्थीती दिसत नाही याउलट अमाप पैसे आणि वेळ खर्च करुन पुन्हा तेच कष्ट भोगावे लागतात.


दैनंदिन जीवनातील पितृदोषाची लक्षणें

१. विवाह न होणे.


विवाहयोग जुळुन येणें हे त्या कुळाला आथवा घराला लागु असलेल्या कुळदैवत व ग्रामदैवतांच्या कृपेवर निहीत असते. पितरांच्या दोषांमुळे सहसा दैवतांचा कौल समाधानकारक मिळत नाही. विवाह जुळत असतानाही अनावश्यक विघ्ने उत्पन्न होतात.


२. वैवाहिक जीवनात अशांति.


काही प्रकरणांत विवाहोत्तर वाद पाहाण्यात येतात. याची मानसिक, शारीरिक, अर्थिक, सामाजिक, अथवा आध्यात्मिक कारणें ही असु शकतात. पितरांना अनुसरुन वैवाहिक अशांतीचे कारण वास्तुदोषांशी जोडलेले असते. असं पाहाण्यात आलं आहे. 



३. व्यसनाधिन होणे ( सरासरी ७० % व्यसन पितृदोषांमुळे होतात)


पितरे घरातील बाथरुम, टोईलेट आणि स्वयंपाक खोलीत स्थित असतात. त्यांचे अस्तित्व आपण नाकारु शकत नाही. घरातील तणावपुर्ण परिस्थिती आणि नकारात्मक ईतर स्पंदनेही असतात. पुर्वजांमधील मद्यपानाने मृत पावलेल्या पितरांचा निमित्तकारणानें घरातील सदस्याला त्रास होतो.


४. मुले अभ्यास करुन सुद्धा परीक्षेत काही न आठवणे.


लहान मुलांचा आणि पितरांचा संबंध मुले अर्भकावस्थेत असल्यापासुन असतो. बुद्धी आणि स्मृती वेळेवर साथ न देण्याची ईतरही कारणें असु शकतात.


५. नोकरी टिकत नाही.


जीवनात पाच प्रकारच्या स्थिरता येणे महत्त्वाचे . त्यापैकी आर्थिक बाजु एक. आध्यात्मिक स्थिरता आणि दोषमुक्त दैवी पाठबळ मिळणें हेतु सद्गुरुंना शरण जाणें महत्त्वाचे ...!


६. गर्भधारणात समस्या.


ज्याप्रमाणे पितरांचा आपल्या घरात वास असतो. त्याचप्रमाणे आपल्या देहातही आपल्या पोटात पितरांचे अढळ स्थान असते. दोषांना अनुसरून योग्य ईलाज वेळेवर होणे महत्त्वाचे..!


७. गर्भपात.


सर्व घराण्यांत पितरांची संख्या हजारोंच्या आकड्याने असते. त्यांचा होणाऱ्या असह्य वेदनांचा परिणाम भौतिक पिढीवर होत असतो. त्यायोगेच संबंधित घराणे त्रयोतापानें पछाडलेले असते. प्रारब्धाचाही घनिष्ठ संबंध असतो.

गर्भपाताला ईतर कारणेंही असु शकतात. आध्यात्मिक स्तरावर पितरांतील गृहस्थ पिशाच्च हे ऐकमेव गर्भकापाताचे कारण असते.


८. मुलांना मानसिक अथवा शारीरिक अपंगत्व येणे.


पितरांच्या पिशाच्यबाधेचा ९०% त्रास महीला वर्ग, अर्भक आणि १२ वर्षेपर्यंतच्या लहान मुलांवर अधिक प्रमाणात होतो. या आत्मविकारी परिस्थितीत प्रतिकार करणें हेतु सक्षम सद्गुरुसेवा होणें महत्त्वाचे...!


९. मुलांचे अकाल मृत्यू होणे.


अकाल मृत्यू अत्यंत संवेदनशील विषय असुन यासंंबंधी प्रत्यक्ष चर्चा करावी. ईथे माहीती देणें विस्तारभयास्तव योग्य ठरणार नाही. 


यापैकी गर्भपात आणि मुलांचे अकाल मृत्यू होणे ही समस्या पितृदोषाबरोबर प्रारब्धाशी जोडलेली असते.

बौद्धिक स्तरावर आपण दोन सामान्य नियम वापरुन हा अनुमान निश्चित करु शकतो की संबंधित दुःख आदीभौतिक आहे की आदीअध्यात्मिक.


नियम खालील प्रमाणे आहेत


१. ज्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्व आधुनिक विज्ञानाच्या उपाययोजना अपयशी ठरत आहेत.

उदा. छातीत दुखणे. हाता पायाला मुंग्या येणे ईत्यादी...

२. एकत्र कुटुंबातील अनेक सदस्यांना समान त्रास होणे


पितरांच्या या कर्मठ गाठीं l स्वीकार सद्गुरु उद्धारापोटी ll

जीवन संपले प्रयोग करता l काय मिळवतो उपाधीं जडता ll

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे..



0