संत श्री गाडगे महाराज


महाराजांनी बकरी, कोंबडी बलीची प्रथा नष्ट केली. अंधश्रध्देवर आसूड ओढले. महाराजांना स्वच्छता खूप आवडत असे. कोठेही गेले की ते स्वतः तेथील सर्व आसमंत झाडून स्वच्छ करत. तेथेच मुक्काम व रात्री कीर्तन होत असे. महाराज समाजसुधारक संत होते.अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नावाचा तालूका त्यातील कोकल्डा नावाचे एक गाव. मूर्तीजापूर - दर्यापूर या छोट्या रेल्वे लाईन वरील एक लहानसे स्टेशन. याच स्टेशनपासून चार मैल म्हणजे आजचे ६ कि.मी. वरील शेणगाव हेच आपल्या महाराजांचे जन्म गाव. वडीलांचे नाव झिंगराजी व आई सखूबाई. त्यांचे कुलदैवत होते खंडोबा व आसरा. देवतां बाबत त्याकाळी वर्हाडात फार चमत्कारित भावना होत्या. वर्षातून किमान एकदा तरी बकर्यांचा बळी द्यावा लागे. तसेच लग्नात वा मूल जन्माचे वेळीही बळी प्रथा कटाक्षाने पाळल्या जाई. याहीपेक्षा विचित्र गोष्ट म्हणजे घरात कुणी आजारी असेल तर तो देवीचा कोप समजून कोंबडीचा बळी दिला जाई. अशाप्रकारे त्यांच्या परिट समाजात रोज काहीना काही कारणांमुळे समारंभ होत असत. त्यातच कुणी दारु पिणारेही असत. तेच व्यसन महाराजांच्या वडीलास लागून त्यातच त्यांचा अंत झाला. महाराजांचे नाव होते डेबू.

   त्यानंतर डेबू आपल्या आई बरोबर दापुरे या मामाचे गावी आला. तेथे मामांच्या शेतीवर दिवस रात्र राबत असे. काळी आई महाराजावर प्रसन्न होती. भरपूर पीक येत असे. जनावरांची पण डेबू छान काळजी घेई. पुढे बालपणीच डेबूजीला भजनाची आवड निर्माण झाली. आपल्या समाजातील बळी प्रथा त्यांना आवडत नसे. जनावरांना जंगलात नेले असता तेथे कोणी मनुष्य नसे, तेव्हा ते एकाग्र चित्ताने प्रभूचे ध्यान लावत. तर आईला मात्र मुलाच्या लग्नाचे वेध लागले होते. डेबूजींच्या आत्म स्वरुपानंदाचा कुणालाच थांग पत्ता नव्हता. महाराजांचे शेवटी दापूरे या गावी लग्न झाले व ते गृहस्थाश्रमात प्रवेश करते झाले. पण ते तेथे रमले नाही.


   त्यातच त्यांना एका सत्पुरुषाची गाठ पडली. ते हिंदी भाषिक होते त्यांना त्यांनी गुरु मानले होते. पुढे महाराजांचे प्रपंचात लक्ष लागेना. तशातच एक दिवस महाराज दर्यापूर या तालुक्याचे ठिकाणी गेले असता त्यांचे वरील गुरु त्यांचा शोध घेत गावी आले व देवीदास देवीदास म्हणून हाका मारु लागले. पण हिंदी भाषा ऐकून गावकर्यांनी त्यांना हद्दपार केले. डेबूजी दर्यापूरहून परत आल्यावर त्यांना ती घटना कळली. त्यांची हिंदी भाषा व वेषभूषा वरुन ते आपले गुरुच असल्याचे ओळखले. त्यांना शोधत शोधतच ते गावाबाहेर पडले. गुरुंचा शोध लागत नव्हता. सहा महिने निघून गेले अंगावरील कपडे फाटून त्यांना ठिगळेही लागली होती. दाढी वाढलेली हातात गाडगे व वेडीवाकडी काठी त्यामुळे पहाणार्यास ते चमत्कारिक वाटत असे.


   पुढे हेच डेबूजी गाडगे महाराज म्हणून प्रसिद्धीस आले. घरी कळले सर्वांना आनंद झाला. त्यावेळी महाराजांचा मुक्काम ऋणमोचन या गावी होता. महाराजांच्या दापूरे या गावापासून केवळ तीनच मैल अंतर होते. घरची सर्व मंडळी पौष महिन्यांतील रविवारी तेथील यात्रे करीता आली. तेथे त्यांची महाराजांशी गाठ पडली. त्यांची ती चमत्कारिक मूर्ती पाहून आईला भरभरुन आले. पण महाराजांनी तिची समजूत काढली. यात्रेत ही बातमी वार्यासारखी पसरली. दापूरे गावातील सर्व लोक त्यांचे दर्शनास आली. दुपारी महाराजांचे कीर्तन झाले.


   महाराजांनी बकरी, कोंबडी बलीची प्रथा नष्ट केली. अंधश्रध्देवर आसूड ओढले. महाराजांना स्वच्छता खूप आवडत असे. कोठेही गेले की ते स्वतः तेथील सर्व आसमंत झाडून स्वच्छ करत. तेथेच मुक्काम व रात्री कीर्तन होत असे. महाराज समाजसुधारक संत होते. त्यांनी ठिकठिकाणी यात्रेकरुंच्या सोईसाठी धर्मशाळा बांधल्या, शाळा काढल्या, गोरक्षणांची व्यवस्था केली. नाशिक, मुंबई, पंढरपूर, मुर्तिजापूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी धर्मशाळा व शिक्षणाच्या शाळा, वसतीगृहे काढली. गरिबांना तेथे मोफत रहाण्याची व भोजनाची व्यवस्था लावून दिली.


   शेवटी महाराजांनी अमरावती येथे देह ठेवला. तेथे महाराजांची समाधी असून ते गाव आता गाडगे नगर म्हणून नावारुपाला आहे.ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments