शुक्लपक्ष, कृष्णपक्ष व नक्षत्रे : पौर्णिमा योगसंधान - २ Shuklapaksh, krushnapaksh


घोर अमावस्येच्या अंधारातुन कलेकलेने आत्मोन्नती होऊन पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल व तत्व चुंबकीय क्षेत्र जागृत होणे हेतु कालगणनेतील सर्वात महत्त्वाचे अंतराळीय चंद्रनियमन सुक्ष्मस्तरावर समजणे आवयक आहे. ध्यान योगाच्या माध्यमातून आत्म तत्वाद्वारे सिद्ध योगीपुरुष आकाशस्थित चंद्राला स्पर्श करुन शितलता प्राप्त करत असत. पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व योगक्रीयेच्या आनुशंघाने सर्व देश, काल व स्थळ गणनेनुसार अधिकच प्रमाणात आहे.

घोर अमावस्येच्या अंधारातुन कलेकलेने आत्मोन्नती होऊन पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल व तत्व चुंबकीय क्षेत्र जागृत होणे हेतु कालगणनेतील सर्वात महत्त्वाचे अंतराळीय चंद्रनियमन सुक्ष्मस्तरावर समजणे आवयक आहे. ध्यान योगाच्या माध्यमातून आत्म तत्वाद्वारे सिद्ध योगीपुरुष आकाशस्थित चंद्राला स्पर्श करुन शितलता प्राप्त करत असत. पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व योगक्रीयेच्या आनुशंघाने सर्व देश, काल व स्थळ गणनेनुसार अधिकच प्रमाणात आहे.

आध्यात्मिक गुरु पौर्णिमेचा आणि सहज समाधीचा अमृतबिंदु धारणेतुन फार घनिष्ठ संबंध असतो. मानवी मन व ब्रम्हाण्डीत मनाचे शाश्वत स्वरुप म्हणजे चंद्र...! पुर्ण चंद्राचे स्वरुप म्हणजे आपल्या देहस्थीत असलेल्या अंतःकरणाचे आकाशस्थित प्रतिबिंब समजावं. हे चंद्रस्वरुप अंतःकरण प्रज्ञेच्या माध्यमातुन आत्मगुहेत स्थित असलेल्या भगवत्मय ज्योतीस जाऊन स्पर्श करते त्याच वेळी ब्रम्हानंदाची टाळी वाजायला सुरवात होते. आपण आत्मिक आनंदात भारावुन जातो त्याअर्थी देहभान नष्ट होऊन तुरीयावस्थेत पदार्पण होते. ही सर्व क्रीया समजुन घेणे हेतु सर्वप्रथम आपण नियतीची पौर्णिमा व अमावस्येतील खेळी व त्यायोगे चंद्रसुर्य पलिकडील विश्व समजुन घेणे महत्वाचे आहे.


योग साधनेत आपल्या शरीरावर प्रभाव पाडणार्या सर्व सुक्ष्म घटकांचा विचार आत्मतत्वाच्या माध्यमातून केला जातो. ह्या सुक्ष्म घटकांमधे निसर्गातील पंचमहाभुतांचे तत्व संतुलनात्मक आत्मप्रयोजन व आकाशतत्वाचा गहन अभ्यास करावाच लागतो. ध्यान साधना, मंत्र जप, नाम स्मरण अथवा इतर कोणतेही योग साधन एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जाऊन अडकुन पडतेच. उदा. ज्या प्रमाणे वाहत्या पाण्याचा प्रवाह एका अडवणार्या बांध मुळे अडकुन पडतो आणि साचलेलं पाणी कालांतराने दुषित होते. त्याचप्रमाणे कोणतीही दैवी साधना आकाश तत्वापर्यंतच जाऊन थांबली जाते. पुढे जाण्यासाठी अपेक्षित मार्गदर्शन आणि ठराविक भुमिका नसल्याने आध्यात्मिक जीवन विस्कळीत होते.


हे आकाश तत्व अत्यंत गहन असल्याने त्याचे सुर्य, चंद्र व सुषुम्ना नाडीवर सामान्यतः तीन भाग आहेत. आकाश तत्वातील अज्ञानाच्या अंधारमय खोलीत अमावस्येनंतर पौर्णिमाच आपल्याला कलेकलेने आत्म ज्ञान मिळवुन देऊ शकते. अंधार जगतातील प्रारंभीक ज्ञानाचा ओघ बर्हिमनस्थित बुद्धीवादानेच येत असतो. हा बुद्धीवाद पदोपदी प्रबळ होणे महत्वाचं आहे. 


मनाची आध्यात्मिक कार्यक्षमता परिपुर्णतेस अनुभवण्यासाठी आपल्याला आपले सर्व बर्हीमुखी चित्त अंतरी असलेल्या बुद्धीवादी अंतःकरणात स्थित करता आलं पाहीजे. तेव्हाच सद्गुरुकृपेचा फवारा ह्दयात उडु लागेल आणि आपली सहज दत्ततन्मयता सिद्धावस्थेस जाऊ शकेल.

पौर्णिमा महत्व व योगसंधान

चंद्रवलयाची पुर्णदशा पौर्णिमेला असल्यामुळे पुर्ण मनाची शक्ती आपल्या बुद्धीच्या आधीन यावी यासाठी काही विशिष्ट तारा तंत्राचा वापर योग साधनेत केला जातो. ही अभेद्य तारा शक्ती दशमहाविद्येतील तारक परमपुरुषची शक्ती आहे. ही तारक शक्ती महाराजांच्या तारक षडाक्षरी मंत्राद्वारे अनूभवास येऊ शकते. ही अवस्था अवगत होण्यासाठी अद्वैत कर्माचा सिद्धातं ठायी ठायी रुजला पाहीजे. आजच्या पाहाण्यात बरेच साधक श्रीविद्या बद्दल गैरसमज करवुन स्वतःचीच दिशाभुल करत आहेत. सद्गुरु महाराज कधीही चमत्कार, सिद्धी व शक्तिपातासारख्या अपरिपक्व मानसिकतेवर कृपादृष्टी करत नाहीत. याची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गोंधळलेली मनस्थिती सद् मार्गावर येणार नाही.


तंत्र संंबंधित सर्व कल्याणकारी कर्मे पौर्णिमेला केल्यास म्हणजे घरावरील उतारा काढणे, वाहनास ताईत बांधणे, उंबरठ्यावरील पुजा, घरातील स्री सदस्य व लहान मुलांवरुन नजर उतरवणे अशी कर्मे केल्यास महीनाभर कोणताही त्रास होणार नाही. याच सोबत आध्यात्मिक उबंटु चाही बराच फायदा करवुन घ्यावा. म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज व काळभैरवाची घरावर व घराच्या सदस्यावर कृपा कायम राहु शकेल. भगवंताला आत्मसमर्पण होण्यास मनाची पूर्णावस्था साध्य होणे महत्वाचं...! तद्नंतरच त्याचे बुद्धीस्वरुपात नामस्मरणाने लयावस्था होऊ शकते. त्राटक साधनेतील स्वयं त्राटक साधना करण्याची पुर्वतयारी म्हणुन बर्हीमनाचे आत्मसामायिकरण होणे आवश्यक आहे.


सर्व मंगलमय शिव कल्याणकारी कर्मांचे द्योतक अंतिम स्वरुप म्हणजे मनशक्तीच्या पुर्णत्वाची पौर्णिमावस्था आहे. आध्यात्मिक प्रगतीत आत्मबळात वाढ होणाऱ्या साधकांसाठी सर्व चंद्रकलांचे ज्ञान असणे महत्वाचे आहे. भगवान शिव स्वयं मानवाचे पाप व पुण्य चंद्रकलेच्या वृद्धी व क्षयावरुन अभीष्ट प्रदान करतात. त्याशिवाय नंदी गण, शिव गण व काळभैरव गणांच्या पुजनाचा अधिकार अबाधीत ठेऊन चंद्र कलेवरुनच पाप आणि पुण्य वाढ अथवा क्षय करतात. ही सर्व आत्मविवेचने योगी जीवन जगण्यास आवश्यक असलेली आत्मसावधानता प्रकट करवुन देतात. भगवान शिव स्वतः शिवयोगी स्वरुपात मस्तकस्थित असलेल्या बदलत्या चंद्रकलेचा अभ्यास करतात. त्यायोगे आपणही करावा जेणेकरुन स्वयंसिद्धावस्था प्राप्त होऊन जीवाशिवाची बैलजोड सहज समाधी प्राप्त करु शकेल.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...









0