संतश्रेष्ठी श्री एकनाथ महाराजएक दिवस गुराख्याने नाथांना अशी तपश्चर्या करताना पाहून मोठे आश्चर्य वाटले. तो रैज चरवीभर दुध आणुन नाथांना द्यायचा एके दिवशी दुध घेऊन येत असताना गुराख्याने बघितले कि , एक नाग नाथांच्या कमरेला मिठी मारुन त्यांच्यावर शरीराला विळखे देत आपल्या फण्याची सावली नाथांच्या मस्तकावर धरली होती. तो गुराखी घाबरला व नाथांना आवाज देऊ लागला. नाथांनी डोळे उघडताच नागाने विळखा सैल करुन येथून चुपचाप निघून गेला.संत एकनाथ महाराजांचा जन्म पैठण येथे महान संत भानुदास महाराजांच्या कुळात झाला. त्यांचे वडील व आई नाथांच्या बालपणीच निधनं पावले त्यामुळे त्यांचे पालन पोषण त्यांच्या आजोबांनीच केले.  त्यांचा जन्म सन इ.स. १५३३ शके १४५५ झाला. 

एकदा नाथाच्या पंजोबांनी म्हणजेच भानुदास महाराजानी पंढरीचा पांडुरंग विजयनगरहुन परत पंढरपुरला आणला. आपल्या भक्ती सामर्थ्याने वारकरी संप्रदायाला भू-वैकुंठाचे परब्रम्ह पुनःश्च प्राप्त करुन दिले. त्यांच्या पुत्राने व सुनेने म्हणजेच चक्रपाणी व सरस्वतीने हा भागवत धर्माचा झेंडा पुढे चालू ठेवला. चक्रपाणी व सरस्वतीचे पुत्र म्हणजेच सुर्यनारायण भार्या स्नूषा म्हणजे रुक्मिणीने मुळ नक्षत्रावर या ज्ञान सुर्याला जन्म दिला. माता पिता लहानपणीच विठ्ठलाच्या चरणी लिन झाले. म्हणूनच त्यांचे संगोपन आजी-आजोबांनी केले. त्यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. आध्यात्मिक अभ्यास करताना नाथांना अनेक प्रश्न पडत. त्यांना सद्गुरुची ओढ लागली होती. एके दिवशी त्यांना देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार प.पू. जनार्दन स्वामीं यांनी दृष्टान्त दिला व कोणाही न सांगता बालपणीच एकनाथ सद्गुरु भेटीचा पक्का निर्धार करुन सर्व संकटांना सामोरे जात देवगिरीची वाट चालु लागला.

देवगिरी पोहोचताच त्यांना जनार्दन स्वामीचे दर्शन झाले. ऐकोबांनी दुरुनच नमस्कार केला. त्या समोरील बटू मूर्तीकडे, त्यांची शांत व अनवदन नजर पाहुन स्वामीं थक्क झाले. गाईला पाहताच वासरु जसे धावते तसा नाथ धावत गेला व जनार्दन स्वामींच्या पायावर लोटांगण घातले. आनंदातिरेकाने अश्रूपात होऊन पायावर आभीषेक घडला हीच सद्गुरुंची पाद्यपूजा झाली. गुरुजीँने विचारले, 'कोण आहेस बाळा तू ?' त्यावर नाथ म्हणाला, 'मी कोण..? हे मला तरी कोठे ठाऊक..! हे जाणुन घेणेहेतुच मी आपल्या चरणांशी आलो आहे महाराज...!

स्वामीं एकनाथाला घरी घेऊन गेले. तो तेथेच राहु लागला व त्याची साधना सुरु झाली. नाथ स्वामींची सेवा करु लागला. सोबत सामान्य ज्ञान, पाठांतर व विविध ग्रंथाचे वाचन सुरु झाले. स्वामींची प्रवचने ऐकुन मनन चिंतन सुरु झाले. स्वामींशी चर्चा रंगु लागली व स्वामी गीता आणि ज्ञानेश्वरीचे तुलनात्मक विवेचन सांगू लागले.

जनार्दन स्वामींनी नाथांना एकदा शुलभंजन पर्वातावर नेले ती तपोभुमी होती. तेथील स्पंदने फार सुरेख व परमार्थाला पोषक असे होते. गुरु-शिष्य एका शिळेवर बसले असताना समोरुन एक मलंग येताना दिसला. त्यांना पाहुन स्वामीं उठून उभे राहीले व त्यांचे पाय धरले ते पाहुन नाथांना फार आश्चर्य वाटले. परंतु पुढे तोच मलंग जेव्हा त्रिमुर्ती दत्ताचा अवतार घेऊन उभा राहिला तेव्हा नाथांना खुप आनंद झाला.

स्वामींच्या आज्ञेवरुन कठोरसाधाना त्या शुलभंजनच्या तपोभुमीवर सुरु केली. त्यांना आत्मसुखाचा अनुभव येऊ लागला. एक दिवस गुराख्याने नाथांना अशी तपश्चर्या करताना पाहून मोठे आश्चर्य वाटले. तो रैज चरवीभर दुध आणुन नाथांना द्यायचा एके दिवशी दुध घेऊन येत असताना गुराख्याने बघितले कि , एक नाग नाथांच्या कमरेला मिठी मारुन त्यांच्यावर शरीराला विळखे देत आपल्या फण्याची सावली नाथांच्या मस्तकावर धरली होती. तो गुराखी घाबरला व नाथांना आवाज देऊ लागला. नाथांनी डोळे उघडताच नागाने विळखा सैल करुन येथून चुपचाप निघून गेला.गुराख्याने नाथांना प्रेमाने जवळ घेतले, सर्वांगावर हात फिरवला, तर डोळ्यांतुन वाहाणारे अश्रु नाथांच्या अंगावर पडत होते.

नाथांची साधना पूर्ण झाली, गुरुंच्या आज्ञेनुसार तीर्थाटन करुन घरी परतले. तेथे आजी आजोबांनी त्याला लग्नाला उभे रहायला सांगितले. नाथांची ईच्छा नव्हती पण गुरुंनीच त्यांना तसा आदेश दिला. त्यांचा विवाह गिरीजाबाईंशी झाला. प्रंपच सुरु होता पण तो परमार्थीमुक होता. पैठणच्या विद्वत् जनांशी प्रखरृ झुंज देत. भारुड व भजनाद्वारे समाजातील अंधश्रद्धा दुर केल्या.

नाथ "शांतीब्रम्ह" होते तर गिरीजाबाई "शांतीसरीता" होत्या. नाथांच्या नामसंकिर्तनावर व सेवेवर प्रसन्न होऊन द्वारीकेचाराणा येऊन श्रीखंड्याच्या रुपात त्यांची सेवा करु लागला. ही सेवा सतत बारा वर्षे सुरु होती. जेव्हा नाथांना हे कळले तेव्हा तो निघुन गेला. त्यांनी हरिपाठ, भारुड, रुक्मिणीस्वयंवर आख्यान, चिरंजीव पद, हस्तामलक स्तोत्र, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण ई. ग्रंथ लिहिले.

अशा या शांती ब्रम्हाने फाल्गुन षष्ठीला पैठण येथे समाधी घेतली.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments