संत श्री अखंडानंद स्वामीईश्वरीकृपा म्हणजे या झोपेतच त्यांना श्री वासुदेवानंद सरस्वती थोरले स्वामीं महाराजांचे दर्शन झाले. त्यांना गुरुपदेश मिळाला. काहीतरी उणीव असलेले जीवन अर्थपुर्ण झाले.श्री अखंडानंद हे मुळचे रत्नागिरीतले गावोगावी फिरले. अनेक प्रदेशांतुन त्यांनी मुक्काम केला. परंतु त्यांचे मन कुठेच रमत नव्हते. खरेतर मनातुन त्यांना परमेश्वराचीच ओढ लागली होती पण याची त्यांना जाणीव नहती. त्यांना देवाधर्मात अजिबात रस नव्हता. अतिचिकित्सक, अतिशिस्त व अतिठामपणा या अतिरेकामुळे त्यांचे कोणाशीच जमले नाही. पण जाणीव नसलेला परमेश्वराचा शोध मात्र चालुच होता. फिरता फिरता हे बहिणीकडे मुंबईला आले. तेथेही ते देवभक्तीत रुची घेत नव्हते.

पण पुढे त्यांच्या बहिणीने त्यांच्याकडून श्री गुरुचरित्राचे वाचन करुन घेतले. आश्चर्य म्हणजे अखंडानंदांचे यात थोडे मन रमले. गुरुचरित्र वाचनातुन प्रेरणा घेऊन ते गाणगापुरी गेले. तेथे दत्तप्राप्तीसाठी श्रमसेवा करु लागले. पण त्याने देवदर्शन न झाल्याने त्यांनी दर्शनाचा नाद सोडून दिला. व जीवन संपवण्याचे देखिल ठरवले. औषधी द्रव्य जास्त प्रमाणात खाऊन ते झोपून गेले. ईश्वरीकृपा म्हणजे या झोपेतच त्यांना श्री वासुदेवानंद सरस्वती थोरले स्वामीं महाराजांचे दर्शन झाले. त्यांना गुरुपदेश मिळाला. काहीतरी उणीव असलेले जीवन अर्थपुर्ण झाले. त्यानंतर त्यांनी हिंदु धर्माचा प्रसार केला. धार्मिक विधी, तीर्थयात्रा केल्या. गुरुचरित्राची पारायणे केली. परभणी ( मराठवाडा ) येथे सामुदायिक गुरुचरित्राचे पारायणे केली.

परभणीहुन जवळ असलेल्या कारेगाव येथे दत्त मंदिराची स्थापना केली. दत्त सेवा मंडळ स्थापन केले. अनेकांची संकट व दुःख यापासुन मुक्तता केली. १९८७ दरम्यान कारेगाव येथे समाधिस्त झाले.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments