श्री गणेशाचे सतस्वरुपाचा जिवंत अनुभव दत्तप्रबोधिनीमध्ये सदगुरु महाराजांच्या शिवब्रम्हाचा वाचक श्री भस्म् गणपतीच्या रुपाने मला सन 2017 मध्ये आला. भस्म् श्री गणेशाचे आवाहन करणेसाठी भस्मार्जन आणि श्री गणेशाचे शिवब्रम्ह् तत्वातुन प्रकटीकरण यातुन जो परमआनंद मिळाला त्याचे वर्णन करताना आज माझे कुटूंबातील माझेच काय पण सर्वच सदस्यांचे डोळे पाणावतात यात शंकाच नाही.
श्री गणपती : अध्यात्मिक वर्णन
आपण श्री गणेशास प्रथम पूजनीय. बुध्दीची देवता. विघ्नहर्ता. असे म्हणतो. श्री गणपती अर्थात गणेशांचे श्री गणपति अथर्वशीर्षात सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्वरुपात वर्णन आले आहे. सगुणातील वर्णन पुढीलप्रमाणे आहे :
ॐ एकदंताय विदमहे वक्रतुंडाय धीमहि l तन्नो दंति: प्रचोदयात l
तर निर्गुणातले त्यांचे वर्णन
त्वं गुणत्रयातीत: l त्वं कालत्रयातीत: l त्वं मुलाधारस्थितोसि नित्यम् l त्वं शक्तित्रयात्मक्: l
मूळ श्री गणेश निर्गुणच आहेत. मानवाने श्री गणेश रुपाची मनात कल्पिलेली आजची प्रतिमा ही सगुण भाव प्रकटीकरण आहे.
श्री गणपती अथर्वशीर्ष मध्ये श्री मताचे अथर्वशीर्ष म्हणजे " अथर्व " जे कधीही थरथरत नाही ; जे शाश्वत स्थिर आहे अशी अभिव्यक्ती...! श्री गणेश ज्यांचे वर्णन समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक यांत अत्यंत यथार्थ केलेले आहे.
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा l मूळारंभ आरंभ जो निगुर्णाचा ll
तर त्याहीपूर्वी संत ज्ञानेश्वर ज्यांना खरे तर शेवटचे नाथ म्हणता येईल, त्यांनी केलेले श्री गणेश वर्णनदेखील ते आदयच असल्याचे दर्शविते. एकीकडे ज्ञानेश्वर् नाथ म्हणतात ;
ॐ नमोजी आदया ll वेदप्रतिपादया llजय जय स्वसंवेदया llआत्मरुपा ll
तर दुसरीकडे ते म्हणतात ;
अकार चरणयुगल l उकार उदर विशाल lमकार महामंडल l मस्तकाकारे ll १९ ll हे तिनही एकवटले l तेथ शब्दब्रम्ह् जियाले l ते मियां गुरुकृपा नमिले l आदिबीज ll २० ll
श्री गणेशाचे सत्यस्वरुप
वरील शब्दांचे शाब्दिक विश्लेषणात गेले की, मनाला उमगायला लागते की, श्री गणेश हा एकाक्षर ब्रम्ह्. ज्यात ओंकाराच्या साडेतीन मात्राचा अंतर्भाव होते. त्रिगुण, त्रिदेह,त्रिकाल या सर्वांना व्यापुन उरलेली अर्धमात्रा. जे आदिबीज म्हणा किंवा जगाचे अभिन्न्निमित्तोपादान म्हणा.
सर्व भूतांचे सृजन करुन उरलेली शक्ती जी कुंडलिनीच्या रुपाने सर्व जीवांच्या मूलस्थानात मूलाधारामध्ये सुष्मना नाडीच्या प्रवेशव्दारास अडवून साडेतीन वेटोळयांच्या शेपूट स्वमुखात घेतलेल्या स्वरुपात सुप्तावस्थेत विसावलेली आहे. तीचे साडेतीन वेटोळे हे साडेतीन मात्रांशी साधर्म्य दर्शविते आणि हेच सुचविते की, ती आदिशक्ती श्री गणेशाचीच आहे. उत्पती स्थिती आणि लयाचे कारण हीच आहे. जीवाच्या उध्दाराचे वेळी हीच शक्ती श्री काळभैरवरुपी सुष्मना नाडीतुन उर्ध्व मागाने सळसळत जावून, कर्माची शुध्दी करीत षटचक्रांचे भेदन करते आणि परमशिवाशी एकरुप पावते. तथापि श्री गणेशांची कृपा आणि कार्य हे सदगुरु महाराजांचे कृपेशिवाय सुरुच होवू शकत नाही. पर्यायाने कुंडलिनी ही सुप्तअवस्थेतच राहते. आणि मनुष्य् जन्म् मृत्यूच्या प्रकृतीगर्भातील चक्रातुन सुटूच शकत नाही.
सदगुरुकृपेआधारे श्री गणेशाची कृपा : शिवब्रम्ह् साक्षात्कार
याचाच अर्थ सदगुरुंच्या अनुमतीशिवाय साधकास निर्गुणात आणि त्यानंतर त्याहीपलीकडील चिदाकाशात शिवतत्वाच्या सहाय्याने आत्मस्वरुपात स्थिर होण्याचे महदभाग्य् प्राप्त् होवूच शकत नाही. जे परमगतीसाठी आवश्यक आहे. चिदाकाश हे आत्म्याचे मूळस्थान आहे.
थोडक्यात यौगिक प्रक्रियेत साधक तत्वाचे मार्गाने कर्मदहन आणि आध्यात्मिक साधना करतो, अष्टांगयोग आणि त्यानंतर हठयोगादी क्रियांचा अवलंब करुन, नवनाथांप्रमाणे व्यापक जनजागृती करतो, त्याचवेळी त्याचे बर्हिमन बुध्दीच्या कक्षेत येवून सदबुध्दी प्राप्त् होते. जेव्हा सदबुध्दीयुक्त् आचरण अंतर्मन ज्याला आत्मा म्हणता येईल, त्याचे अधीनस्त् होते. म्हणजेच मनुष्याला आत्मबुध्दी प्राप्त् होते. त्यावेळी आसक्तीभाव कमी व्हायला लागतो.
आत्मबुध्दीची प्रगती झाल्यावर सदगुरुमय अंत:करण तयार होते. मग आत्मबुध्दी अंत:करणाच्या ज्या आत्मगुहेत प्रवेश करते , तिथे परमात्मा ज्योतीर्लिंग स्वरुपात स्थित असतो. त्या ज्योतिर्लिंगामध्ये आत्म्याचा लय होतो. म्हणजे समाधी लागते. समाधीलाच चित्ताचा लय झालेली अवस्था म्हणतात. चित्ताचा लय झालेली व्यक्ती षोडश पुरुष होतो. षोडश पुरुष हाच मोक्षाचा खरा अधिकारी आहे. इथेच अनादी जीवदशेचा अंत आहे. हाच जिवंतपणी मोक्ष आहे. किती सुंदर आणि अप्रतिम.
आजच्या आधुनिक युगात श्री गणेश स्वरुपाचे विडंबनच झाले
अर्वाचीन काळात लोकमान्य् बाळ गंगाधर टिळक यांनी परकिय जोखडातुन मुक्त होण्यासाठी चळवळ निर्माण करण्यासाठी आवश्यक विचारांची आदानप्रदान करण्यास कोणताही अडसर येवू नये हया उदात्त् हेतुने प्रेरीत होवून, गणेशोत्सव् सुरु केला. त्याच गणेशोत्सवाचे आणि श्री गणेशाचे आपण आज विडंबन केले आहे. पुस्तककारांना तर पुर्वीपासुनच त्यांचे मूळ स्वरुपच बदलण्याचा यत्न् होता कि काय अशी शंका येईल इतपत श्री गणेशाचे मनमानी स्वरुप शब्दांकित केल्याचे दिसुन येते. पण सत्य् कितीही विडंबीत झाले आणि लपविले तरी ते बाहेर पडणारच.
श्री गणेशाचे सतस्वरुपाचा जिवंत अनुभव दत्तप्रबोधिनीमध्ये सदगुरु महाराजांच्या शिवब्रम्हाचा वाचक श्री भस्म् गणपतीच्या रुपाने मला सन 2017 मध्ये आला. भस्म् श्री गणेशाचे आवाहन करणेसाठी भस्मार्जन आणि श्री गणेशाचे शिवब्रम्ह् तत्वातुन प्रकटीकरण यातुन जो परमआनंद मिळाला त्याचे वर्णन करताना आज माझे कुटूंबातील माझेच काय पण सर्वच सदस्यांचे डोळे पाणावतात यात शंकाच नाही.
भस्म् गणपती : शिवब्रम्हाचा वाचक
सदगुरुंचे भस्म गणपती अधिष्ठान निर्माण करणे सहजसाध्य् नाही. भस्म गणपती अधिष्ठानाचा राखणदार श्री नग्न् भैरव आहेत. श्री गणपती अधिष्ठानाच्या उजवीकडे श्री नग्न भैरव व डावीकडे श्री महाबुध्दीमाता विराजमान आहेत. हया अधिष्ठानाचे निर्मितीसाठी प्रथम श्री नग्नभैरवांचे गुप्तस्थानावर जावून त्यांचे आणि श्री महाबुध्दीमाता यांचे कृपाशिर्वाद प्राप्त् करणे अनिवार्य आहेत. त्याशिवाय अधिष्ठान उदयास येवू शकत नाही.
महाराष्ट्रात श्री गणपतीचे अष्टविनायक स्वरुपात आठ श्री तीर्थ क्षेत्रे आहेत. त्यापैकी आदयपिठ मोरगांव येथे आहे. मोरगांव ज्याला पूर्वीचे काळी भूस्वानंदपूर असे म्हटले जायचे तेथे मयुरेश्वर् श्री गणेश हे सिंदुरासुराचा सेनापती कमलासुराचे शिर जमीनीत गाडून, त्यावर विराजमान झालेले आहेत. तेथे श्री नग्नभैरवांचे व श्री महाबुध्दीमाता यांचे गुप्तस्थानांवर जावून ; दत्तप्रबोधिनी विधिमार्गांचा अवलंब करुन, सदर दैवतांचे कृपाशिर्वाद प्राप्त् केले. सदर कृपेचा अनुभव देखील आपणांस आपले समक्ष आणि दृश्य् स्वरुपातच येतो हे विशेष .
मोरगांव येथील मयुरेश्वराचे मंदीरास अकरा पाय-या आहेत. हया अकरा पाय-या अकरा भैरवांचे प्रतिक आहेत. हया पाय-या हेच दर्शवितात की, सदगुरु दासास नाम देवून अगोदर त्याचा कळस तयार करतात, मग तात्विक घुमट तयार करतात, आत्मिक गाभारा व जनहीतार्थ सभामंडप आणि अंतिम स्थितीला पाय-या बनवतात. म्हणजेच नामाआधारे संबंधित दासाचे भैरवोत्थान केले जाते. म्हणुनच भस्म् श्री गणेशाचे अधिष्ठानाचे राखणदार श्री नग्न् भैरव असल्याची बाब ही वस्तुस्थिती असण्याला दुजोरा मिळतो. पण हे तत्वाचा अभ्यास असेल तरच मिळते. केवळ बघणा-याला त्यामागील अर्थ जाणता येणे शक्य् नाही.
श्री गणेशाचे भस्म् गणपतीच्या स्वरुपात आपोआप साकारलेले मूर्तीमय रुप हा एक वेगळाच अनुभव होता. हया मूर्तीचे कुठल्याही कोनातुन अवलोकन केले असता, त्यामधुन हाच भाव प्रकट होत होता. समोरुन पहिले असता, भस्म गणेशाचे स्वरुप हे अगदी बाल गणेशासारखे दिसत होते. तर डाव्या किंवा उजव्या बाजुने अवलोकन केले असता, तो बसलेला छोटा हत्ती स्वरुपाचे वाटत होते. हया दोन्ही कोनातुन दिसलेल्या श्री रुपाचे मी कॅमे-याने फोटो टिपले आहेत. ज्यातुन माझे म्हणण्याची सत्यता अनुभवास येते.
भस्म गणेशाची स्थापना
भाद्रपद शु. चतुर्थीचे दिवशी सकाळी आम्ही शिवब्रम्हाचा वाचक भस्म् गणपतीची विधिवत घरच्याघरीच स्थापना केली. आरती करताना जणू काही समोर साक्षात श्री गणेश बसलेले आहेत आणि मी त्यांचीच आरती करीत आहे असे वाटते. आरतीचे शब्द् आणि हृदयातील भाव एकदम निश्चल् झाले होते. त्यावेळची माझी शारिरीक आणि मानसिक स्थिती ही वर्णनापलीकडचीच होती. त्याला आजही माझ्याकडे वर्णनासाठी शब्द् नाहीत. इतके मात्र खरे आहे. श्री गणेशाचे आगमनाने घरात एकदम वेगळेच चैतन्य् होते यात शंकाच नाही. दररोज आम्ही भक्तीभावाने भस्म गणेशाची आरती केली.
देवही भावूक आणि भक्तही
अनंत चतुर्दशीचे दिवशी श्री भस्म गणपतींना शिवब्रम्हात अंतर्धान करुन निरोप दयावयाचा होता. निरोपाचा क्षण जसजसा जवळ येत होता, तसतशी मनात कालवाकालव व्हायला लागली. काहीवेळ असे वाटले की, आपण महिनाभर भस्म् अर्जन करुन श्री गणेशाची स्थापना केलेली असल्याने तसे मनाला वाटत असेल. पण तसे नव्हतेच. आम्ही गणपतींची आरती केली. दर्शन घेतले. देवाकडे पाहीले तर काय आश्चर्य देव एकदम भावूक दिसले. गुलालामध्ये माखलेले श्री गणेश मूर्तीच्या दोन्ही डोळयांच्या कडा पाणावल्यासारख्या वाटल्या. ते पाहून माझेही डोळे कधी भरुन आले कळले नाही. देवाचे हे भावपरिवर्तन घरातल्या सर्वांच्या मनात घर करुन गेले. माझ्या लहान मुलाने आठवण म्हणुन श्री गणेशाचे ते भावूक रुप मोबाईल कॅमे-यात टिपले. देवही भावूक झाला होता. भक्तही भावूक झाला होता.
आगमन आणि विसर्जन हया केवळ मनोकल्पना देव सोबतच असतो हे सत्य् आहे
देवाला शेवटी हात जोडून निवेदन केले की, हे गणराया ज्या प्रकारे तुम्ही आमच्या घरी आलात, आहे त्या परिस्थितीतही सर्वांना आनंद दिलात. असेच वर्षभर निर्गुणातुन आणि भस्मातुन आमच्यासोबत रहा.तुमच्या कृपेचा वर्षाव असाच आमच्यावर रहावा सर्वांवर रहावा. देव कुठे जाणार होते. कुठेच नाही. आगमन आणि विसर्जन हे केवळ सगुणातले खेळ आहेत. मनाच्या कल्पना आहेत. देव निर्गुणातुन आणि भस्मातुन सदैव सोबतच रहाणार होते. अखेर शिवब्रम्हाचा वाचक भस्म गणपतींना गंगाजलाने स्नान घालुन, शिवब्रम्हात अंतर्धान करुन विसर्जित करण्यात आले. विसर्जनानंतर श्री गणेश आमच्यासोबत भस्म रुपाने सोबतच असुन, भस्म् अंगास चर्चिल्यानंतर त्यांच्या निर्गुण कोमल स्पर्श् रुपाची अनुभूती वारंवार प्रत्ययास येत आहे. माझी अनुभूती ही बरोबर असल्याचा दुजोरा श्री कुलदीप दादा निकम यांनी वेरुळ येथील कुंडावर स्नान केल्यावर भस्मार्चनाचे वेळी दिला. सदगुरुंनी सोपविलेले कार्य यशस्वीपणे पार पाडल्याचे समाधान मिळाले यापेक्षा अजुन काय अपेक्षा असावी. ?
फलश्रुती
खरं तर श्री भस्म् गणेशांचे भस्मार्जन, स्थापना, विसर्जन आणि नित्य् भस्मार्चन या सर्वांमधुन जो आनंद मिळत आहे आहे तो सगळया अपेक्षांच्याही पलीकडचा आहे. पण सदगुरुकृपेने हयाची फलश्रुती काय आहे याची माहिती मला मिळाली ती मी आपणास सांगत आहे.
ही मूर्ती भस्मार्जनातुन स्वहस्ते साकारलेली असल्याने, ती स्वयंप्राणप्रतिष्ठित असते. तिचे विसर्जनही घरीच करावयाचे असते. विसर्जनानंतर भस्म् गणपतीचे निर्माल्य् अतीजागृत असते. ते शिवनिर्माल्याचं काम करते. जे घरात देवघराजवळ एका डब्यात भरुन ठेवायचं आणि घरातील सर्वांनी वापरायचं. हया भस्माच्या वापराने कर्ज, दारिद्रय, नकारात्मक् शक्तींची बाधा, अलक्ष्मी, वास्तुदोष आणि पितृदोष हया सर्वांचा नाश होतो. भस्माचा वापर घरातल्या सर्वांनी सलग 1 वर्ष करावा. पुढील वर्षी पुन्हा भस्म गणपती बसवावा. यातुन देवाची जागृती व सदगुरु महाराजांची कृपा होते. मनुष्य् आध्यात्मिक मार्गावर आत्मक्रमण करीत राहतो. भस्म् गणपतीचे हे महात्म्य् गाणपत्य पुराणातही नाही. श्री गणेश हे हया विश्वाचा मूलाधार आहेत. त्यांचे आधारानेच हे विश्व् चलायमान असुन, शिवब्रम्हाचा तो योगमार्गाने परिचालक आहे. वाचक आहे.
अज्ञानापासुन ते विज्ञानाच्या पार पलीकडे सगळीकडे आध्यात्माचा प्रांत आहे. सुर्य आणि चंद्राच्याही पलीकडे निर्गुण तत्व आहे. निर्गुणाच्याही पलीकडे विदेहात सदगुरु महाराज आहेत. त्यांचे कृपेने दैवते सक्रिय असुन, विश्व् तत्व् अबाधित आहे. त्यांचे चरणकमल पादुकांवर चित्ताचा लय होणे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. सदरचे ध्येय साध्य् करण्यासाठी श्री गणेश कृपा अनिवार्य आहे. त्यासाठी सदगुरुंनी शिवब्रम्हाचा वाचक भस्मगणपतीचे विधान दिले आहे. जे ब्रम्ह् सत्य् असुन, त्यातुनच सर्व काही निर्माण आणि त्यातच सर्वांचे विलीनीकरण या वैश्विक तत्वाची प्रचिती देते जी सृष्टी निर्मीती अगोदर पासुन विदयमान असुन, ते शाश्वत् रहाणार आहे. जे कधीही भस्म होत नाही. श्री गणेशाचे स्वरुप वर्णन करण्यास माझी बुध्दी आणि मन फार तोकडे आहे. पण जेवढी अनुभूती आली तेवढे सांगितले. जे जाणवले ते सांगण्याचा भाबडा प्रयत्न् केला. काही चुकले असेल तर ते माझे म्हणुन माफ करावे. कुणी कितीही मोठा योगी असेल तरीही श्री गणेशाचे स्वरुप वर्णनास तो अपुराच ठरेल इतके हे स्वरुप व्यापक आहे.
आपणांसही भस्म् गणपतींचे आवाहन करावयाचे असेल, तर दत्तप्रबोधिनीत सक्रीय सहभागी होऊन, सर्व शिव कला हस्तकी आणि मस्तकी करुन घ्याव्यात. जेणेकरुन अध्यात्मिक मार्गावर योगाव्दारे आत्ममार्ग क्रमणास मोलाची मदत होईल. मनुष्य् जीवन क्षणभंगुर असले तरी त्याची जाणीव मात्र् मनुष्यास कधीच होत नाही. तो भौतिक जीवनात रममाण आहे. पण भौतिकता हे चिरंतन सत्य् कधीच नसते याचेही भान ठेवणे अनिवार्य आहे. सत्य् ज्ञान आणि अक्क्ल नेहमीच वय उलटून गेल्यावर येते अशी जी म्हण् जनमानसात प्रचलित आहे ती उगाच नाही.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...