शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार Balsanskar varg


सर्व ओव्यांच्या अधी व अंती ॐ लावुन, मोठ्याने सर्व पाठ बोलायला लावा. रोज नियमाने...!


ॐ नमो आद्या । वेदप्रतिपाद्या । जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥

देवा तूं चि गणेशु । सकलार्थ प्रकाशु ।
ह्मणे निवृत्तीदासु । अवधारिजो ॥ २ ॥

अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ।
मकारु महामंडल । मस्तकाकारें ॥ ३॥

हे तिन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवललें ।
तें मियां गुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥ ४ ॥

आतां ,अभिनववाग्विलासिनी । जि चातुर्यकलाकामिनी ।
ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥ ५ ॥

मज हृद इं सद्गुरु । तेणें तारिलों संसारपुरु ।
ह्मणौनि विशेषें मती आदरु । विवेकावरि ॥ ६॥

जैसें डोलेयां अंजन भेटे । तेव्हलि दृष्टीसि पाटा फुटे ।
मग वास पाहिजे तेथ प्रकटे । महानिधी ॥ ७ ॥

कां चिंतामणि जालेयां हातीं । सदा विजयेपण मनोरथीं ।
तैसा पूर्णकाम निवृत्ती । ज्ञानदेॐ ह्मणे ॥ ८॥

जाणतेन गुरू भजिजे । जेणें कृतकार्यां होइजे ।
जैसें मूलसिंचनिं साहाजें । निगति शाखापल्लव ॥ ९ ॥

जय जय वो शुद्धे| उदारे प्रसिद्धे| अनवरत आनंदे| वर्षतिये ||१०||

विषयव्याळें मिठी| दिधलिया नुठी ताठी| ते तुझिये गुरुकृपादृष्टी| निर्विष होय ||११||

तरी कवणातें तापु पोळी| कैसेनि वो शोकु जाळी| जरी प्रसादरसकल्लोळीं| पुरें येसि तूं ||१२||

योगसुखाचे सोहळे| सेवकां तुझेनि स्नेहाळे| सोऽहंसिद्धीचे लळे| पाळिसी तूं ||१३||

आधारशक्तीचिया अंकीं| वाढविसी कौतुकीं| हृदयाकाशपल्लकीं| परीये देसी निजे ||१४||

प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी| करिसी मनपवनाचीं खेळणीं| आत्मसुखाची बाळलेणीं| लेवविसी ||१५||

सतरावियेचें स्तन्य देसी| अनुहताचा हल्लरू गासी| समाधिबोधें निजविसी| बुझाऊनि ||१६||

म्हणौनि साधकां तूं माउली| पिके सारस्वत तुझिया पाउलीं| या कारणें मी साउली| न संडीं तुझी ||१७||

अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी| तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी| तो सकलविद्यांचिये सृष्टीं| धात्रा होय ||१८||

म्हणौनि अंबे श्रीमंते| निजजनकल्पलते| आज्ञापीं मातें| ग्रंथनिरूपणीं ||१९||

नवरसीं भरवीं सागरु| करवीं उचित रत्नांचे आगरु| भावार्थाचे गिरिवरु| निफजवीं माये ||२०||

साहित्यसोनियाचिया खाणी| उघडवीं देशियेचिया क्षोणीं| विवेकवल्लीची लावणी| हों देई सैंघ ||२१||

संवादफळनिधानें| प्रमेयाचीं उद्यानें| लावीं म्हणे गहनें| निरंतर ||२२||

पाखांडाचे दरकुटे| मोडीं वाग्वाद अव्हांटे| कुतर्कांचीं दुष्टें| सावजें फेडीं ||२३||

श्रीकृष्णगुणीं मातें| सर्वत्र करीं वो सरतें| राणिवे बैसवी श्रोते| श्रवणाचिये ||२४||

ये मऱ्हाठियेचिया नगरीं| ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं| घेणें देणें सुखचिवरी| हों देईं या जगा ||२५||

तूं आपुलेनि स्नेहपल्लवें| मातें पांघुरविशील सदैवें| तरी आतांचि हें आघवें| निर्मीन माये ||२६||

इये विनवणीयेसाठीं| अवलोकिलें गुरु कृपादृष्टी| म्हणे गीतार्थेंसी उठी| न बोलें बहु ||२७||

तेथ जी जी महाप्रसादु| म्हणौनि साविया जाहला आनन्दु| आतां निरोपीन प्रबंधु| अवधान दीजे ||२८||

जय गुरुदेव दत्त


हे पालकांसाठी...

सुर्यकवचाचे रोज सकाळी तीन पाठ करुन ते तीर्थ मुलाला पिण्यास द्या. कवच पाठ करताना पाण्याने भरलेल्या भांड्यावर आपला उजवा तळहात ठेवायला विसरु नका.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दत्तप्रबोधिनी मस्तिष्क मापन कार्यप्रणाली काय आहे ? - Works Quikly

या १० सवयी मुलांना लावाल तर ते उत्तरोत्तर सर्वांगीण प्रगती साधतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल.

दैविक आत्मोपचारिक उपायानुरुप साधकांचे स्वलिखित अनुभव पोस्ट ( Sadhak Experience Documented )

ही दत्तप्रबोधिनी लिँक जपुन ठेवा. यात सर्व Youtube Live व Facebook Live चर्चा माहीती संग्रह जतन केलेला आहे.

पारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्




Post a Comment

0 Comments

0