विदूरनीति- Read right Now



१. बलवानाने दांत धरलेला, दुर्बल, साधनहिन, सर्वस्व अपहार झालेला, विषयलंपट आणि चोर इतक्या लोकांना झोप येत नाही. 

२. आत्मज्ञान, यथाशक्ति उद्योग, सहिष्णुता व नेहमी धर्मनिष्ठपणा ही ज्याला पुरुषार्थापासुन भ्रष्ट करीत नाहीत त्याला मनुष्य असे म्हणतात.

३. प्रशस्त कर्माचे आचरण करणारा, निँद्य कर्मापासुन दुर राहाणारा, परलोक, पुरर्जन्म इत्यादीकांविषयी आस्तिक्य बुद्धी धारण करणारा, सद्गुरु आणि वेद वाक्यावर विश्वास ठेवणारा असा जो असेल तो विद्वान होय.

४. क्रोध, हर्ष, गर्व, लज्जा, उद्धटपणा आणि अहंता हे दोष ज्याला पुरुषार्थापासुन भ्रष्ट करीत नाहीत त्याला विद्वान म्हणतात.

५. ज्याचे भावीं कार्य अथवा भावी भावी कार्याविषयी केलेला विचार दुसऱ्यांच्या समजण्यात न येता ; योजलेले कार्य पार पडल्यानंतरच ईतरांच्या समजण्यात येते त्याला कर्म चातुर्यवाद असं म्हणतात.



0