बाहेर हुंडारणारा नवरा घरात स्थिर व्हावा यासाठी सौभाग्यवती माताभगिनींसाठी जालीम व्रत उपासना Devi Chudala Vrat


आपल्या भरतखंडात। ज्या साक्षात्कारी स्त्रिया होऊन गेल्या त्यात राणी चुडाला हिचे स्थान अढळ आहे.  आपल्या पतीस ब्रम्हज्ञान शिकवून दोघे ही परमपदाला गेली.  अशा दिव्य स्त्री चे व्रत करावे. व त्याची फलश्रुती काय आहे,  याबाबत संपूर्ण माहिती देतो.


सर्व प्रथम'ॐ नमः शिवायै' ची रोज ९ माळा पंचमुखी रुद्राक्ष माळीवर करावा. प्रमाणित जप माळ हवी असल्यास खालीलप्रमाणे लिंक क्लिक करावी. हे व्रत सुवासिनी भगिनींनी करावयाचे असते.  हे व्रत कोणत्याही महिन्यात करावे;  पण त्या दिवशी मंगळवार असावा.  भगिनीने मंगळवारी स्नान करून हिरवे पातळ परिधान करावे.  अंगावर एक दोन ठळक अलंकार (ऐपतीप्रमाणे) घालावेत.  नंतर देवापुढे एक पाट ठेवून त्यावर मूठभर तांदळाचे 11 ढीग करून ठेवावेत.  नंतर ढिगावर एक चांगली सुपारी ठेवावी.  नंतर प्रत्येक सुपारीला स्नान घालून ती पुसून परत त्या त्या ढिगावर ठेवावी.  त्यांना हळद कुंकू, गंध, फुल वाहावे.  नंतर प्रत्येक सुपारीला हात लावून "दुर्गामाता प्रसन्न" असा प्रत्येकी अकरा वेळा जप करावा.  नंतर तो पाट मध्यावर ठेवावा.  त्यावर निरांजन लावून ठेवावे, व पाटाभोवताली परत "दुर्गामाता प्रसन्न" असा जप करीत 11 प्रदक्षिणा घालाव्यात. 


इतके झाल्यावर आरती करावी.  अकरा सुपाऱ्यातील मधली सुपारी चुडालादेवी आहे असे समजावे.  चुडालाख्यानाची पोथी असेल तर त्यातील पहिल्या शंभर ओव्या वाचाव्यात.  पोथी असून वाचन शक्य नसेल तर त्या पोथीला नुसते गंध व हळदकुंकू वाहावे.  पोथी नसेल तर एका कागदावर देवी चुडाला प्रसन्न असे लाल शाईने लिहून त्या कागदाला गंध, फुल वाहावे.  हळदकुंकू लावावे.  पोथीवर अगर कागदावर चार आणे व ऐपतीप्रमाणे एखादा खण ठेवून तो एखाद्या गरीब सुवासिनीस द्यावा.  इतके झाल्यावर त्या सुपारी बाजूला काढाव्यात व सर्व तांदूळ गोळा करून त्याचा भात व लाल भोपळ्याची भाजी एवढेच जेवण व्रत करणाऱ्या भगिनीने जेवावे.  उपास करण्याची जरूर नाही.  रात्री जेवणास हरकत नाही.

या व्रतामुळे चुडालादेवी पूर्ण कृपा होऊन घरात मांगल्य व वैभव येते.  पतिप्रेम उत्तम राहते व सर्व संसार सुखाचा होतो.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दत्तप्रबोधिनी YOU TUBEसाठी येथे क्लीक करा

योग साधना विशेष संबंधित पोस्टस्

आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्

देवी उपासना संबंधित पोस्टस्

पारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्


त्राटक विद्या संबंधित पोस्टस्

वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्

अंकशास्त्र संबंधित पोस्टस्

पितृदोष संबंधित पोस्टस्

दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम




Post a Comment

0 Comments

0