पतीपासुन दुरावलेल्या महिलावर्गासाठी अत्यंत प्रभावकारक उपाय Domestic Violence solution husband wife problem

 

A very effective solution for women who are separated from their husband due to domestic problems and misunderstandings

परित्यक्त्या भगिनींसाठी ही उपासना करण्यास कठीण वाटली तरी तिची फलश्रुती अपार असल्यामुळे परित्यक्त्या भगिनींनी ती न कंटाळता व मोठ्या श्रद्धेने करावी.  ही उपासना केव्हाही सुरू करता येते.  पण त्या दिवशी शनिवार अगर अमावस्या असू नये.  ही उपासना 21 दिवस करावयाची असते.  

सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठावे,  प्रातर्विधी करून गरम पाण्याने स्नान करावे.  उपासनाकाळी थंड पाण्याचे स्नान वर्ज्य आहे.  नंतर आपल्या खोलीत भिंतीलगत एक आसन अंथरून त्यावर भिंतीला पाठ लावून सरळ बसावे,  डोळे मिटून घ्यावेत व 'भगवती" असा मंत्र 10 वेळा म्हणेपर्यंत श्वास हळू-हळू वर घ्यावा.  याला पूरक म्हणतात.  नंतर लगेच वरील मंत्र 20 वेळा उच्चारीपर्यंत तो श्वास तोंडाने सोडून द्यावा.  श्वास सोडताना व शिट्टी वाजविताना जसे आपण तोंड करतो तसे करावे.   इतके झाले म्हणजे एक प्राणायाम पुरा होतो.  असे एका बैठकीत 21 प्राणायाम करावेत.  या प्राणायामामुळे पुढील महत्वाची क्रिया करण्यास सोपे जाते.  


प्राणायामानंतर आपल्या पतीचा फोटो सुमारे तीन फूट लांबीवर ठेवावा.  त्याच्याकडे  1- 2  मिनिटे एकाग्र दृष्टीने पाहावे.  नंतर डोळे मिटून घ्यावेत.  पतीचा चेहरा डोळ्यापुढे तरळताच त्यास " माझ्या वरील राग व गैरसमज सोडून मला तुमच्याकडे बोलवा " असे वाक्य मनातल्या मनात उच्चारावे.  असेही 21 वेळेला करावे.  नंतर एक रोठा सुपारी घेऊन तिची पती म्हणून स्थापना करावी.  त्या सुपारीची पूजा करावी.  तिला गंध फुले वगैरे वाहून उदबत्ती ओवाळावी.  पती मला लौकरच घेऊन जातील असा बलवान विचार दिवसभर मनात आणावा.  प्राणायामामुळे व त्राटकामुळे तुमचे मन बलवान झालेले असल्यामुळे  वरील विचारही बलवान व प्रभावी असणे साहजिकच आहे.  


उपासनाकाळात उपास वगैरे करू नये.  दोन्ही वेळेला भरपूर जेवावे.  मात्र कांदा, लसूण व बाजारातील खाण्याचे पदार्थ अजिबात वर्ज्य करावेत.  मंगळवारी लालसर व शुक्रवारी शक्यतो शुभ्र वस्त्रे परिधान करावीत.  मोठ्या आनंदात राहावे.  भीती,  काळजी,  खेद वगैरे सर्व सोडून द्यावे.  नाहीतर उपासना त्वरित फलित होणे कठीण असते.  या उपासनेत मनाच्या अगाध शक्तीचा अनुभव घ्यायचा आहे.  

काही दिवसानंतर साधनकाळी तुमच्या मनात आणीत असणारे विचार पतीच्या अंतर्मनात जाऊन तो अस्वस्थ होईल.  तुम्हास परत बोलवावे असे त्यास आर्ततेने वाटू लागेल,  हे त्रिवार सत्य.  एकवीस दिवस ही उपासना मोठया श्रद्धेने करावी.  या उपासनेत फक्त योगमार्गाचा विनियोग आहे.  ज्या भगिनींची अन्य उपासना,  तोडगे अगर व्रते सफल झाली नाहीत त्यांनी वरील उपासना जरूर करावी.  उत्तम अनुभव येईल.  पतीला प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा त्याच्या अंतर्मनाला सूचना देण्याची अलौकिक किमया या उपासनेत आहे. 


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

व्यवसाय अथवा नोकरीत त्रास होणाऱ्या महिलावर्गासाठी विशेष तोडगा

संतती न होणाऱ्या महिलावर्गांसाठी अतिशय सोपी व प्रभावकारक साधना

दुःख दारिद्रयाने पीडलेल्या महिलावर्गांसाठी हा जालीम उपाय अनूभवपुर्ण आहे

चांगला पती मिळावा यासाठी अनुभवसिद्ध अत्यंत प्रभावकारक श्री कृष्ण गोपाळ व्रत.

हरवलेल्या कुलदैवतवर उपाय, कुलदैवत उत्पत्ती व योग्य जागर पार्श्वभूमी
Post a Comment

0 Comments

0