शिवतत्वाच्या अनुशंघाने योग्य कुलदैवत कुळाचार ( सगुण व निर्गुण ) कशा पद्धतीने ; कोणाच्याही मदतीशिवाय पुर्णत्वाला कसे पोहोचवता येईल; याहेतुने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून कुलदैवत साधना व साध्य अतिदुर्लभ माहिती देत आहोत.
कुलदैवत म्हणजे काय ?
संबंधित कुळातील ' मुळ पुरुष ' ( पुर्वजांपैकी ) सिद्धावस्थेद्वारा कुळात सर्वाभुत होणाऱ्या दैव आराधनेला परंपरागत घराणेशाही पद्धतीने ( गुरु - शिष्य परंपरा नाही ) कौटुंबिक कल्याणपुर्तीहेतु कुळपिंड अर्पण केलेल्या त्या मुळ पुरुष आधिष्ठित देवतेला कुळ वचनपुर्ती स्वगृही स्थापिले म्हणजे कुलदैवत...!
आपल्या घराण्यातील वंशावलीत मागील ३३ पिढ्या ज्यावेळी वरील तत्वाप्रमाणे धर्माचरण करतात तेव्हा त्या कुळदैवतेचा त्या कुळातील मुळ पुरुष उपरान्त ; त्या कुळाशी कुळपिंड, घराची वास्तु, पितरं व देहिक प्रकृतीशी प्रत्यक्ष सुक्ष्म संबंध प्रस्थापित होतो. हा ऋणानुबंधात्मक भाव पिढिजात जसाचा तसा जपल्यास घरातील सुख समृद्धी टिकुन राहातेच बरोबरच वृद्धींगतही होते. दत्तप्रबोधिनी तत्वाच्या माध्यमातून आपल्या घराण्यातील कुळदैवत योग्य प्रकारे साधनावलीत कशाप्रकारे सामावुन घेतले जाते यावर साधकांना पुर्वापारच मार्गदर्शन केले जाते.
ज्याक्षणी कोणताही संसारिक जीव मानसिक, शारिरीक, सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक कायाकल्पकतेकडे प्रस्थान करतो ; त्यावेळेस त्याला कुलदेवतेच्या आज्ञेची नितांत गरज असते अन्यथा मृगजळवादी भुमिका स्वतः भोवतीच गिरक्या मारते. कुलदैवतेकडुन प्रत्यक्ष आज्ञा येणं वेगळं व कुलदैवतेकडे कौल लावणं वेगळं... यात आकाश पाताळाचं अंतर आहे हे अधी समजुन घेतलं पाहीजे.
कुलदैवतेची उत्पत्ती कशी झाली ?
आज तुम्ही जेवढी कुलदैवते नावरुपाने ओळखता त्यात खंडोबा, धुळोबा, वेतोबा, नागोबा व ज्योतिबा ईत्यादी देवतांच्या नामाअंती " बा " चा उच्चार केला जातो कारण ही सर्व रुपे भगवान शिवाच्या श्री काळभैरवनाथाची प्रांतिय रुपे आहेत. ज्या ज्या प्रांतात देवाच्या भक्तांनी देवाला मोठ्या आवेशाने व भक्तीभावाने हाक मारली ; देव श्री काळभैरवनाथ त्या भक्ता स्वगृही जाऊन स्थिर झाला व काळांतराने त्या नाथयोग्यांच्या निर्वाणाने ते क्षेत्र "श्री क्षेत्र" म्हणुन उदयाला येऊ लागले.
आज आपण ज्या कुलदेवतेला जातो अथवा मानतो ; ती सर्वे " श्री क्षेत्र " म्हणुन प्रथम वरील प्रमाणे उदयाला आली. दिर्घकाळानुरुप दिशा, देश व काळ गणनेप्रमाणे त्या त्या प्रांतिय कुळनिदेशक स्तरावर श्री कुलदेवत म्हणुन लोककल्याणास्तव प्रसिद्ध झाली.
कुलदैवत क्षेत्रिय वलानात येणाऱ्या घराण्यांचे सर्वस्व आत्मानुचरण त्या घराण्यातील मुळ पुरुषांच्या अभिवचनावर ते दैवत चालवते. योग्य पद्धतीने सत्वाचरण केल्यास चैतन्य अनुभवता येते तर दुष्कर्म केल्यास चाबकाचे फटकेही बसतात. आमच्या पाहाण्यात तर अशावेळी कुलदैवतेचे त्या घराण्यासाठी दरवाजेही बंद झालेले पाहीले आहेत. म्हणुन नीट वागा अजुन काय सांगू.
कुळवाद - घराणेशाही - निष्णात पिढ्या ही सांगड व्यवस्थित असेल तर कुलदैवतेकडुन आध्यात्मिक मार्गक्रमणाचे द्वार उघडले जातात. अशा आध्यात्मिक मार्गावर प्रस्थान करण्यासाठी सद्गुरुचरणकृपेची नितांत आवश्यकता असते. एकदा की सद्गुरु महाराजांनी आपली आत्मिक जबाबदारी स्वीकारली ; मग कुलदैवतेच्या सगुण व व्यक्तीविषयक आराधनेची गरज राहात नाही.
सर्व कुलदैवते भगवान शिवाचेच स्वयंभु अवतार असतात जे सतत भ्रमंतीवलनपालक आहेत. फक्त आज झालेल्या घाणेरड्या बाजारीकरणाने आपल्याला कदाचित श्री कुलदैवत जाज्वल्य कळत नसवं ही शोकांतिका आहे. जर ईष्ट कुलदैवत साधक अपेक्षित सद्गुरु अनुग्रहीत आत्मावलोकन करण्यात सक्षमता दाखवत असेल तर त्याचे कुलदैवत त्याचा शोध घेत त्याच्यापर्यंत अवश्य त्याच्या घरात पोहोचल्याशिवाय राहाणार नाही ( जरीही कुलदेवत हरवलेले असले तरी )...हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...