संत श्री गणेशगिरी महाराज



त्यांचे वास्तव्य दिल्लीतील एका पिंपळाच्या झाडाखाली होते. कोणाशीही न बोलता ते आपल्याच तंद्रीत होते. म्हणुन त्यांना लोक वेडे समाजू लागले. काही लोकांनी त्यांना दगड मारण्याचा प्रयत्न केला आणि चमत्कार म्हणजे त्यांच्या दिशेने फेकलेले दगड हवेत तरंगत राहिले व नंतर बाजुला पडायचे. एकही दगड त्यांना लागला नाही.



                     गणेशगिरी महाराज हे नाथपंथीय होते. हिमालयात त्यांनी एक तपाहुन अधिक तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांचे वास्तव्य दिल्लीतील एका पिंपळ झाडाखाली होते. कोणाशीही न बोलता ते आपल्याच तंद्रीत होते. म्हणुन त्यांना लोक वेडे समाजू लागले. काही लोकांनी त्यांना दगड मारण्याचा प्रयत्न केला आणि चमत्कार म्हणजे त्यांच्या दिशेने फेकलेले दगड हवेत तरंगत राहिले व नंतर बाजुला पडायचे. एकही दगड त्यांना लागला नाही. हा प्रकार एका नेत्याने बघितला. त्यांनी बाबांजवळ जाऊन त्यांची विचारपुस केली. काय हवे काय नको ते विचारले. महाराजांनी त्या पिंपळाच्या वृक्षाखाली राहाण्यासाठी जागा मागितली. त्या नेत्याने जागा देऊन टाकली.     

                  लोक गणेशागिरी महाराजांना "पिंपळबाबा" म्हणून ओळखु लागले.पण त्यांचे खरे नाव गणेश कृष्णाजी मोरे असे होते. पुढे ते गिरीपंथात गेले व गणेशगिरी नावाने ओळख निर्माण झाली. हे मुळचे सातारा येथील होते. शालेय शिक्षण त्यांनी सोडले होते. दुसरा कामधंदा त्यांना नको होता. फक्त दत्त महाराजांची उपासना करीत. पंधरा-सोळाव्या वर्षी त्यांनी पुण्यात वास्तव्य केले. 

                   त्यांच्या आईने विवाहासाठी त्यांच्या मागे लकडा लावला पण प्रत्येक वेळी मला लग्न करायचं नाही हे ते निश्चयाने सांगत. लग्न करायचे नाही तर हिमालयात जाऊन तपस्वी बन असे ती उपरोधाने म्हणाली, त्यांनी मात्र ती आईची आज्ञा मानली व तडक हिमालयाला गेले. तेथे बारा वर्षे  तपश्चर्या केली व ते सिद्धपुरुष झाले. १९८० साली लाल किल्यासमोर ( लाहोरगेटच्या समोर ) त्यांनी समाधी घेतली.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...





GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments