साईनाथ महाराज निरुपण...New updates.ब्रह्मानन्द परमसुखदं केवलं न्यांनमूर्तिम्।

द्वंदवातीतं गगनसदृशं त्तत्वमस्यादिलक्षम् ।।
ऐकंनित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तम नमामि ।।

भावार्थ-


हे देवा साईनाथा (स+आई+नाथ=पुरुष + प्रकृती ) म्हणजे पालनकर्ता तू ब्रह्मस्वरूप आनंदरूप ; सुख दुःख यांच्या पलीकडे असलेला;न्यांस्वरुप आहेस. हे देवा  परमकृपालु परमेश्वरा तू काल वेळ यांचाहि पलीकडे असूनही सर्व ब्रह्माण्ड व्यापुन आहेस ,तूच सर्व तत्वांचे मूळ आहेस.तू आकाशाहून ही शुष्म आहेस. तूच एक आहेस, तूच नित्य आहेस ,तूच अचल आहेस,तूच मलरहित आहेस आणी देवा सद्गुरु नाथा तूच तर सर्व प्राण्यांच्या बुद्धिची प्रेरणा आहेस साक्षी आहेस. हे देवा सद्गुरु नाथा तूच तर आहेस जो भाव - भावनाच्या ही पलीकडे आहे अश्या ह्या सत्व रज आणि तमो गुण युक्त परमेश्वर सद्गुरु नाथा तुला माझा नमस्कार.


-------------------------------------------------


सदा दास हृदयीवसे साईंनाथा ।

तुला बोबडे बोल वेधोत नाथा ।।
जसे बोलविसि तू प्रभु अनंता। 
तसे या जना मार्ग दावींन आता ।।

भावार्थ-


हे सद्गुरु साईंनाथा; चराचर व्यापुन असलेले आपण जेह्वा  अर्जुनाचे सारथी झालात तेव्हा त्याचा उद्धार झाला , तैसेच आपण या देहरूपी रथात आरूढ़ असून आपल्या  दासांच्या कल्याणासाठी त्यांच्या हृदयी स्वार होऊन त्याचे सारथ्य करुण दासावर कृपा करावि .हे देवा आईस आपल्या बाळाचे बोल जसे लगेच कळतात तैशेच् या आपल्या बालकांच्या या बोबड्या बोलास (सेवेस) गोड मानुन कृपाकरा .हे देवा साईंनाथा हया जगताची प्रेरणा आपणच तर आहात,आपल्या इच्छेने तर हे जगत चालते,आपली इच्छाच सर्व कर्माचे मूळ आहे म्हणून दासांच्या हृदयी वास असणाऱ्या कृपालु नाथा ,सर्वसामान्य भक्तांच्या उद्धारासाठी या पामराकडून तू जे वदवतोस तोच प्रसाद म्हणून वाटला जाईन 

------------------------------------


अति बोलण्याचा असो वीट नाथा।

मना रंगवी अंतरी रंगी आता ।।
जिव्हे बोलीले बोल जे पूर्णनाथा ।
जना अर्थ बिम्बो मनी साईंनाथा ।।

भावार्थ -


हे देवा साईनाथा , या जड़देहाला सदैव उपाधिचा ( मोठे पणाचा  - `मी' या अहम् भावनेचा) हव्यास असतो ; तो जपन्या अणि वाढवण्यासाठी जीव सर्वेतोपरि झटत असतो .काया वाचा मने तो ”मी" पणाने जगतो ; त्याची वाचा ही वाचाळ होते आणि त्याचे शब्द त्याला कुकर्मास उदयुक्त करते.देवा तुझ्या नामाशिवाय इतर बोलने हे अतिच आहे कारन त्यात मी पणा असतो म्हणून जगतपालन करत्या साईंनाथा तूच  ऐसे अति बोलण्याचा मी पणाच्या भावनेचा भस्म  करुण आपल्यातील सर्व  भिंती पाडा आणि  मनाला अंतरीच्या  आपल्या ब्रह्मरूपी रंगात रंगवा. हे बुद्धीच्या प्रेरणादात्या पूर्णनाथा या दासाकडून  आपण जे वदवून घेता ते जनकल्याणा साठी श्रोत्यांच्या मनी अंतरी सुद्धा कृपा आशीर्वाद म्हणून बिम्बउन घ्या जेनेकरुन सर्वाना आपल्या पूर्णत्वाची अनुभूति येईल.

-------------------------------------------

श्रीधरा माधवा हरी वंदितो तुला । वंदितो तुला । 

हे विघ्नहरा प्रभु शारंगधरा गोपाळा ।।

भावार्थ -


श्रीधरा (लक्षमी पति म्हणजेच शुभ मांगल्य दाता) माधवा (वाणीत मधा सारखा गोडवा असणाऱ्या ) हरी (अशुभ अमंगल्य हरण करणाऱ्या)  तुला वंदन असो, 

  
हे देवा शारंगधरा(शारंग अश्त्राने दुष्टांचा विमोड करणाऱ्या ) गोपाळा (गो +पाल :गो= गाय म्हणजे पृथ्वी ,पाल=पालणकर्ता) विघ्नहरा तुला वंदन असो..


 हे देवा परमेश्वरा हे आपले विश्व त्रिगुण रहित आहे . आणि याच्या संतुलने विश्वाचे चलन होते .हे तीनही गुण संतुलन असणे खुप आवक्शक असते .संतुलनान्तरच साधकाला आपली  प्राप्ति होउ शकते . हे देवा "रजो" गुण  सत्व-रज-तमो गुनात संतुलांचे महत्वाचे कार्य करते.आणि रजो गन तर आपल्या हरी रुपात अधिक आहे ज्यामुळे साधकात उर्जेचा संचार होतो आणि आपल्या पूर्ण स्वरूपाच्या प्राप्ति साठीच्या साधनेत त्याला चालना मिळते, म्हणूनच श्रीधरा माधवा हरी वंदितो तुला...

--------------------------------------


श्रीधरा माधवा हरी वंदितो तुला -


मति दे मज श्री गुरु चरण सेवेशी । चरण सेवेशी ।  
पुरवावी तुवा ही । गाढ़ आस दिनाची ।।2।।

भावार्थ -

हे देवा श्रीधरा माधवा श्री गुरु चरण सेवेसि मति दे मज (येथे मति म्हणजे फ़क्त बुद्धि नसुन .. सद्बुद्धि हवी आहे जी अज्ञान आणि ज्ञान यातला भेद करून, ओळखून सदैव आपल्या सद्गुरु स्वरुपाच्या सेवेत ठेवेल , ती सद्बुद्धि सदैव काया वाचा मने गुरु सेवेसाठी प्रेरणा देईल)


हे देवा मांगल्यदात्या ह्या दिनाची( जन्म मृतूच्या फेऱ्यात अडकलेल्या ) एवढी आस पूरी करा.

-----------------------------------------


श्रीधरा माधवा हरी वंदितो तुला 


लागो झळा कोमल सुकुमारा ।
कोमल सुकुमारा । 
मनी लगे आस ही परमार्थाची । 
धाव पाव मुकुंदा शक्ति दे त्याची ।।3।।

भावार्थ- 


हे देवा श्रीधरा, माधवा ; मनुष्य हा जन्म-मृत्यु च्या फेऱ्यात अडकून केवल काल आणि वेळ फुकाच् घालवतो स्वताचा उद्धार करवुन घेत नाही आणि त्रिविध तापानी ग्रासुन जातो व् संसारात रमुन  भ्रमिष्ट होतो , परंतु जेव्हा त्याचा मनात जेव्हा आपल्याला जाणून घ्यायची इश्छा होते, म्हणजेच त्याच्या मनाचा तो नवीन जन्म नव्हे का! परंतु तेव्हा त्याचे मन हे आपल्याला जानन्याच्या बाल अवस्थेतच असते नहीं का ! म्हणून देवा माधवा अश्या सुकुमार अवस्थेच्या मनाला परमार्थाची आस लागो त्याच्या मनात आपल्या प्रेमाचे तरंग उठो  या साठीच  तर माधवा धाव आता पाव आता  आणि  मनाला शक्ति दे,प्रेरणा दे.

-------------------------------------------------


श्रीधरा माधवा हरी वंदितो तुला


ही तहान भूक ना राहे अचल चित्त राहे । 
अचल चित्त राहे । 
गुरुवाचुन दूसरे दैवत जगी ना हे ।।4।।


भावार्थ - 
हे देवा सद्गुरुनाथा आपल्या कृपाप्रसादाचा महिमा काय वर्णावा ,जैशे समुद्रात विविध श्रोत्रातुन पानी येते तरीही समुद्र अचल आणी स्थिर असतो त्या प्रमाणे ,केवल आपल्या कृपाप्रसादे साधकास सांसारिक सुख दुःख ,कर्म भोग यांचा माराही   हलवु शकत नाही त्यांचे चित्त आपल्या भक्तित अचल व स्थिर राहते ,त्याना स्थूलदेहिच मुक्तिची अनुभूति देणाऱ्या देवा सद्गुरुनाथा आपल्या शिवाय दूसरे कोणतेही दैवत या जगी नाही ..

----------------------------------------


श्रीधरा माधवा हरी वंदितो तुला


साष्टांग नमन साई चरणाला ।

साई चरणाला । 
या दिना बुद्धि दे तव चरणी भजनाला ।।5।।भावार्थ-हे देवा साईंनाथा ,सद्गुरु दयाघना आपल्या चरणी सेवा करण्याची इच्छा होने ही सुद्धा आपलीच कृपा आहे .आपण तर केवळ भावाचे भुकेले आहात आपणास पूर्ण समर्पण युक्त भाव आवडतो ,हे दयाघना आपल्या चरणी साष्टांग नमन(साष्टांग नमन म्हणजे  स्थूलदेहि जरी आठ अंगाने केलेला नमस्कार असला तरी मतितार्थ भाव हा केवल षड्रिपु आणि मन व चित्त यांचे आपल्या चरणी समर्पण करनेआहे) असो, हे देवा साई नाथा बुद्धिदात्या आता  सदैव आपल्या चरणी या दासाला   काया -वाचा- मने आपल्या विषयी  प्रेमयुक्त भाव (भजन) प्रकट करण्यासाठी सद्बुद्धि द्यावि.


==============================


श्री गुरु येती ज्यांचे घरा ।

श्री गुरु येती ज्यांचे घरा ।
वाहे आनंदाचा झरा ।।धृ।।

भावार्थ -

हे देवा सद्गुरु नाथा वर वर पाहता वरील पंक्तिचा अर्थ सरळ आहे की श्रीगुरु ( मांगल्य दात्या "गु"म्हणजे माया किंवा अंधकार  व "रु" म्हणजे प्रकाशरूप किंवा भ्रांति नष्ट करणारा )येती घरा तोचि  दासासाठी दीवाली आणि तोच दसरा...

      
वास्तविक पाहता आपण जेव्हा साकारु  (देहाचे भान असणाऱ्या ) साधकाच्या अज्ञानाचा विनाश करुण त्याच्या सर्व वासनांचा विमोड करुण त्याचे असे काहीच राहत नाही आणि त्यास आपल्या निर्गुण रुपाची जाणीव करुण देता तेव्हा त्याचे जे असते ते म्हणजे आपले एक सत्य ,नित्य ,अचल ,अनंत  आनंदमय चैतन्य स्वरुप.म्हणुनच आपण जेव्हा दासांच्या हृदयी म्हणजे घरी प्रकटता तेव्हा त्याची सर्व वासना सर्व विकार व अज्ञान विलोप पाउन आपले सत्यस्वरुप प्रकटते आणि दासांच्या अंतरी केवळ आनंदच राहतो त्या आनंदला पारावारच उरत नाही म्हणूनच ;श्री गुरु येती घरा वाहे आनंदाचा झरा...

-----------------------------------------


श्री गुरु येती ज्यांचे घरा ।


रुपे कांचन तुच्छय वाटे
तोड़े  फासे भवबंधाचे
त्यांची कृपा होई ज्यासी
दुःखे त्यासी ना पीडिति ।।1।।

भावार्थ -

हे देवा सद्गुरु नाथा आपला वास ज्या भक्ताच्या हृदयात असतो त्याला आपली अंशमात्र असलेली माया काय भुलावनार आपल्या शुद्ध आणि सत्य स्वरूपाच्या अनुभूति पुढे या जगतातील सर्व रत्ने, पैसा अड़का फीका आहे ,तो काय बरे आपल्या दासास भूल पाडेन. आपल्या निखळ कारुण्यमई  प्रेमस्वरूपा पुढे या जगतातील नाती-गोती ,भावबंधन किती काळ तग धरतील.


देवा सद्गुरुनाथा आपली कृपा ज्या पामरावर होईल त्याला सुख आणि दुःख या पलिकडिल असलेले आपण कसे बरे दासाला अज्ञानात म्हणजेच सुख आणि दुःखच्या फेऱ्यात ठेवणार, आपल्या कृपा प्रसादे आपल्या दासलाहि या सुख दुःखांचे पाश जखडु शकणार नाहीत .. दासांच्या मनात वैराग्य येणार हाच आपला खरा आशीर्वाद आहे.


---------------------------------------ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

Post a Comment

0 Comments