सुभाषितमाला निरुपण


सुभाषितमाला...


Meditation,Lord Dattatreya Upasana,Spiritual Ubuntu, Six chakra purification, Yogkriyaa, naamsmaran, Parayan upasana, Pitrudosh solutions, All Tratak Upasana.

नास्ति शत्रुं प्रकृत्यैव न च मित्र कदाचन l

सुखदं मित्रमित्युवतं दुःखदाः शत्रवः स्मृता ll

नास्ति शत्रुं प्रकृत्यैव – या जगात कोणी शत्रु ही नसतो, न च मित्र कदाचन – न मित्र असतो, सुखदं मित्रमित्युवतं – जो आपल्याला सुखदायी वाटतो, दुःखदाः शत्रवः स्मृता – ज्याच्या पासुन दुःख होते तो

भावार्थः 


या जगतात प्रत्यक्षात कोणी कोणाचा मित्र ही नसतो व शत्रु ही नसतो. जो आपल्याला सुखदायी वाटतो तो मित्र तर ज्याच्या पासुन दुःख होते तो शत्रु असे समजावे.


-----------------------------------


लब्धं वाsथ न लब्धं वा, स्वल्पं वा बहुलं तथा l

निष्कामेनैव भोक्तव्यं, सदा संतुष्टचेतसा ll

लब्धं वाsथ न लब्धं वा - काही लाभ होवो न होवो, स्वल्पं वा बहुलं तथा ' -  थोडे मिळो वा पुष्कळ प्राप्त होवो, निष्कामेनैव भोक्तव्यं -स्थितप्रज्ञ निरिच्छपणे ते भोगतो सदा संतुष्टचेतसा - कारण आता त्याचे चित्त सत् च्या लाभाने तुष्ट होते. 


भावार्थ :-


लहान मुल मोठे होते तसतशी त्याची खेळणी बदलतात. आता त्याला खुळाखुळ्याऐवजी ट्रायासिकल हवी असते. सोळा वर्षाच्या मुलीला कितीही किंमती बाहुली आणून दिली तरी त्याने ती आनंदित न होता 'कधी करिशी लग्न माझे' म्हणूनच विचारणार. तद्वतच जोपर्यंत जीवाचा विकास झालेला नसतो तोपर्यंत जीव इंद्रियभोग्य वस्तूत अडकतो. ह्याप्रमाणे गुरुकृपेने साधकाची जेव्हां वाढ होते तेव्हां अधिकाधिक शाश्वत आनंदासाठी तो तयार होतो. वरच्या पायरीवर पाय ठेवला कि खालची पायरी सुटते. याप्रमाणे साक्षात्काराचा महान आनंद वाट्यास आलेलाल्या लहान, क्षणिक गोष्टींचे काहीच सुखदु:ख नसते. प्रारब्धाने जे सहज मिळेल ते अलिप्तपणे तो भोगतो.


--------------------------------


नाहं जानामि केयुरे, नाहं जानामि कुंडले l

नुपुरे त्वभिजानामि, नित्य पादाभी वन्दनात् ll

नाहं जानामि केयुरे – तिचे केयुरे म्हणजे बाजुबंद, नाहं जानामि कुंडले – तसेच कर्णभुषणे ठाउक नाहीत. नुपुरे त्वभिजानामि – तिच्या पायातील पैजणे कशी आहेत ते माहीत आहे. नित्य पादाभी वन्दनात् – नेहमी पायावर डोके ठेउन नमस्कार केल्याने.


अर्थः 


सीतेचा शोध घेताना रामाने लक्ष्मणाला वाटेत सीतेचे काही दागिने पडले होते त्यावरुन काही ओळख पटते का? हे तिचेच दागिने आहेत का? असे विच्यारल्यावर सीतेला जो मातृवत मानुन तिला नेहमी वदंन करीत असे अशा लक्ष्मणाने रामास म्हटले तिचे केयुरे वाकी म्हणजे बाजुबंद ठाऊक नाहीत. तसेच कर्णभुषणे ठाऊक नाहीत. पण नेहमी पायावर डोके ठेऊन नमस्कार केल्याने तिच्या पायातील पैजणे तेवढी कशी आहेत ते माहीत आहेत.


-------------------------------


श्रोतं श्रुतेनैव न कुण्ड्लेन दनिन पाणिर्न तु कsकणेन l

विभात्ती कायः खलु सज्जनानां परोपकारेण न तु चन्दंनेन ll

श्रोतं श्रुतेनैव न कुण्ड्लेन  – आपले कान केवळ कर्णभुषणाने नव्हे. दनिन – उचित दानाने, पाणिर्न तु कsकणेन – बांगड्या आभुषणानेच नव्हे. विभात्ती कायः खलु सज्जनानां – सज्जनाचे शरीर खरोखर परोपकारेण – परोपकाराने न तु चन्दंनेन – केवळ चंदनाचा लेप लावल्याने नव्हे.


अर्थः 


सामान्यतः आपले कान केवळ कर्ण भुषणाने नव्हे तर चांगले एकण्याने सार्थ ठरतात (शोभुन) दिसतात. हात केवळ बांगड्या आभुषणाने नव्हे तर उचित दानाने शोभुन दिसतात. सज्जनाचे शरीर खरोखर परोपकाराने शोभुन दिसते. केवळ चंदनाचा लेप लावल्याने नव्हे. या जगात बाह्यरंग रुप याला केवळ महत्व नसुन आपली कृती-उदारता, सौज्यन्य, चांगुलपणा, बहुश्रुतता यालाच अधिक महत्व आहे.


-----------------------------------------


बहुनां जन्मनामंते ज्ञानवान्मा प्रपद्यते l

वासुदेव : सर्वमितिस महात्मा सुदुर्लभ :ll

बहुनां जन्मनामंते -  जो अनंत जन्माचे पुण्याईतून ज्ञानवान्मा प्रपद्यते - तो जन्मत:ची ज्ञानी असतो. वासुदेव : सर्वमितिस - सगळीकडे वासुदेवच आहे.त्याशिवाय दुसरे नाहीच. महात्मा सुदुर्लभ: - अशा प्रकारचा महात्मा अतीदुर्लभ आहे.


भावार्थ :-जो अनंत जन्माचे पुण्याईतून जन्माला आला आहे.तो जन्मत:ची ज्ञानी असतो व तो सर्वत्  वासुदेवच आहे.त्याशिवाय दुसरे नाहीच.या प्रकारे भक्ती साधुन सांप्रत जन्मात मुक्त होतो. अशा प्रकारचा महात्मा अतीदुर्लभ आहे.

----------------------------------


उब्दोधंक प्रेरंक च रज्जकं ज्ञानदं तथा !

चतुर्विधं च वत्कृत्वं सर्वमेकत्र दुर्लभम् !!

उब्दोधंक - अर्थ बोध करुन देणारे, प्रेरकम - प्रेरणादायी, रज्जकं ज्ञानदं - रंजक व ज्ञान देणारे, चतुर्विधं च - चारही गुणांनी युक्त,  वत्कृत्वं - भाषण, सर्वमेकत्र दुर्लभम् - सहसा दुर्मिळ असणारे.


भावार्थ :- 


आपणास अर्थबोध करुन देणारे किंवा ज्ञानात भर टाकणारे, तसेच प्रेरणादायी, रंजक व ज्ञान देणारे, असे चारही गुणांनी युक्त असणारे भाषण सहसा दुर्मिळ असते.


------------------------------------


नास्ति शत्रुं प्रकृत्यैव न च मित्र कदाचन !

सुखदं मित्रमित्युवतं दुःखदाः शत्रवः स्मृता !!

उब्दोधंक - नास्ति शत्रुं प्रकृत्यैव – या जगात कोणी शत्रु ही नसतो न च मित्र कदाचन – न मित्र असतो. सुखदं मित्रमित्युवतं – जो आपल्याला सुखदायी वाटतो. दुःखदाः शत्रवः स्मृता – ज्याच्या पासुन दुःख होते तो


भावार्थः 


या जगतात प्रत्यक्षात कोणी कोणाचा मित्र ही नसतो व शत्रु ही नसतो. जो आपल्याला सुखदायी वाटतो तो मित्र तर ज्याच्या पासुन दुःख होते तो शत्रु असे समजावे.


-----------------------------------------


गजाननं भूत गणादि सेवितं ।

कपित्थजम्बूफलसार भक्षितंम । 
उमासुतं शोक विनाशकारकं । 
नमामी विघ्नेश्वर पाद पंकजम॥ 

गजानन अर्थात गणेश, भूत - सजीव सर्व प्राणी मात्र या पृथ्वी तलावावर असलेले सर्व सजीव, गणादि - भगवान शंकर यांच जे सैन्य या सैन्यांना गण हा शब्द वापरला जातो आणि या गणांचा जो मुख्य सेनापती अधिपती म्हणूनच गणांचा मुख्य गणपती. सेवित -  सेवा केली जाते कोणाकडून तर भूत आणि गण त्यांच्या भक्तांकडून. कपित्थजम्बूफल - ज्याला कवठाच  फळ व जांभळं या दोन फळामधील गर खावयास आवडतो. सार - कवठा मधील गर व जाभंळातील गर भक्षितम - खावयास विशेष आवडतो. उमा सूत - पार्वतीचा मुलगा शोक विनाशकारकं - दुःखाचा विनाश करणारा. विघ्नेश्वरपादपंकजम - विघ्न नष्ट करणारा गजानन ज्याचे चरणकमल कमळा समान आहेत अशा गजाननाला मी वारंवार नमस्कार करतो. 


भावार्थ : 


सर्व भूत व सजीव यांच्याकडून सेवा केलेला गणपती  जो उमा म्हणजे पार्वतीचा मुलगा आहे जो शोकाचा निवारण करणार आहे व दुःखाचा नाश करणारा आहे विकारांचा निवारण करणारा आहे ज्याला कवठाचा फळ व जांभळामधील गर आवडतो. पार्वतीचा मुलगा असून दुःखाचा विनाश करणारा गणपती जो विघ्न नष्ट करणारा आहे. ज्यांचे पाय कमळासारखे आहेत अशा चरणांना माझा वारंवार नमस्कार असो.


------------------------------------------------


चंदन शीतल लोके चंदना दपि चंद्रमा । 
चंद्रा चंद्रयोर्मध्ये शीतला साधू संगती॥

भावार्थ...


चंदन शीतल लोके - चंदन गुणाने थंड असते .

चंदना दपि चंद्रमा - चंदनाचे चांदणे शीतल असते. 
चंद्रा   चंद्रयोर्मध्ये  -  चंद्र आणि चंदन यांमध्ये.
शीतला साधू संगती  -  चांगल्या लोकांची संगत अधिक चांगली.

भावार्थ - या जगात चंदन गुणाने थंड असते त्याहूनही अधिक चंद्राचे चांदणे शीतल असते. चंद्र आणि चंदन याहूनही सज्जन लोकांची संगत अधिक आल्हाददायक व आपणास प्रसन्न करणारी असते.

----------------------------------------------------------


अकृत्वा परसन्तापं अगत्वा खलानम्रताम् ।

अनुसृत्य सतां वर्त्म यदल्पमपि तद्बहु ॥ १

भावार्थ...


दुसर्यायला त्रास न देता, दुष्टांशी लाचारी न करता जरी थोडंच मिळालं तरी ते पुष्कळ आहे. [नेहेमी आपले आचरण शुध्द ठेवावे मग फळ जरी थोडे कमी मिळाले तरी चालेल.]


जो पर्यंत देह आहे तो पर्यंत अवदसा नेहमी सद्बुद्धी शेजारी ठाण़ मांडुन असते. कधी संभ्रम उत्पन्न होईल आणि कधी ती घुसुन सर्वसत्यानाश करेल हे सांगता येत नाही.


यापासुन बचाव पाहिजे असल्यास स्वामींस्वावलंबी बना. स्वामींच्या नावाने मुर्ख बनवणार्यांपासुन दुर रहा.


----------------------------------------------------------------------------


सुभाषितमाला...


अक्रोधेन जयेत् क्रोधमसाधुं साधुना जयेत् ।

जयेत्कदर्थं दानेन जयेत्सत्येन चानृतम् ॥ २

भावार्थ...


सहनशीलतेने क्रोधाला जिंकावे, दुर्गुणाला सद्गुणाने जिंकावे, कृपणतेला दानाने जिंकावे, आणि असत्याला सत्याने जिंकावे.

कलंकीत वृत्तीच मनुष्याला सद् प्रकाशाचा मार्ग दाखवते. केलेल्या दुष्कर्माचा पश्चात्ताप पैसा आणि प्रसिद्धीच्या माजा़ने मृत्यू येईपर्यंत होत नाही. दुष्कर्म केले तरी देह माती होणार. आणि सत्कर्म केले तरी देह मातीच होणार.

या द्वंद्वात 'सद्गुरु स्वामीं महाराज" तरणोपाय सांगताता,

"अरे मानवा... तु सत्कर्मात अतिरेक कर, अथवा दुष्कर्मात अतिरेक कर... देहाची माती तर होणारच. देह पतन तर होणारच.
यापेक्षा तु कार्यकारण भाव समजुन अकर्माचा अद्वैत सिद्धांत मान... कारण ( निष्काम कर्मयोग ) अकर्माचा अतिरेक केलासच तर दत्तविभुती ठरशील...!" ( यालाच महाराज अक़लेचे कोट बांधा असे म्हणत़ )

---------------------------------------------------------------------------


सुभाषितमाला...


अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः ।

अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते ॥ ३

भावार्थ...


रोहित हा [एक मोठा मासा] खूप खोल पाण्यात विहार करून सुद्धा गर्व करीत नाही. पण शफरी मात्र टीचभर पाण्यात असली तरी [गर्वाने] फुगते.


गर्वाचे पाच प्रकार... मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक.


मन आपलं नाही... जो आत्मा आपण जाणत नाही तो आपला नाही... जो भटकणारा जीव सुद्धा आपला नाही, बुद्धी आपली नाही... मग ज्या देहमातीवर आयुष्यभर ईतक्या उड्या मारता तो तरी आपला होईल कसा...?


आपली कालही मातीच होती, आजही मातीच आहे उद्याही मातीच होणार... फरक फक्त ईतकाच की सद्गुरुचरणकृपे कोणत्या मातीतुन मोती बाहेर निघेल़... आणि नारायणरुपाला प्राप्त होईल...!


( देहमृत्यु हेची पाण्याचा बुडबुडा l तपस्येने स्वर्ण होई ll )


----------------------------------------------------------------------------


सुभाषितमाला...


अग्निदाहे न मे दुःखं छेदे न निकषे न वा ।

यत्तदेव महदुःखं गुञ्जया सह तोलनम् ॥ ४

भावार्थ...


अग्नीत जाळण्यामुळे मला दुःख नाही, तोडण्यामुळे अथवा दगडावर घासण्यामुळेही मला दुःख नाही; परंतु गुंजेबरोबर तोलण्यामुळे मात्र मला अतिशय दुःख होते.


जे स्वयंभु आहेत. जे पुरुष प्रकृती पलीकडील परमतत्व आहे. अशा सद्गुरु महाराजांना अनन्य भावाने शरण जावे. आत्मसमर्पण वृत्ती जागृत करावी. एकदा स्वतःशी ठाम निश्चय झाला की आकलन शक्तीच्या अंता पर्यंत प्रयत्न करावेत. स्वामींलयबद्ध प्रयत्नांना सद्गुरु प्रयत्नांती साथ देतात.


हे प्रामाणिक प्रयत्न करताना सद्गुरु महाराजांना संसारीक जीवनांच्या भेकड आणि कधीही न संपणार्या वासनायुक्त गरजांसाठी भावनात्मक वेठीस धरु नये. म्हणजेच गुंजेबरोबर महाराजांची तुलना करु नये.


-----------------------------------------------------------------------------


सुभाषितमाला...


अग्निशेषमृणशेषं शत्रुशेषं तथैव च ।

पुन: पुन: प्रवर्धेत तस्माच्शेषं न कारयेत् ॥ ५

भावार्थ...


अग्नि, कर्ज आणि शत्रु निच स्तरांवर जरी अस्तित्वात असले तरी त्यांच्यात वाढ होतच असते. यापैकी कोणालाही निच स्तरावरही टिकु देऊ नये.


अग्निचा अभिप्राय दाह आसा आहे. दाह चे तीन प्रकार आहेत.

१. आदीभौतिक 
२. आदीदैविक 
३. आदीआध्यात्मिक
कर्जचा अभिप्राय ऋण असा आहे. ऋणाचे ही मुख्य तीन प्रकार आहेत.
१. मातृ पितृ ऋण 
२. वसुंधरा ऋण 
३. आत्म ऋण
शत्रुचा अभिप्राय षड् रिपु असा आहे. शत्रुचे सहा प्रकार आहेत.
१. काम
२. क्रोध
३. लोभ
४. मद्
५. मत्सर
६. अहंकार

----------------------------------------------------------------------------


सुभाषितमाला...


अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशनविहीनं जातं तुण्डम्।

वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चत्याशा पिण्डम् ॥ ६

भावार्थ...


शरीर थकले आहे. डोके पांढरे झाले आहे. तोंडात दात नाहीत. म्हातारा काठी घेऊन जात आहे. [इतके म्हातारपण आले तरीहि] हाव माणसाला सोडत नाही.


बहीर्मुखी वृत्ती मनुष्याला भौतिकवादात ईतकी अडकवुन ठेवते जसा सोन्याच्या पिंजऱ्याला बंदिस्त पाखरु भुलणें. युगेन् युगे हीच व्यथा. हीच शोकांतिका.


ज्याप्रमाणे विहीरीतील बेडकाला भौतिक तटबंदी सर्वस्व वाटते त्याचप्रमाणे संसारीक मनुष्य क्षणभंगुर विषय आसक्त असतो. शाश्वत आत्मवाद आणि नाशवंत देहबुद्धी या संभ्रमात मनुष्य नाशवंत विषय जेव्हा वाहुन घेतो तेव्हा तो जीवन हारलेला, कालांतराने जे नाशवंत आहे ते तर गमवतोच सोबत शाश्वत सद्गुरु आत्मवादालाही कायमस्वरुपी मुकतो. " धोबी का कुत्ता न घर का न घाट का...! "


------------------------------------------------------------------------------


सुभाषितमाला...


अङ्गणवेदी वसुधा कुल्या जलधिः स्थली च पातालम् ।

वाल्मिकः च सुमेरुः कृतप्रतिज्ञस्य धीरस्य ॥ ७

भावार्थ...


आध्यात्मिक प्रतिभाशाली व्यक्तीस विशाल जग एका खेळ मैदानासारखेच दिसते. उसळणारी नदी एक साधारण कालवा वाटतो. उत्कट पाताळ एक बगीचा आहे असं जाणतो. कधीही उल्लंघन न होणारे सुमेरु पर्वत टेकडी समान दिसते.


ही योगी पुरुषाची स्वाभाविक लक्षणे दिसण्यास सर्वसाधारणच वाटतात पण त्या महासागराला वरुन पहाणे वेगळे आणि तळाशी जाऊन पाहाणे वेगळे.


जो तळशी पोहोचतो तोच पाताळ बागेत दैव दर्शनहेतु प्रवेश करण्याचा अधिकार प्राप्त करतो. आणि जो सद्गुरुकृपे अधिकार प्राप्त करतो त्यालाच वरील स्वाभाविक कला अवगत होतात. हे असे एक गहन शास्त्र आहे.


----------------------------------------------------------------------------


सुभाषितमाला...


अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यते विशेषज्ञः ।

ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रम्हाऽपि च तं नरं न रञ्जयति ॥ ८

भावार्थ...


अज्ञ माणासाची समजूत घालणे सोपे. विशेष जाणणाऱ्या माणसाची समजूत घालणे त्याहून सोपे. परंतु अर्धवट ज्ञानाने गर्विष्ठ झालेल्या माणसाची समजूत प्रत्यक्ष ब्रम्हदेवही घालू शकत नाही.


ज्ञानाचा उपयोग फक्त अज्ञान दुर करण्यासाठीच...! एकदा काट्याने काटा काढला की राहीलेला काटाही जवळ ठेऊ नये. अनायासे टोचत राहुन अहंकार उत्पन्न करतो.


अर्धवट ज्ञान नेहमी धोकादायक असते. अर्धवट ज्ञानने माजलेला स्वतःही डुबतो आणि सोबतच्याला ही डुबवुनच शांत होतो.


----------------------------------------------------------------------------


सुभाषितमाला...


अतिकुपिता अपि सुजना योगेन मृदूभवन्ति न तु नीचाः ।

हेम्नः कठिनस्यापि द्रवणोपायोऽस्ति न तृणानाम् ॥ ९

भावार्थ...


अतिशय क्रोधाविष्ट झाले तरीसुद्धा सज्जन मिळते घेतल्याने नम्र बनतात, परंतु दुष्ट नम्र होत नाहीत. सोने कठीण असले तरी ते वितळविण्याची युक्ती आहे. परंतु गवत वितळविण्याची युक्ती नाही.

योगी सज्जनांचे विचार आणि वचनें ही मुकुटमणी प्रमाणे असतात. समाज त्यांच्या विचारांना आचरणात आणत असल्यास ते जनहीताचे मुकुट असतात. त्याच्या विचारांचा वचनांचा आदर न केल्यास योगी पुरुषांना काही फरक पडत नाही. कारण त्यायोगे ते ऐकांतात राहुन देह सुकवत असतात. त्यांच्यात विनयता सदाविराजमान असते.
योगीयांचा स्वभाव आपलासा करुन घेणे तत्वाला अनुसरुन शक्य असते.

दुष्टजनांना सन्मान न दिल्यास ते नम्र होत नाहीत. मन दुखवण्याचे, क्लेश देण्याचेच कारस्थान रचतात. अशा पापीं दुराचारी गवताप्रमाणे कालांतराने गळुन पडतात.


दुष्टजनें तत्वात बसत नाहीत म्हणुन त्याच्याशीं सद् विचारी जनें सहमत होत नाहीत.


----------------------------------------------------------------------------


सुभाषितमाला...


अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति ।

मलये भिल्लपुरंध्री चन्दनतरुकाष्ठमिंधनं कुरुते ॥ १०

English Meaning...


When some body very close (like family) advises, it is ignored.

Anything available in abundance is mostly abused. Just like sandal wood being used for fuel by a Bhilla woman. Bhilla is a tribe living on the Vindhya mountains where sandal wood is in aboundance.

भावार्थ...


अतिशय परिचय झाला की मान राहत नाही. सतत जाण्याने अनादर होऊ लागतो. मलय पर्वतावरील भिल्लस्त्री चंदनच सर्पण म्हणून वापरते.

जीवनात जर कोणाकडुन आपला अनादर आणि फसवणूक नको हवी असेल तर खालील प्रमाणे मती ग्रहण करावी.

या पाच वर कधीही विश्वास ठेऊ नये.

१. नदि - नालें
२. ज्या लोकांकडे अस्त्र शस्त्र असते,
३. नख़ आणि शिंगधारी जानवऱ,
४. स्त्री, ( ईथे ईशारा भोळ्या चेहेर्याला अनुसरुन, आई, बहीणींनो वाईट मानु नका. )
५. राज घराण्याच्या लोकांवर ( विशेषतः देवाधर्माच्या नावावर ज्यांनी प्रोपर्टी आणि राजघराणें बनवले असे तें )

वरील ५ बरोबर अतिपरिचय घडला तर धोका निश्चितच...!


---------------------------------------------------------------------------


सुभाषितमाला...


अधमाः धनमिच्छन्ति धनं मानं च मध्यमाः ।

उत्तमाः मानमिच्छन्ति मानो हि महताम् धनम् ॥ ११

English Meaning...


Rogues crave only for money, not honour. An average man makes effort to get money and some honour. But the virtuous people always try to earn honour, not money. Honour is much more important than money.


भावार्थ...


'दुरात्मे' फक्त पैसा आणि प्रसिद्धीचे वेडे असतात. त्यांना आत्मसन्मानाबद्दल आवड नसते. 'मध्यम' लोकांच्या भुमिकेत पैसा मिळवणे हेतु मेहेनत तर घेतातच पण अंशीक आत्मसन्मान मिळावा ही देखील सद्ईच्छा असते. 'सज्जन' लोक पैसा ओढण्यापेक्षा आत्मसन्मानावर जास्त भर देतात. आत्मबळ वाढणें हे आत्मसन्मान वाढण्यावर अवलंबून असते. त्यायोगे आत्मसन्मान धनार्जनापेक्षा जास्त महत्वाचा आहे.


---------------------------------------------------------------------------


सुभाषितमाला...


अनाचारेण मालिन्यं अत्याचारेण मूर्खता ।

विचाराचारयोर्योगः सदाचारः स उच्यते ॥ १२

English meaning...


Bad behaviour ( when mind, speech and body is not in even state ) causes contaminated character. Immature behaviour leads to stupidity. So always think thousands of time before practical take up. It helps to avoid disappointment.


भावार्थ...


अनाचाराने मलिनता येते आणि अत्याचाराने मूर्खता प्राप्त होते. म्हणून विचारयुक्त असा जो आचार त्याला सदाचार म्हणतात.

मन, काया आणि वाचा स्थिर नसल्यास अथवा भेदबुद्धीयुक्त असल्यास अनाचार होतो. आणि चारित्र्य गढुळ होते. कोणतीही कृती करण्याआधी त्याच्या परिणामांचा विचार करणें महत्त्वाचे. वेळ गेल्यावर रडत बसण्यात मुर्खपणा समजावा.

सद्गुरुनीती आणि सदाचार हाच श्रेष्ठ धर्म समजावा. सदाचार म्हणजे आत्म्याला अनुसरून विचारयुक्त असा जो आचार त्याला सदाचार म्हणतात.


--------------------------------------------------------------------------


सुभाषितमाला ( Subhashitmala )


अनारम्भो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणं ।

प्रारम्भस्य अन्तगमनं द्वितीयं बुद्धिलक्षणं ॥ १३

English Meaning...


Not starting over ambitious projects is the first sign of intelligence. But once started, sustaining interest till it is completed is the second sign.


भावार्थ...


अत्यंत महत्वाकांक्षी कार्य.. मग ते मानसिक, शारीरिक, अर्थिक, सामाजिक अथवा आध्यात्मिक असेल.. ते तात्काळ सुरु न करणें हे योग्य बुद्धीनियोजनाचे चांगले लक्षण समजावं.


पण ज्या वेळी प्रारंभा कराल, तेव्हापासून सातत्य आणि चिकाटी ठेऊन कार्य पुर्ण कराल.. हे उत्कृष्ट बुद्धीनियोजनाचे द्वितीय लक्षण समजावं...!


--------------------------------------------------------------------------


सुभाषितमाला... ( Subhashitmala )


अनाहूतः प्रविशति अपृष्टो बहु भाषते ।

अविश्वस्ते विश्वसिति मूढचेता नराधमः ॥ १४

English Meaning...


Going to places un-invited, taking too much when not asked, trusting the unworthy are the qualities of a foolish bad people.


भावार्थ...


निमंत्रण न मिळालेल्या ठिकाणी जाणें हे अतिरेक वृत्तीचे अतिमुर्खतेचे लक्षण आहे. त्याहुनही जे लोक 'पाखंडी आणि धोकेबाज माणसांवर विश्वास ठेवतात' ते तर अतिमुर्खतर आहेतच सोबत वाईटही असतात.

कोणाच्याही बोलण्यावर विश्वास न ठेवता तत्वाला अनुसरून माणसे ओळखाणे. दुकानात काय माल भरलाय हे ओळखायचं असल्यास त्या दुकानाचे शटर् वर होणे महत्त्वाचे. त्याचप्रमाणे माणुस कसा आहे हे ओळखायचं असल्यास त्याला बोलकं करणं महत्त्वाचे...!

--------------------------------------------------------------------------


सुभाषितमाला... ( Subhashitmaalaa...)


अनेकसंशयच्छेदि परोक्षार्थस्य दर्शनम् ।

सर्वस्य लोचनं शास्त्रं यस्य नास्त्यन्ध एव सः ॥ १५

English meaning...


Clearing all doubts and the knowledge which is beyond physical limit is called as a third eye of lord shiv. Man is completely blind without this third eye.


भावार्थ...


अनेक शंकांचे निरसन करणारे आणि दृष्टीच्या पलीकडील विषयांचे ज्ञान करून देणारे शास्त्र म्हणजे सर्वांचा डोळा आहे. हा शास्त्ररुपी डोळा ज्याला नाही तो आंधळाच होय.


जोपर्यंत उन्मत्त जीव विषयातुन बाहेर येऊन शिवस्वरुप धारण करत नाही तो पर्यंत जीवन निर्रथक समजावं. शिवनेत्र धारण असलेल्या व्यक्तीस अंतर्भुत गुणदोषांचे परिपक्व परिपूर्ण ज्ञान होते. सद्गुरु साधनेत राहीलेल्या उणीवा दिसु लागतात त्यायोगे आत्मसाक्षात्काराचा मार्ग मोकळा होत असतो.

ज्याला शास्त्ररुपी डोळा नाही तो अभागीच समजा. त्याचा जन्म वाया गेला हे निश्चितच...!

-----------------------------------------------------------------------


सुभाषितमाला... ( Subhashitmala )


अन्नदानं परं दानं विद्यादानं अतः परम् ।

अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवं च विद्यया ॥ १६

English Meaning...

Giving food in charity is a noble thing. But, giving education in charity is nobler. For the satisfaction that food gives is transient. Education is for life.


भावार्थ...


अन्नदान करणें हे श्रेष्ठ दान समजावं. पण सत् पात्री आत्मज्ञान दान करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठत्वास प्राप्त असते. अन्नग्रहणाने मनाला क्षणिक तृप्तीचा अनुभव होतो. पण आत्मज्ञानाच्या आकलनाने जीवनच समाधानकारक आणि आनंदमय बनते.ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती


Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code BelowPost a Comment

0 Comments