स्वामी काव्य आणि निरुपण


स्वामी काव्य अभंग...

स्वामी देती आत्मबळ l आचरणे पाहुनी आपुले ll

आत्मबळ देती ज्ञान l श्रीचरणे मस्तकी आपुले ll   १ 

English meaning...

Worship Lord Dattatreyaa swami maharaj to develop subconcious power within u r body. Its all depend on u r clean and transparent behaviour of all time.
Once u start gaining subconcious power. Subsequently u will receive six Chakra knowledge... Depends how u conceive and digest it...! It starts flowing through u r head into u r body.

भावार्थ...


आपलं आचरण जर सात्विक आणि तात्त्विक असेल तर महाराज आपलं आत्मबळ वाढवतात. त्यासाठी आपण सदैव कृतज्ञ आणि पारदर्शक राहाला हवं.

आत्मबळापोटी ब्रम्हज्ञानाची प्राप्ती होते हे सर्वस्वी तुमच्या ग्रहण आणि पचनशक्तीवर अवलंबून आहे. मस्तकीज्ञान पचवणे साधलें तर ईतके कठीणही नाही. फक्त आत्मसमर्पण भाव श्री चरणीं स्मरणें परमहीतकारक...!
---------------------------------------------------------------------------

स्वामी काव्य अभंग...


ह्दयी स्वामी पाहता विशेष l मन भरले वाहुनी ll

काय वर्णवु मी पामर l तव चरणी पडलो राहुनी ll  २ 

English meaning...


While worshipping lotus feet of lord dattatreyaa swami maharaj, our Gratitude must be at the bottom of heart. U will be blessed and mind over flows with unexplainable pleasure.

Its beyond human explanations. I have surrendered knowingly.

भावार्थ...


आपल्या ह्दय महासागराच्या तळाशी पोहोचुन अर्थात अंतर्मुखी होऊन महाराजांना पाहाण्याचा प्रयत्न करा. असं न घडल्यास मन काया आणि वाचा सद्गुरुकृपे भरुन वाहाणार नाही.

मग ज्या स्थितीप्राप्तीला शब्दही खुंटतात. तिथे मी काय वर्णवु शकतो...? माझं स्थायित्व फक्त सद्गुरु चरणींच....!!!

-----------------------------------------------------------------------------


स्वामी काव्य अभंग... ( Swami Abhangaa...)


जीव होतां विषयसुखी l गमवी स्वामीबोध अंतरी ll

या हो या मज तारावय l शिव करा हो श्री निरंतरी ll  ३

English Meaning...


Mind is full of distractions. How to overcome with it, in order to understand lotusfeet of Sadguru maharaj.

Ohh my Sadguru swami, Please have a mercy on me. Hold me in this hell. While chanting naamsmaranaa turn my Jivaa with Lord Shiv As U r Supremacy.

भावार्थ...


विषयाधीन जीव अनायासें ओढला जातो. हे तर कित्येक जन्माजन्मांतरापासुन चालत आलं आहे. आज ही तेच होत आहे. आणि यापुढेही तेच होणार...!


स्वामींबोध ह्दयी प्रकटने हे फक्त आणि फक्त ज्याच्या त्याच्या हातातच आहे. यासाठी मनाला लगाम घालुन सद्गुरुनीतिकडे वळवावं लागतं. मगच दिर्घकाळासोबत अधी दासबोध होतो.

दासबोधाला अनुसरूनच स्वामींबोधाची व्याप्ती कळायला सुरवात होते. यायोगे महाराजांच शुद्ध अंतकरणाने अंतर्मुख होऊन आवाहान करता आलं पाहीजे. तरचं श्री मताचे शिवरुप प्राप्त होण्याची शक्यता आहे. अन्यथा छोटे मोठे अनुभव सोडुन काहीही मिळणार नाही...!

-----------------------------------------------------------------------------


स्वामी काव्य अभंग...( Swami kavyaa abhangaa )


साधू साधु म्हणता जन l काय धुतले हेची कळेना ll

येता जाता बोली मुखे l स्वामीमयता आकळेना ll  ४

English meaning...


Who is Sadhu ? Who is monk here ? how to identify a right person in spirituality.? Any real monk never lives in glamorous life. He must be fucused on washing all six ripu ganaa.

Speaking big things in public with show off is not spiritual growth. First spiritual speaker must follow vairagyaa and sadguru paramparaa.

भावार्थ...


महापुरुष बंगल्या राहात नाही. महापुरुष करोडो रुपयांच्या गाडीत फिरत नाही. महापुरुष देवाधर्माच्या नावाने दुकाने उघडुन बसत नाही. महापुरुष स्वामीं सद्गुरु परंपरा झुगारुन स्वतःच्या मुलांना उत्तराधिकारी बनवत नाही.


खरा साधु कसा असतो...? कसा ओळखावा...? जो स्वतःचे षट् विकार जाळतो अथवा धुवुन टाकतो तोच साधु समजावा. षट् विकार धुताना भक्तीभावासोबत वैराग्यही उत्पन्न होते. त्यातुनच स्वामींना अनुसरुन योग्य जनकल्याण होते. अन्यथा थोतांडच समजा.


जे स्वामीं मार्गात अर्थकारण, राजकारण आणि दंभकारण करतात अशा धर्ममार्तंडांवर कवडीमात्र विश्वास ठेवु नये. स्वतः स्वामींस्वावलंबी बना...!


----------------------------------------------------------------------------


स्वामी काव्य अभंग...( Swami Kavyaa Abhangaa...)


माझे मरण स्वामी हो l पाहु द्या हो मम डोळा ll

तव कृपेविन स्वामी l ह्दय फुल कधी न फुलेना ll  ५

english meaning...


My sadguru lord SHRI SWAMI SAMARTH, let me see my own death with my eyes. If i die then only i can understand value of it. Without proper soul bridge i cannot lead towards u r lotus feets.


I need to see death with my naamsmaranaa. Then only my soul will be free. And my heart flower will get dropped on your merciful lotus feet.


भावार्थ...


जो पर्यंत आपण स्वतःच मरण स्वतः बघत नाही ( मतितार्थ - आपल्या जीवयोनीतील सर्व क्लेश, विषयविकारांचा समुळ नाश ) अथवा स्वीकारत नाही तोपर्यंत मरणोत्तर सद्गुरुकृपा आपल्याला कधीच प्राप्त होऊ शकत नाही.


देह भौतिक आणि आध्यात्मिक अत्यंत बिकट परिस्थितीतुन जातो त्याच क्षणी सद्गुरुकृपेचा फवारा ह्दयात उडायला सुरवात होते. ह्दयस्थ ब्रम्ह कळीचे अनाहत फुल तयार होते.


----------------------------------------------------------------------------


स्वामी काव्य अभंग...( Swami Kavyaa abhangaa )


स्वामी सद्गुरु म्हणताती l हा काय करीसी खुळखुळा ll

का रे मिथ्या वाढीसी l कारे फोडि तु भवजनडोळा ll  ६

English meaning...


Sadguru maharaj says, ' why u create wastes ? and ignoring spirits. Why u follow useless subjects ? and ignoring holy scriptures.


Why u give false commitment ? and ignoring naamsmaranaa. Why u misguide poor people ? and getting misguided to the door of hell.


भावार्थ...


सद्गुरु महाराज म्हणतात, ' आयुष्यात घाण उत्पन्न का करतोस ? वस्तुस्थिती का नाकारतोस. नश्वरवादी विषय का मानतोस ? ग्रंथवादी सत्व स्वीकारत नाहीस.


खोटी आश्वासनं का देतोस ? वाणीतील अढळ नामस्मरण तु आठवत नाहीस. गरीब लोकांची दिशाभुल का करतोस ? आणि स्वतःच फसला जाऊन नरक दरवाज्याकडे ओढला जातोस.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...







GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती


Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below



Post a Comment

0 Comments

0