भक्तराज श्री जादवजी महाराज यांचे जीवन वृत्तांत Shree Jadavji Maharaj - Swami Samarth


मुंबई सारख्या धावपळीच्या शहरामध्ये हजारो लोकांमध्ये 'श्री कृष्णःशरणं मम' अशा प्रवचनाने बुद्धीशाली वर्गाला भक्तीच्या मार्गाने आणि ब्रिटिश सरकारची स्वार्थी प्रवृत्ती असणार्या लोकांचा सामना करीत दारुमुक्ती देणारे भक्तराज श्री जादवजी त्यांच्या कारकिर्दीत प्रसिद्ध झाले. कारण की, मुंबई शहर हे त्यांच्यासाठी अज्ञान होते. तेथील वातावरणातून धर्माच्या मार्गावर नेणारे ते प्रथम व्यक्ती होते. श्री जादवजी महाराज स्वतः ब्राम्हण असुनही त्यांनी जातीभेद मिटविण्याकरीता पुष्कळ परिश्रम घेतले. ही हकीकत गांधीजींच्या कार्यकाळाच्या आधीची व नोंद घेण्यासारखी होती.  सदर घटना घडत असतांना जयगिरीनाथ नावाचा संत जो गिरनारपासून व्दारका पर्यंत पायी प्रवास करतांना केशवजी यांच्या अंगणात तुळशीचे वृंदावन पाहून म्हणाले, मला जेवण द्या जेवणाव्यतिरिक्त काहीही नको. असा आवाज दिला. केशवजी यांनी त्यांना बसण्याकरीता आसन दिले आणि बसण्यास सांगितले. संत हे अंर्तयामी असल्याने त्यांनी ओळखले की या घरामध्ये बालक दिसत नाही त्यावरुन त्यांनी विचारले, 'घरात लहान मूल दिसत नाही!' केशवजी म्हणाले मुले तीन-तीन झाली परंतु लगेचच त्यांना देवज्ञा झाली. हेच बोलणे आमचे चालू होते यावर संत म्हणाले उद्या सकाळी तुम्ही ज्या मंदीरात श्री भगवान कृष्णाचा फोटो अगर मुर्ती असेल तेथे एक हजार वेळा 'श्री कृष्णःशरणं मम' असा मंत्र जाप करा आणि नंतर घरी या. तुम्ही दोघेही तेथे उभे राहून म्हणा की तुम्ही जर पाठवणार नसाल तर मला स्वतः तुमच्याकडे यावे लागेल, अशी २१ दिवस प्रार्थना करावी तुमचे काम होऊन जाईल. संतांनी खरी गोष्ट सांगितली.

   प्रेमकुंवर व केशवजीं भगवद चर्चा करत करत रात्री झोपी गेले. पहाटेच्या वेळी प्रेमकुंवरला स्वप्न पडले की, बाळकृष्णासारखे मूल आपल्या मांडीवर खेळत आहे व त्याला आपण खेळवत आहोत, स्वप्न पूर्ण होताच त्यांना असे जाणवले की, आपण बिछाण्यातच आहोत. त्या आपल्या पतीस म्हणाल्या की, आपल्याकडेही एक असेच मूल येणार आहे असे स्वप्नातल्या अनुभवावरुन सांगते. केशवजी म्हणाले, देवाची माया अपरंपार आहे. काही दिवसांनी प्रेमकुंवरला दिवस गेले हे एकूण केशवजींना आंनद झाला. दिवसातून एकदा दररोज 'श्री कृष्णः शरणं मम' चा जप चालू ठेवला

   वेळेनुसार बालकाचा जन्म झाला. इ.स. १८५५ सालातील ही गोष्ट आहे. द्यासागरने लाज राखली म्हणून बालकाचे नाव 'यादव' श्रीकृष्णाच्या नावाने 'जादव' असे ठेवले. जादव बालक अवस्थेमध्ये 'श्री कृष्ण शरणं मम' असे बोलत आपुले ओठ हलवित होते. हे पाहून दोघांना अत्यानंद झाला. माझे मूल ब्राम्हणकुळात देवाचा भक्त होणार हे जाणताच दोघांना फार आनंद झाला.

   केशवजी पंडितांनी बाल जादवांना संस्कृतची शिक्षा दिली. माञ सात वर्षांचे असतांना बालकाने आपल्या पित्याला विचारले, 'अहं ब्रहमास्मि', चा अर्थ काय? पिता म्हणाले मी स्वतः ब्रम्ह आहे, अविनाशी आहे असा त्याचा अर्थ होतो. परंतु अविनाशी व कायाचा काय संबंध? बालकाने प्रतिप्रश्न केला. काया (शरीर) नेहमी बदलत असते परंतु आत्मा हा अमर आहे त्याचा नाश होत नाही जसे मनुष्य आपले कपडे बदलतो तसे शरीरातील आत्मा अमर आहे. आणि तो फिरत असतो. बालका हे प्रश्न विचारण्या इतपत तुझे वय झालेले नाही. सध्या भाषा आणि ज्ञानावर ध्यान दे ते फार आवश्यक आहे.

   बालका मी जे काही सांगत आहे हे तुझ्या हृद्यामध्ये उतरवून घे. यानंतर बाल जादव अभ्यासात इतके रमले की वयाचा १५ वर्षी त्यांनी आपल्या वडिलांच्या मदतीने गुजराथी, हिन्दी, संस्कृत, मराठी, इंग्रजी भाषा शिकून घेतली. यादवजी १६ वर्षांचे असताना एका वर्षांच्या आतच माता-पिताचे देहावसान झाले. एकीकडे केशवजीचे बंधु श्री नानालाल मुंबईत रहात होते. भावाचा मुलगा अनाथ झाला हे ऐकून त्यांनी जादवाजींना मुंबईला बोलाविले. नानालाल यांना वाटले की आता मुलाचे लग्न करावयास हवे त्याकाळात बालविवाह होत असत त्यांनी असाही विचार केला की, भावाच्या मुलाने जर काम-धंदा केला तर त्याची प्रगती होईल.

   जादव जवान होते परंतु ते 'श्री कृष्ण शरणं मम' चा जप जपावयाचे म्हणून नानालाल त्यांना म्हणाले, 'मुला हे मुंबई आहे पोरबंदर नाही' इकडे तर लक्ष्मीः शरणं मम प्रथम व त्यानंतर श्रीकृष्णः शरणं मम होत असे.

   नानालालने स्वतः मेहनत करुन जादवजींना गोदीमध्ये कामगारांवर नजर ठेवण्यासाठी नोकरी मिळवून दिली.

   गरीब कामगार मोकळ्या वेळेत दारु प्यावयाचे आणि जुगार खेळावयाचे जादवजींना मोकळा वेळेचा उपयोग प्रार्थनेमध्ये घालविला. कामगारांमध्ये तुकडोजी व मालोजी नावाचे दोन मराठे मृदुंग व ढोल चांगले वाजवित असत. त्यामुळे त्यांनी या दोघांना आपआपली वाद्ये घेऊन येण्याचे आमंत्रण दिले.

   फावल्यावेळात ढोल आणि टाळ बरोबर 'श्री कृष्णः शरणं मम' ची धून चालू केली. एकाच वेळी इतक्या कामगारांचा आवाज आणि त्याचबरोबर ढोल - टाळांची साथ व जादवजी स्वतः धून गात असत अशा त्रिवेणी संगमाने गोदीमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. दारुच्या व्यसनातुन खूप कामगार मुक्त झाले.

   मराठा बांधव दररोज 'हरिओम विठ्ठला' चा जप करावयाचे एके दिवशी इंग्रज अंमलदाराला वाटले की जेव्हापासून ही सर्व धमाल चालू झाली आहे म्हणून ते जादवांना म्हणाले कामाच्या वेळेत जे काही चालले आहे हे ठीक नाही.

   इंग्रज अंमलदाराने नानालालवर ठपका ठेवला, आणि त्यांना त्याचे फार वाईट वाटले. गोदीमधील त्यांची नोकरी सुटली. इंग्रज अंमलदार म्हणाले कामगारांना भडकवण्याच्या कारणावरुन तुम्हाला नोकरीवरुन कमी करण्यात आले. 'हा घ्या एक महीन्याचा पगार' जशी ठाकूरजींची इच्छा असे म्हणत जादवजी घरी परतले.

   नानालालने आपले मित्र पंडित भगवानलाल इंद्रजी यांना सांगितले की, माझ्या भावाचा मुलगा हा भजन कीर्तनात मग्न झाला आहे असे वागणे हे मुंबई सारख्या शहरात कसे चालेल आपण त्याला सुधारावे. नानालालने जादवजी यांना सांगितले की वाळकेश्वर येथे माझे मित्र पंडित भगवानलाल रहातात त्यांची तू भेट घे.

   जादवजी महाराज वाळकेश्वर येथे गेले. तेथे हुशार मित्रांच्या बरोबर पंडित भगवानलाल हे ही बसलेले होते. धर्मावर आधारीत चर्चा चालू होती त्यात जादवजी यांनी प्रवचन दिले हे प्रवचन ऐकून भगवानलाल आणि त्यांचे मित्र प्रभावित झाले आणि त्यांना त्यांच्या बंगल्यावर रहाण्याचे आमत्रंण दिले व दररोज बंगल्याच्या हॉलमध्ये प्रवचन देण्याची परवानगी दिली.

   खरोखर विव्दान वक्तव्य करणाऱ्यांमध्ये जादवजी महाराजांनी गणना होऊ लागली. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी श्रीमंत आणि विव्दान लोक येऊ लागली. श्रीमंत लोक जे श्रीकृष्ण प्रेमी होते त्यांनी जीवनभर जादवजी महाराजांचा संभाळ करण्याचे ठरविले.

   नानालाल यांना माहित पडले की, जादवजी कथाकार बनले आणि पंडित भगवानलाल इंद्रजी यांनी कथाकार बनविले. या करीता ते पंडितजींना भेटून त्यांना अपशब्द बोलले.

   पंडित भगवनालाल ज्ञानी होते त्यांनी हिर्याला पारखले होते त्याकरीता नानालालच्या अपशब्दाला दुर्लक्ष केले आणि म्हणाले हे केवळ मायेपोटी मला अपशब्द बोलला आहात तुम्ही हिर्याला ओळखलेले दिसत नाही त्याला फक्त पैलु पाडावयाचे बाकी आहे.
   जादवजी महाराजांनी महाराष्ट्रातच नव्हे तर गुजराथमध्ये ही गावोगाव फिरुन दारुचे दुष्परिणाम कसे होतात याचे प्रवचन केले. वलसाड मध्ये एका दुकानदाराने पोलिसामध्ये तक्रार देऊन जादवजी महाराजांना नजर कैद केले. पोलिस ठाण्यात त्यांनी 'श्रीकृष्ण शरणंःमम' या मंत्राचा जाप सुरु केला व त्यांची लगेचच सुटका झाली. इं.स. १८९७ नंतर जादवजी महाराज यांनी सगळे दैनंदिन कामकाज सोडून माळ धारण केली, धर्माविषयी माहिती देणे आणि ईश्वराची आराधना करणे हे सिध्दांत त्यांनी स्विकारले. मुंबईमध्ये माधवबाग आणि नरनारायण मंदिर येथे त्यांचे प्रवचन आयोजीत करण्यात येत असत. सकाळी नरनारायण मंदीर आणि संध्याकाळी माधवबाग मंदिराच्या समोर व्याख्यान देणे सुरु केले. दररोज हजारो भाविक प्रवचन ऐकण्यास येत होते.

   'श्रीकृष्ण शरणंःमम' मंत्र बहुमुल्य आहे. सोळा कलेचे रुप धारण करणारे श्रीकृष्ण हेच तारणहार आहेत. जर आपण श्रीकृष्णाच्या मुरलीला ध्वनी विसरलो तर त्याचा नाद परदेशात जाईल असे वेळच सुचीत करीत आहे.

   अशाप्रकारचे पूर्व सुचना माधवबागच्या प्रवचनात करत असतांना खरोखरच हरे कृष्ण हरे राम यांच्या १२५ कृष्ण मंदिरामध्ये आणि युरोपियन पुरुष आणि स्त्रिया श्रीकृष्णाच्या धूनमध्ये धुंद झाले ही वस्तुस्थिती आहे. त्यांची सूचना ही खरी ठरली. श्रीपाद स्वामी यांनी देशविदेशात श्रीकृष्ण भक्तीचा नाद लाविला.

   आयुष्यभर गावोगाव, शहर-शहरात फिरुन श्रीकृष्णः शरणं मम चा जप करणारे जादवजी महाराज आज नाहीत, परंतु त्यांनी बनविलेली मंडळे आजही अस्तित्वात आहेत. हीच त्यांच्या कार्याची व आठवणींची पावती होय.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !

Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below

Post a Comment

0 Comments

0