प्रज्ञा चक्षु संत श्री गुलाबराव महाराज


केवळ ९ व्या महीन्यातच त्यांचे चर्मचक्षू बंद पडले पण त्याच वेळी त्यांचे 'ज्ञानचक्षू उघडले गेले. वयाच्या केवळ १९ व्या वर्षी त्यांनी लोकांकडुन ग्रंथ वाचवुन घेण्याकरीता अथक परिश्रम घेतले. त्याच वेळी त्यांचे ठिकाणी दैवी गुणांचा उदय होऊन सर्वज्ञता प्राप्त झाली.                विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील लोणीटाकळी या गावी येथील श्री गोदुंजी व अलोकाबाई मोहोड यांचे पोटी गुलाबराव महाराजांचा जन्म ६ जुलै १८८१, आषाढ शु.१० रोजी झाला.

                वयाच्या केवळ ९ व्या महीन्यातच त्यांना अंधत्व आले. त्यांना आयुष्यही फारसे लाभले नाही. केवळ वयाच्या ३४ व्या वर्षी २० सप्टेंबर १९१५ भाद्रपद शु. १२ रोजी पुण्यातील चाकण आँईल परिसरात त्यांचे महाप्रयाण झाले. अशा विचित्र परिस्थितीत त्यांनी केलेले कार्य एक चमत्कारच आहे असे वाटते. कमी वयात त्यांनी अफाट ग्रंथ संपदा निर्माण केली. भगवान श्रीकृष्णाचे ठायी त्यांची माधुर्यभक्ती असल्याने ते स्वतःला ज्ञानेश्वरांची कन्या व श्रीकृष्णाची पत्नी म्हणवुन घेत. त्यांनीच श्री ज्ञानेश्वरी मधुराद्वैत संप्रदाय सुरु केला.

                 सन १९०१ मधे ज्ञानेश्वर माऊलींचा साक्षात अनुग्रह घडला. संत ज्ञानेश्वर माऊलींची अनंतकृपा या संतावर होती. महाराज स्वतःला श्रीकृष्ण पत्नी समजत असल्यामुळे त्यांनी १९०३ पासुन भगवान श्रीकृष्णाचा कात्यायनी व्रताचा प्रारंभ देऊरवाडा येथे केला. योगायोगाने त्यांना श्रीकृष्ण मुर्ती व ज्ञानेश्वरांच्या पादुकांची प्राप्ती झाली. ते सदैव गोपीभावातच वावरत असत. त्यांनी संतांची ज्ञानोत्तर भक्ती व शंकराचार्यांचा अद्वैत वेदांत यांचा समन्वय करुन खंडन मंडन पद्धतीने भक्तीशास्त्राची नवीन स्वरुपात मांडणी केली. त्यानुसार भगवंताचा सगुण विग्रह मिथ्या नसुन सच्चिदानंदघन शुद्ध ब्रम्हस्वरुप आहे. तो ज्ञानानेही नाश पावत नाही यासाठी नवीन शब्द योजना करुन शंकराचार्यांच्या अद्वैतात 'अनध्यस्तविवर्त' या भक्ती संकल्पनेचे नवीन योगदान दिले.

                भक्ती, वेदांत, सांख्य, योगन्याय, आयुर्वेद, संगीत, साहीत्य, नाटक, व्याकरण, कोश, क्रिडा, लिपी वगैरे अनेक विषयांवार सुत्र आणि भाष्य रचनेतुन प्रकरण ग्रंथापर्यंत विविधप्रकारची ग्रंथ निर्मिती निरनिराळ्या भाषा शैलीत करुन त्या त्या शास्त्रात महाराजांनी नवे नवे योगदान दिले. त्यांचे हे योगदान फारच मौलिक आहे.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments