संत श्री कूर्मदास महाराज"आता पांडुरंगाचे दर्शन आपल्या नशिबी नाही." तो अतिशय कळवळून विठ्ठलाचा धावा करु लागला. देवा करीता रडू लागला. तेवढ्यात एकाएकी एक दिव्य प्रकाशझोत त्यांच्या समोर पडला व त्यांतील ज्योत सरकत सरकत पुढे आली व तेथे त्या ज्योतीतून एक सगुण-साकार मूर्ती निर्माण झाली. कूर्मदासांनी ओळखले की पंढरपूरचा पांडुरंगच आता आपल्या भेटीला आलेला आहे.

"आता पांडुरंगाचे दर्शन आपल्या नशिबी नाही." तो अतिशय कळवळून विठ्ठलाचा धावा करु लागला. देवा करीता रडू लागला. तेवढ्यात एकाएकी एक दिव्य प्रकाशझोत त्यांच्या समोर पडला व त्यांतील ज्योत सरकत सरकत पुढे आली व तेथे त्या ज्योतीतून एक सगुण-साकार मूर्ती निर्माण झाली. कूर्मदासांनी ओळखले की पंढरपूरचा पांडुरंगच आता आपल्या भेटीला आलेला आहे.

                      संत कूर्मदास हे पैठणचे संत. ते जन्मतःच अपंग होते. दोन्ही हात व दोन्ही पाय नव्हते. पण बुद्धी व स्मरणशक्ती अतिशय तल्लख होती. आजुबाजूचे ऐकू येणारे श्लोक, अभंग अगदी तोंडपाठ होत असे. मंदिरात कीर्तन प्रवचन ऐकण्याकरीता ते गडबडा लोळत त्या ठिकाणी जात असत.

              एक दिवस कीर्तनांत पंढरपूरचे महात्म ऐकून पंढरीनाथांच्या दर्शनाची तीव्र आस त्यांना लागली. दुसरे दिवशी सकाळी उठून गडबडत लोळत पंढरपूरला निघाले. वाटेत वारकरी भेटले एक दिवस त्यांनी त्यांना खाऊ-पिऊ घातले. परंतु, "आता पंढरपूरला तुम्हाला आमच्या बरोबर नेत येणार नाही" कारण,आता एकादशीला फारच थोडे दिवस राहिले आहेत असे सांगून पुढे म्हणाले आम्ही जाऊन पंढरीनाथांना सांगतो की, "मागावून तुमचा भक्त येत आहे."

              कूर्मदास असेच कुर्मगतीने पंढरीकडे वाटचाल करीत होते. विठ्ठल भेटीची तळमळ उच्च कोटीला पोहचली होती. ते अत्यंत व्याकुळ झाले होते. पण त्याच वेळी घोड्यावर बसून एक तेजःपुंज पुरुष त्यांच्या जवळ आला व म्हणाला, "मी विठोबा खिस्ती, वाटेत व्यापार करीत पंढरपूरला जाणार आहे, तेव्हा तू माझ्याबरोबर चल." दुसरे दिवशी कूर्मदास त्या व्यापाऱ्याची वाट पाहात होते पण ते दिसले नाही. शेवटी कूर्मदास स्वतःशीच म्हणाले, "आता पांडुरंगाचे दर्शन आपल्या नशिबी नाही." तो अतिशय कळवळून विठ्ठलाचा धावा करु लागला. देवा करीता रडू लागला. तेवढ्यात एकाएकी एक दिव्य प्रकाशझोत त्यांच्या समोर पडला व त्यांतील ज्योत  सरकत सरकत पुढे आली व तेथे त्या ज्योतीतून एक सगुण-साकार मूर्ती निर्माण झाली. कूर्मदासांनी ओळखले की पंढरपूरचा पांडुरंगच आता आपल्या भेटीला आलेला आहे. ते तसेच लोळत लोळत त्या मूर्तीजवळ गेले व चरणावर आपला माथा टेकवला. कूर्मदास म्हणाले, "देवा पांडुरंग तू माझ्यासाठी स्वतः येथे येऊन भेटलास! केवढे माझे भाग्य हे! माझा विठोबा खिस्ती बरा आहे ना?" पांडुरंगाने सांगितलं, "कूर्मदासा मीच विठोबा खिस्ती, मीच गावोगाव जाऊन भक्तीचा व्यापार करतो."

   असा कूर्मदास "सर्वांभूती परमेश्वर" हा संदेश देतो.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments