संत श्री गोरा कुंभार


गोरा कुंभार यांचे प्रत्येक काम विठ्ठलाचे नाम स्मरणात चालत असे. त्यावेळी ते अत्यंत तल्लीन होऊन जात असे. मग ते काम कोणतेही असो. जसे माती तुडविणे चाकावर मातीच्या गोळ्याला आकार देणे व भट्टी लावणे. ही सर्व कामे ते विठ्ठलाचे नाम स्मरणातच करीत असत.   पंढरपूर पासून अंदाजे ८०-९० कि.मी. अंतरावरील तेरेढोकी येथे सन १२६७ मध्ये संत गोरा कुंभार यांचा जन्म झाला. ते संत नामदेव व ज्ञानदेव यांच्या पेक्षा वयस्कर असल्याने सर्वजण त्यांना 'काका' या नावानेच संबोधत. लहान थोर सर्वांचे ते 'गोरोबा काका'च होते.
   पंढरीचा पांडुरंग हेच त्यांचे इष्ट दैवत. त्यांच्यावर त्यांची आतोनात भक्ती व प्रेम होते. सावता माळी प्रमाणेच कर्म - योगी संत. तसेच त्यांनी सुध्दा समर्थ रामदासांचे शिकवणी नुसार प्रपंचात राहूनच परमार्थ केला. त्यांचे प्रत्येक काम विठ्ठलाचे नाम स्मरणात चालत असे. त्यावेळी ते अत्यंत तल्लीन होऊन जात असे. मग ते काम कोणतेही असो. जसे माती तुडविणे चाकावर मातीच्या गोळ्याला आकार देणे व भट्टी लावणे. ती सर्व कामे ते विठ्ठलाचे नाम स्मरणातच करीत असे.

   एकदा ते नामस्मरणातच माती तुडवीत होते ते आपल्याच तंद्रीत असताना त्याच्या पत्नीने त्यांच्या बाळाला लक्ष देण्याच्या हेतूने बाहेर त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणून ठेवले व त्यांना तसे सूचीत करुन ती बाहेर गेली. पण हे गोरोबा काकांच्या लक्षात पण आले नाही ते आपल्याच विठूच्या नामघोषाच्या आनंदात तल्लीन असताना ते मूल आत त्यांच्या पायाजवळ गेले असता त्यांनी माती सोबत त्याला पण तुडवून टाकले पण त्यांना याचा पत्ता सुध्दा नव्हता. जेव्हा पत्नी बाहेरुन आली व बाळ दिसेना म्हणून विचारले असता व त्यांच्या पायाकडे पाहिले असता चिखल लाल रक्ताप्रमाणे दिसला. तिच्या ते सर्व लक्षात आले.

   त्यांची पत्नी संती संतप्त झाली. तिने विठ्ठलाला खूप शिव्या शाप दिलेत. गोरोबांच्या भजनाचाही उध्दार केला. तेव्हा गोरोबा चक्रदंड घेऊन तिच्यावर धावून आले. पण तिने विठ्ठलाची आण घेऊन स्पर्श करण्यास मनाई केली. त्यावेळेपासून त्या पती - पत्नीत दुरावा निर्माण झाला. संतीला झाल्या गोष्टीचा पश्चाताप झाला. पण गोरोबा विठ्ठलाची शपथ दिल्यामुळे आपल्याला कालत्रही स्पर्श करणार नाही हे जाणून तिने आपल्या लहान बहिणीशी त्यांचा विवाह लावून दिला. पण मुलगी सासरी निघाली असता त्या मुलीचे वडील (सासरे) म्हणाले 'हिलाही पहिली प्रमाणेच वागवा' व विठोबाची आण दिली. झाले काकांची परत पंचायत झाली दोघीनांही स्पर्श न करण्याचे त्यांनी ठरविले.

   एका रात्री दोघी सवती गोरोबांचे दोन बाजूस निजल्या असताना त्यांनी दोघींनी गोरोबांचा एकेक हात आपल्या छातीशी धरले. गोरोबांना प्रथम असे वाटले की विठ्ठलानीच आपले हात धरुन ठेवले. पण प्रत्यक्ष काय चालले आहे हे पाहून ते चलबिचल झाले. विठोबाची शपथ मोडली गेली असे वाटून त्यांनी आपले दोन्ही हात तोडून टाकले. पुढे गोरोबा आपल्या दोन्ही पत्नीसह पंढरपूरला आले असता विठ्ठलाचे दर्शन घेऊन नामदेवाचे किर्तन ऐकत असताना त्या किर्तनातील संत नामदेवांचे ब्रम्ह निरुपण ऐकून प्रत्यक्ष विठ्ठलच आपली खरडपट्टी काढत आहे असे वाटले. त्यांना आपल्या कर्म त्यागाचा पश्चात्ताप झाला. ते विठ्ठलाला आळवू लागले. दोन्ही थोटक्या हाताने विठ्ठलाला आळवत असतांना त्यांच्या हातांना पंजे फुटू लागले व दोन्ही हात आता पूर्ववत झाले होते. हे बघून दोन्ही सवतींना आनंद झाला. पण संतीला आपल्या बाळाची आठवण झाली व तिने पाय धरुन एकच आकांत मांडला. तोच तिचे बाळ दुडू दुडू धावत आले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. सर्व भाव विभोर झाले सर्व कुटूंबच आता विठ्ठलमय झाले होते.

   पुढे मुक्तीबाईंनी त्याच गोरोबा काकांच्या मदतीने संत नामदेवांचे मडके कच्चे ठरवून त्यांची रवानगी विसोबा खेचरांकडे केली. नामदेवांना गुरु चरणाचा स्पर्श होताच 'सर्वांभूती परमेश्वर' हे ज्ञान प्राप्त झाले व त्यांचे मडके सद्गुरुंच्या परीस स्पर्शानेच सुवर्णमय झाले.
   सन १३१५ मध्ये ते विठ्ठल चरणी लीन झाले.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments