श्री औदुंबर नृसिंहावाडी ( Shri Nrusinhawadi ) सेवा माहिती व नोंदणी अर्ज


मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील जयसिंगपूर या पहिल्याच स्टेशनवर उतरून आठ मैलावर कृष्णा-पंचगंगा-संगमावर हे ठिकाण लागते. वाडी हे नावाप्रमाणेच एक खेडेगाव आहे. सर्व वस्ती कृष्णेच्या काठावर एकवटली आहे. कृष्णेच्या घाटावरच दत्त पादुका मंदिर आहे. वाडीचा कृष्णाघाट प्रशस्त आहे.

श्री नृसिंहावाडी स्थान महत्त्व...



मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील जयसिंगपूर या पहिल्याच स्टेशनवर उतरून आठ मैलावर कृष्णा-पंचगंगा-संगमावर हे ठिकाण लागते. वाडी हे नावाप्रमाणेच एक खेडेगाव आहे. सर्व वस्ती कृष्णेच्या काठावर एकवटली आहे. कृष्णेच्या घाटावरच दत्त पादुका मंदिर आहे. वाडीचा कृष्णाघाट प्रशस्त आहे.

श्रीनरसिंह सरस्वती औदुंबरचा चातुर्मास संपवून इथे आले आणि बारा वर्षें इथे राहून पुढे गाणगापूरला गेले. श्रीगुरुंच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या तीरावरील भूमीला आवेगाने मिठी देण्याची तिलाही जणू ओढ असावी. पादुकांच्या समोरून कृष्णा वाहत चालली आहे आणि जवळूनच उजव्या बाजूने पंचगंगा धावत आली आहे. दत्त दर्शनाचा आनंद पंचगंगेच्या हृदयी रिचवण्याची जणू कृष्णेला घाई झाली आहे आणि जवळच, एक फर्लाग अंतरावर, तिनें पंचगंगेशी मिळणी साधली आहे.


इथे बारा वर्षे राहून, अनेक दीनदलितांच्या जीवनांत समाधानाचे नि सुखाचे मळे फुलवून, अनेकांची संकटें दूर सारून ते पुढें गाणगापूरला गेले. कृष्णेच्या पैलतीरावर औरवाड आणि गौरवाड या नांवाची दोन गांवे आहेत. ही गांवे विजापूरच्या आदिलशहाने वाडीच्या दत्तपूजेसाठी इनाम दिलेली होती. यांपैकी औरवाड म्हणजेच गुरुचरित्रांतील अमरापूर. या अमरापुरांत अमरेश्वर नांवाचे शिवस्थान आहे. या अमरापुराचा आणि त्याच्या कृष्णापंचगंगा-संगमाचा महिमा गुरुचरित्रांत असा वर्णिला आहे :


पंचगंगा नदीतार। प्रख्यात असे पुराणांतर।

पांच नामें आहेति थोर । सांगेन ऐका एकचित्तें।।
शिवा भद्रा भोगावती । कुंभी नदी सरस्वती।
पंचगंगा ऐसी ख्याति । महापातक संहारी।।
ऐसी प्रख्यात पंचगंगा। आली कृष्णेचिया संगा।
प्रायगाहूनि असे चांगा। संगमस्थान मनोहर।।
अमरापुर म्हणिजे ग्राम । स्थान असे अनुपम।
जैसा प्रयाग संगम। तैसें स्थान मनोहर।।
वृक्ष असे औदुंबरु । प्रत्यक्ष जाणा कल्पतरु।
देव असे अमरेश्वरु । तया संगमा षट्‍कूळीं ।।

नदीच्या बाजूने घाटाच्या पहिल्या टप्प्यावरच लहानसे दत्त पादुकामंदिर आहे. या पादुकांना ‘मनोहर पादुका’ अशी संज्ञा आहे. मंदिराच्या मागे औदुंबराचा पार आहे. दुपारी बारा वाजता या मनोहर पादुकांची महापूजा होते. महापूजेच्या वेळी पुजारी पादुकांवर लोटीभर दूध ओततात आणि त्यानंतर त्या अमृताच्या अभिषेकानें मनोहर पादुका दर्शनेच्छूंच्या डोळ्यात भरतात.


घाटाच्या अखेरच्या टप्प्यावर श्रीवासुदेवानंद सरस्वतींचें स्मृतिमंदिर आहे. वाडीचें दत्तस्थान हेंच वासुदेवानंदाचें प्रेरणास्थान होय. त्यांच्या स्मृतिमंदिरामागें श्रीगुरूंशीं समकालीन असलेले श्रीरामचंद्रयोगी यांचें स्मृतिस्थान आहे आणि उजव्या हाताला ओळीने नारायणस्वामी, काशीकरस्वामी, गोपाळस्वामी, मौनीस्वामी या तपोनिधींची स्मारकें आहेत. त्यांच्या तपानें आणि चिरविश्रांतीनें कृष्णाकांठ पुनीत झाला आहे. मुक्तेश्वरानें भावार्थ रामायणाचें उत्तरकांड याच पवित्र स्थानीं रचले.


औदुंबरचे स्थान महत्त्व ...


सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी काठी वसलेले औदुंबर हे दत्त क्षेत्र भारतातील अनेक दत्त स्थानापैकी प्रमुख दत्तक्षेत्र आहे. श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मास पुरते होते. कोल्हापूरच्या मूढ पुत्राला येथे स्वामींच्या आशिर्वादाने ज्ञान प्राप्ती झाली ही कथा गुरुचरित्राच्या १७व्या अध्यायात आलेली आहे. याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी,श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झाले... याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला व माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील व त्या वृक्षाची नियमीत पूजा किंवा त्या वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करणारया भक्तास त्याने केलेल्या पुजेचे अगर पारायणाचे फळ हजार पटीने मिळेल. त्या भक्ताला माझा आशिर्वाद राहील, असे वचन दिले. औदुंबर या ठिकाणी जाण्यासाठी सांगली बस स्थानकावरून नियमीत बस सेवा आहे. अंकलखोप या बसने इथे जाता येते. तासगाव-कोल्हापूर या बसमार्गावर हे क्षेत्र आहे. रेल्वेमार्गांनी प्रवास करणारया भक्तांसाठी पुणे, कोल्हापूर मार्गावर भिलवडी स्टेशन लागते. त्या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने (७ किमी) अंतरावर असलेल्या औदुंबर या क्षेत्रास जाता येते. या ठिकाणी राहण्यासाठी जोशी अगर पुजारी यांचे घरी सोय होऊ शकते.


कृष्णाकाठचे औंदुंबर 


श्रीनरसिंह सरस्वतींच्या चातुर्मास - निवासामुळे हे क्षेत्र निर्माण झाले आहे. भिलवडीजवळ भुवनेश्वरीचे प्राचीन शक्तिपीठ आहे. त्यामुळे या स्थानी तपस्वी जनांचीवर्दळ नेहमी असे. कृष्णेच्या तीरावरील वृक्षांच्या दाटीमुळे येथे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झालेले होते. त्यामुळें या निसर्गसिद्ध तपोवनांत, औंदुंबरांच्या दाट शीतल छायेंत शके १३४४ च्या सुमारास श्रीनरसिंह सरस्वतींनी चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिलें. येथील कृष्णेचा घाट प्रशांत आणि प्रशस्त आहे. या घाटावरच दत्तपादुकांचेंमंदिर आहे. ज्या घाटावर दत्त पादुकामंदिर आहे, तो घाट येथील ब्रह्मानंदस्वामींचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी बांधविला आहे. पावसाळ्यांत श्रींच्या पादुका कृष्णेच्या महापुरांत बुडून जातात आणि त्यामुळें नित्योपासना व दर्शन अशक्य होऊन बसते. ही अडचण दूर करण्यासाठीं सन. १९२६ मध्ये उंच जागीं एक देवघर बांधले आहे. पावसाळ्यांत देव तेथे नेतात आणि तेथेच पूजा-अर्चा होते. श्रेत्रांतील नित्यनैमित्तिक उपासनेसाठी अनेक सरदार-संस्थानिकांकडून दाने व इनामे मिळाली आहेत. मंदिराच्या परिसरांत औदुंबर वृक्षांची घनदाट छाया आहे. आकाशांत सूर्य तळपत असतांना भूमीवर छाया-प्रकाशाची रांगोळी तळपत राहते. या क्षेत्रांत ब्रह्मानंदस्वामींचा मठ आहे. हे सत्यपुरुष १८२६ च्या सुमारास गिरनारहून औदुंबर क्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली. येथील शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणांत त्यांच्या तपाला सिद्धीचें यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. कोल्हापूरच्या मंदबुद्धी ब्राह्मणाला श्रीगुरूंनी ज्ञानदान केल्याची गुरुचरित्रांतीलकथा याच स्थानांत घडलेली आहे.


अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ! श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त !!


दत्तप्रबोधिनी प्रतिष्ठान सेवा ट्रस्टच्या माध्यमातुन दर महीन्याच्या १० तारखेला सामुहीक स्तरावर श्री क्षेत्र औदूंबर येथे दिनसेवा आणि श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे रात्रसेवा केली जाते.


सेवा उद्दिष्टे...



  • १. स्वआत्मबळ वाढवणें. शिवस्वामीआत्मानुसंधान करुन आपलं जीवन सार्थक करणें.

  • २. सत् पात्री दुःखी पिडीत लोकांना स्वामीअनुभूतीच्या माध्यमातुन कोणतेही अर्थकारण, राजकारण आणि दंभकारण न करता सामुदायिक स्वामीमय सेवेच अनन्यसाधारण महत्त्व पटवुन देणें. यथाशक्ति सद्गुरु स्वामींमहाराजांचा हेतु आणि व्याप्ती समजावुन देणे.

  • ३. केंद्र, मठ आणि मंदिराच्या संकुचीत मनोवृत्तीत न अडकता आणि कोणत्याही अज्ञानी मंडळाच्या राजकारणाला बळी न पडता, त्यातुन बाहेर पडुन घरगुती प्रश्न, आध्यात्मिक प्रश्न, पर्यावरण संतुलनाचा प्रश्न आणि राष्ट्रहीत सुरक्षेच्या प्रश्नांवर सद्गुरुकृपे उपायाहेतु एकत्र येऊन सामुदायिक स्वामीमय रात्रप्रहर सेवा करणें.


सेवा अधिष्ठान...


  • १. आत्मअवलोकनात्मक स्वामीमय त्रिकालसंध्या करणें.
  • २. आत्मबळ वाढवणें हेतू सद्गुरुस्वामीं अधिष्ठानाचा स्वगृही न्यास करणें.


सेवा धोरणें...



  • १. सामुदायिक स्वामीमय सेवा विनामुल्य आहे.
  • २. सद्गुरु स्वामीमहाराज आणि त्यांच्या भक्तगणांमध्ये कोणतेही प्रकारचे माध्यम नाही. साधकाचे सर्व चित्त गाभाऱ्यात असायला हवे.


सेवा नियोजन...


सामुहीक सेवा नियोजन स्वरुप खालीलप्रमाणे...



  • दिनसेवा श्री क्षेत्र औदूंबर
  • रात्रसेवा श्री क्षेत्र नृसिंहवाडी


घरगुती प्रश्न - ( पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जे संबंधित )

आध्यात्मिक प्रश्न - ( नामस्मरण, आत्मपरायण आणि सद्गुरु सेवा संंबंधित )

स्वामीमय सेवेत.... अनुक्रमे


️बाहेरील बाधा, ️वास्तुदोष️प्रखर पितृदोष, घरातील देवारा आणि संरचना️, स्वामीमय उपासना यांबद्दल विनामुल्य मार्गदर्शन केले जाते.



  • सेवेकरीता निघण्याची वेळ. सकाळी ७.३० वाजता.
  • नाश्ता,चहा आणि जेवण प्रवासा दरम्यान होतो.
  • औदूंबर येथे सामुहीक नामस्मरण व पारायण.
  • विनामुल्य वास्तुदोष निवारण मार्गदर्शन
  • प्रश्न उत्तरे  व नित्य उपासना मार्गदर्शन
  • औदूंबर येथुन सुमारे दुपारी ३.३० वाजता बसेस वाडीसाठी रवाना
  • रात्री ७.०० वाजता महाप्रसाद
  • रात्री ८.०० वाजता सामुहीक मंत्र जप व पारायणाच्या माध्यमातून रात्रसेवेला आरंभ. ही सेवा सकाळी ३.०० च्या सुमारास पुर्ण होते.
  •   सकाळी ७.०० वाजेपर्यंत बसेस प्रारंभस्थानी पोहोचतात.


दत्तप्रबोधिनी प्रतिष्ठान सेवा ट्रस्ट माधूयमातुन दर १० तारखेच्या सेवेसाठी बससेवा नियोजन केले जाते.



संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...



Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below



0