श्री गजानन महाराज शेगांव Shree Gajanan Maharaj Shegaon - Shri Swami Samarth


 श्री महाराजांचे ठिकाणी भेदभाव नव्हता तर पूर्ण समता होती. अठरापगड जातीवर त्यांनी कृपा केलेली आहे. त्यांना जो अनन्य भावे शरण जातो. त्यांची सर्व संकटे बाबा आपल्या जीवावर ओढून घेतात व शरणागतांना दुःख मुक्त व चिंता मुक्त करतात.

जगातील सर्व मानवांचे कल्याण करण्याकरिता वेळोवेळी संताचे अवतार होत असतात आणि ते परोपकारा करिताच आपला देह कष्टवित असतात, अशा प्रकारचे बरेचशे संत यापूर्वी होऊन गेलेत त्यापैकीच श्री क्षेत्र शेगांव येथे एक संत होऊन गेले तेच संत गजानन महाराज होय. ते गणपतीचे अवतार आहेत अशी लोकांची श्रध्दा असून गुरु दत्तात्रयांचा सुध्दा एक अंशात्मक अवतार असल्याचे बोलले जाते. म्हणूनच दर गुरुवारी व संकष्टी चतुर्थीला त्यांची विशेष स्वरुपात पूजा केली जाते.

   माघ महिन्यातील वद्य पक्षांतील सप्तमीला ते प्रगट झालेत. उष्टया पत्रावळीतील अन्न ते खात होते म्हणून त्यांना लोकांनी वेडा वेडा म्हणून हिनविले. परंतु आपली महती लोकांना कळू नये म्हणून त्यांनी हे वेडेपण स्विकारले होते. परंतू बंकटलाल व दामोदर या दोघांनी महाराजांना सतपुरूष म्हणून ओळखले व त्यांना शरण गेले. त्यांनी महाराजांना आपल्या घरी नेले. तेथे महाराज काही दिवस राहिले होते ज्या बंकटलालच्या घरात ते प्रथम राहिले होते तेथे आज श्री गजानन महाराज संस्थानाने 'बंकट सदन' नावाने तीन मजली घर बांधले आहे.

   श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिध्द कोटीला पोचलेले साधु होते. मांसविरहित वाटेल ते खावे, कोठेही पडून रहावे व कोठेही संचार करावा अशी त्यांची दिनचर्या असे. मुखाने मात्र ते परमेश्वराचे भजन अखंड करीत असत. भक्तांची व शरण आलेल्यांची संकटे दूर करुन त्यांना परमेश्वर दर्शन घडविल्याची शेकडो उदाहरणे त्यांच्या चरित्रात वाचावयास मिळतात.

   श्री महाराजांचे ठिकाणी भेदभाव नव्हता तर पूर्ण समता होती. अठरापगड जातीवर त्यांनी कृपा केलेली आहे. त्यांना जो अनन्य भावे शरण जातो. त्यांची सर्व संकटे बाबा आपल्या जीवावर ओढून घेतात व शरणागतांना दुःख मुक्त व चिंता मुक्त करतात.

   त्यांचे वरील सांगितल्याप्रमाणे बंकटलाला व दामोदर या दोघाप्रमाणेच कै हरि कुकाजी पाटील हे महाराजांचे परम भक्त होते. ज्याप्रमाणे कल्याण स्वामींनी समर्थ रामदास स्वामींची सेवा केली तशीच त्यांनी गजानन महाराजांची सेवा केली. त्या त्यांच्या निष्टेमुळे व असीम भक्तीमुळेच नागपूरला बुटींच्या घरी गेलेले गजानन महाराज परत शेगावात आलेत तेच या श्री गजानन महाराज संस्थान शेगांव या संस्थेचे संस्थापक कार्यवाह होते. त्यांच्या मुळेच सध्याचे मंदिर बांधण्यात आले.

   श्री गजानन महाराजांनी तेथेच देह ठेवला असून खाली तळघरात त्यांचे समाधी मंदिर असून वरच्या मजल्यावर प्रभू रामरायाचे सुरेख मंदिर आहे. महाराजांनी देह ठेवला तरी पण वायू रुपाने ते आजही तेथे वास्तव्य करुन आहेत. रामचंद्र कृष्णाजी पाटील या भक्ताला त्यांनी गोसाव्याच्या रुपात तर, लक्ष्मण हरि जांजाळ या शरणागताला मुंबईच्या व्ही.टी. स्टेशनवर म्हणजे त्यावेळेसच्या बोरीबंदर या स्टेशनवर परमहंस रुपात भेट दिली. आजही श्रध्देने आपण प्रार्थना करु तर ते आपल्या सर्व कामाना प्रत्यक्षात उतरवितात संकटाचे वेळी आपले रक्षण करतात.

   श्री क्षेत्र शेगांव हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून मुंबई हावडा या मार्गावरील एक प्रख्यात असे रेल्वे स्टेशन आहे. भारतातील सर्व मोठमोठया शहरांशी ते रेल्वेने व एस.टी तसेच खाजगी बसेसने जोडलेले आहे.

   संस्थेने आता तेथे अमुलाग्र बदल केलेला असून भक्त निवास ही मोठी आधुनिक सोईंनी युक्त अशी एक प्रचंड चार पाच मजली इमारत बांधलेली असून श्री गजानन वाटीका व वारकरी शिक्षण संस्था सुध्दा वेगळ्या बाजूस बांधलेली आहे. तसेच संस्थेचे एक स्वयंपूर्ण असे अभियांत्रिकी महाविद्यालय असून त्याचा खूप मोठा परिसर आहे. महाविद्यालय, दोन वसतीगृहे, कर्मचारी वसाहत व खेळ परिसर आहे. रेल्वे स्टेशन व बस स्टँड वरुन मंदिरात जाण्याकरिता विनामुल्य बसेसची व्यवस्था आहे.

         महाराजांचा आवडीचा मंत्र म्हणजे 

                'गणिगण गणांंत बोते'

   हा असून याचा जप केल्यास निश्चितपणे महाराजांच्या वास्तव्याची प्रचिती येते.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...






पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!


Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !

Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below

Post a Comment

0 Comments

0