साधकाच्या अंतःकरणांतील अहंकाराची ( म्हणजे मीपणाची ) भावना दूर झाल्यावरच ईश्वराची प्राप्ती होते. जो पर्यंत मी पणा जात नाही तो पर्यंत ईश्वराची प्राप्ती होत नाही, ईश्वराची प्रेमानेच प्राप्ती होते.
संत कबीर यांचा जन्म इ.स. १३३७ मध्ये काशी क्षेत्री एका हिंदु महिलेच्या पोटी रामानंद नावाच्या सतपुरुषाच्या आशिर्वादाने झाला. परंतु त्यांचे पालन पोषण एका मुस्लीम दांपत्याने केले. बाल वयातच त्यांना ईश्वराविषयी प्रेम, भाव वाटू लागले होते. बालवयातच त्यांना ईश्वरकृपेने सतसंगाचे महत्त्व पटले होते. त्यांना अनेक संताचा, योग्याचा तसेच हटयोग्यांचा सत्संग घडला. पुढे त्यांना श्री रामानंद यांच्याकडून अनुग्रह प्राप्त झाला.
भक्ती व ज्ञान या दोन मार्गावर त्यांची नितांत श्रध्दा होती. त्यांनी आपल्या गुरुंच्या सांगण्यावरून रामनामावरच आपले लक्ष केंद्रित केले होते. परंतु त्यांची भक्ती ही निर्गुण भक्ती होती. त्यांचा राम हा समर्थाप्रमाणेच आत्माराम होता. सगुण राम अथवा कृष्णापेक्षा ते निर्गुण रुपातच रमत असत.
ईश्वराची कृपा झाली तरच सद्गुरुची प्राप्ती होते व जर सद्गुरुची कृपा झाली तरच ज्ञानाची अथवा मोक्षाची प्राप्ती होते. कबीराच्या दोहयामधून खूप अर्थपूर्ण ज्ञान कमीत कमी शब्दात प्राप्त होते. अंतःकरणातील षडरिपूंचा अथवा 'अहं ' चा नाश केल्याशिवाय भगवंताच्या अंतःकरणात निवास होऊ शकत नाही.
साधकाच्या अंतःकरणांतील अहंकराची ( म्हणजे मीपणाची ) भावना दूर झाल्यावरच ईश्वराची प्राप्ती होते. जो पर्यंत मी पणा जात नाही तो पर्यंत ईश्वराची प्राप्ती होत नाही, ईश्वराची प्रेमानेच प्राप्ती होते. परंतु हा प्रेमाचा मार्ग फारच अरुंद ( अति सांकरा ) आहे. त्यामुळे तेथे ईश्वर आणि अहंकार दोन्ही एकाच वेळी राहू शकत नाही. म्हणूनच अहंकाराचा त्याग करा.
कबीराने प्रपंचात राहूनच परमार्थाची प्राप्ती केली. 'काशीतच मरण आले तरच मोक्ष मिळतो' ही कल्पना खोटी ठरविण्या करीता त्यांनी काशी सोडून मजहर या गावी मुक्काम हलवला. तेथेच इ.स. १५१७ साली त्यांचे निर्वाण झाले असून तेथेच समाधी आहे.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
0 Comments