ओंकार उपासना किंवा प्रणवोपासना ( प्रणवसाधना) कशी करावी ? How to do Omkar Upasana or Pranavopasana


प्रणवोपासनेचे विविध प्रकार प्रचलित आहेत.  आपापल्या पंथानुसार प्रणवोपासना केली जाते.  पण कोणत्याही पंथानुसार वा कोणत्याही प्रकारे प्रणवोपासना केली तरी एक गोष्ट सर्वात सारखीच आहे.  ती म्हणजे प्रणवाचा (ओंकाराचा) उच्चार सतत करीत राहणे.  काही पंथामध्ये आपणांस जमेल तेवढा प्राणायाम साधून बहिर्कुंभकाने "ओम्"  चा उच्चार करीत रहाणे ही स्थूल ओंकार उपासना प्रचलित आहे.  तर काही पंथांमध्ये मनात ओंकाराचा ध्वनी करणे हा सूक्ष्म ओंकार प्रचलित आहे.  

काही साधक प्रथम स्थूल ओंकार उपासना करून नंतर सूक्ष्म उपासनेकडे वळतात.  त्याचप्रमाणे काही साधक नित्य ओंकार उपासना करतात तर काहीजण नैमित्तिक उपासना करतात.  काहीजण विशिष्ट कामना बाळगून ओंकार उपासना करतात तर काहीजणांना निष्काम उपासना मानवते.  या सर्वांचा समन्वय साधून काही सत्पुरुषांनी सर्वांसाठी खालीलप्रमाणे उपासना सांगितली आहे.


प्रारंभी शुद्धाचरण ठेवून नैमित्तिक म्हणजे आठवड्यातून एखादा दिवस स्थूल ओंकार उपासना करावी.  आदल्या दिवशी रात्री अल्पाहार करून दुसरे दिवशी शुद्ध आसनावर बसून पूर्वेकडे मुख करून मध्यम स्वरात ओम् चा जितका उच्चार करता येईल तितका करावा.  प्रारंभी वीस सेकंद व नंतर हळूहळू वाढवित शंभर सेकंदापर्यंत प्रगती होते.  

प्रारंभी दहा वेळा व नंतर हळूहळू क्रमाने वाढवीत वीस ते पंचवीस वेळा ओंकाराचा उच्चार दिर्घपणे करणे शक्य होते.  प्रारंभी दहा सेकंदाचे दहा ओंकारापासून पुढे शंभर सेकंदाचे पंचवीस ओंकार झाले म्हणजे खरी साधना सुरू झाली म्हणून समजावे.  गृहस्थाश्रमीयांनी अधिक संख्या  करू नये.  पण ज्यांचा गृहस्थाश्रम पंचवीस वर्षांहून अधिक झाला त्यांनी अधिक संख्येचा प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही.  नैमित्तिक उपासना आठवड्यातून एक दिवसाची असेल तर क्रमशः चार दिवसांनी एकदा,  तीन दिवसांनी एकदा असे करीत दररोज उपासना करण्यास काहीच हरकत नाही.  

विचारभ्रमणे विपरीत चालू झाल्याची  शक्यता वाटल्यास  प्रमाण कमी करावे.  क्रोध,  संताप,  चिडचिडेपणा वाटल्यास प्रमाण कमी करावे.  मनःशांती व प्रापंचिक प्रगती वाढत राहिल्यास प्रमाण वाढवावे.
काही वर्षे वरीलप्रमाणे स्थूल ओंकार उपासना केल्यावर मग सूक्ष्म ओंकार उपासनेस प्रारंभ करावा.  कानाच्या पुढील भागाच्या छोट्या पाळ्या अंगठ्याने थोडा अधिक जोर देऊन कानांच्या रंध्रात बसवाव्यात.  करंगळींना  डोळ्यांच्या कडा थोड्या दाबून डोळे मिटावेत व उरलेली बोटे कपाळावर ठेवावीत.  दोन्ही कोपरांना आधार दिल्यास फारच चांगले.  मग  " ओम्" चा जप करावा.  

अंतर्दृष्टी समोर ठेवावी.  मनाने ओंकार जपत असतानाच अंतश्चक्षुसमोर विविध रंगीत चित्रे व आकृत्या येतात.  गोल आकृत्या,  प्रकाशमान तेजोगोल सूर्यसद्दश आकृत्या येत चालल्या की,  विशेष केंद्रीकरण करावे.  

काही दिवसांनी एकच आकृती दिसू लागते.  हळूहळू मूलाधार इत्यादि सहा चक्रे जागृत होतात.  प्रत्येक चक्र जागृत होताना एक विशिष्ट वाद्याचा ध्वनी कानात ऐकू येऊ लागतो.  अशा वेळी पुढील मार्गदर्शन करण्यासाठी आपला पूर्वनियोजित गुरू आपला मार्ग शोधत आपल्यापर्यंत येऊन ठेपतो.  त्याच्या चरणांशी लीन होऊन पुढील मार्गदर्शन घ्यावे व निःश्रेयस संपादन करावे.


प्रणवोपासना करण्यापूर्वी खालीलप्रमाणे ओंकारस्तोत्राचा तत्पुर्वी पाठ करावा.
आवाह्याम्यहं देवमोंकारं परमेश्वरम् l त्रिमात्रं त्र्यक्षरं दिव्यं त्रिपदं च त्रिदैवतम् ll१ll अक्षरं त्रिगुणाकारं सर्वाक्षरमयं शुभम् l त्र्यर्णव प्रणवं हंसं स्त्रष्टारं परमेश्वरम् ll२ll अनादिनिधनं देवमप्रमेयं सनातनम् l परं परतरं बीजं निर्मलं निष्कलं शुभम् ll३ll ओकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः l कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ll४ll

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...





त्राटक विद्या म्हणजे काय ? त्राटक विद्या व साधना महत्व...!

संपर्क : श्री. कुलदीप निकम 
Dattaprabodhinee Author )


भ्रमणध्वनी : +91 9619011227 
Whatsapp Or Sms Only )


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती



Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below



Post a Comment

0 Comments

0