भौतिक व्यवहारात आध्यात्मिक प्रक्षेपण कसे कराल ? त्याचा फायदा काय ? Spiritual Growth


आयुष्यात स्थुल वृत्तीलाच निर्धारित चौकट समजण्याची घोडचुक करणाऱ्या मानवाला विहिरीतल्या बेडकाप्रमाणेच जीवन जगावं व तसंच मरावं लागतं. त्याची सीमा त्याने स्वतः ओढुन घेतलेल्या अज्ञानाच्या पाघंरुनाप्रमाणे असते ज्यात त्याची वेळ गेल्यावर पश्चात्ताप अथवा अंत होतो.



आपण ठरवलेल्या अथवा कार्यरत असलेल्या नोकरी धंद्यात सर्वसामान्यपणे आपलं संबंधित कामाकाजाच्या कार्यक्षमतेवर आपला टिकाव खालीलप्रमाणे मुद्यांवर आधारित असतो...


  • १. जे काम करता ; त्यात प्रभुत्व आहे का ?
  • २. स्वावलंबीपणाची वैचारिक पातळी आहे का ?
  • ३. आपल्या व्यावहारिक सहकार्यांसोबत आपली मानसिक जडण घडण कशी आहे ?
  • ४. धंद्यात ग्राहकांना कशाप्रकारे समाधानकारक वागणुक देता ?
  • ५. स्वतःची प्रतिमा व प्रतिभा समाजात कशाप्रकारे विस्तारित करता ?

ह्या पाच मुद्यांच्या आधारावर मानवाचा व्यवहारीक पाया व्यवस्थित रचला जातो. त्यायोगे पुढील प्रगतीशील पथावर आरुढ होण्यासाठी आध्यात्मिक सान्निध्याचा आधार घेतला जातो. व्यवहारात आध्यात्मिक शक्तींचा विनियोग परिपक्व मानसिकतेच्याच आधारावर होऊ शकतो अन्यथा अर्धवट ज्ञान कधीही आत्म घातकी ठरतेच... हे विसरु नयेत.

नोकरदार वर्गासाठी व्यवहारिक मार्गात आध्यात्मिक प्रक्षेपण कसे होईल ? त्याचा फायदा काय ?

सरकारी नोकरी, खाजगी नोकरी शोधणार्या अथवा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वतः दिन - चलायमानाचे व्यवस्थित आकलन करावेत. त्यायोगे वैचारिक पार्श्वभूमीच्या समजुतीवर आध्यात्मिक विचार प्रक्षेपित करण्यास व्यवस्थित आत्म मार्ग प्रशस्त होईल.


आपल्या ड्युटीच्या फ्रेम वर्कमधे घडणाऱ्या औपचारिक आणि अनौपचारिक गोष्टीचा व्यवस्थित आढावा घेऊन ; जर स्वतःला प्रगती करावयाची ईच्छा असल्यासच पुढील प्रमाणे आत्मिक यादी तयार करा...


  • १. वर्तमान स्थितीत स्वतःकडून होणाऱ्या सर्व चुका लिहुन काढणे.
  • २. आपल्या वर्तुळात किती व्यक्ती आहेत ? त्यात वाढ कशी होईल ?
  • ३. आँफीस मधील टारगेट व राजकारणात माझा टिकाव कसा लागेल ?

धंदेवाईक वर्गासाठी व्यवहारिक मार्गात आध्यात्मिक प्रक्षेपण कसे होईल ? त्याचा फायदा काय ?

छोटे, मोठे उद्योगधारकांनी कामकाजातुन सुरवातीला २४ तासांमधुन काही वेळ स्वतःसाठी राखीव ठेवण्यासाठी आपल्या धंद्याला सिस्टीमचं स्वरुप प्राप्त करवुन द्यावं. धंद्यातील सर्व बाबींचा सारावार लेखाजोखा नियमबद्ध व सुत्रसंचलनात्मक वृत्तीने आखुन घ्यावा. जेणेकरुळ थोडाफार वेळ स्वतःसाठी निघु शकेल.



आपली धंद्यातील कार्यक्षमता वाढाण्यासाठी आध्यात्मिक विचारांचे प्रक्षेपणात आपल्याकडुन होणाऱ्या दैनंदिन कर्मात विनियोग साधावा यासाठी खालीलप्रमाणे मुद्दे समजुन घ्यावेत.


  • १. आपल्या धंद्याला Offline सोबतच Online  मार्गावर प्रस्थापित करणे. त्यायोगे भविष्यातील शारीरिक कष्ट कमी होतील.
  • २. आपल्या हाताखालील सहकार्यंची योग्य माहीती आधोरेखीत करुन आध्यात्मिक प्रक्षेपणात त्यांचे विचार अपेक्षित आकलन होईल यासाठी सहभागी करावेत.
  • ३. आपल्या ग्राहकांसोबत सलोखा वाढवावा.
  • ४. आध्यात्मिक विचारांना सर्व स्तरांवर जुळवुन घ्यावेत.

दत्तप्रबोधिनीच्या सद्गुरु दास्यभक्तीध्यानयोग च्या आधारावर आपली वैचारिक पातळी अधिक विस्तारित करत येते. ब्लाँगवर अधिक माहीती वरील Search मधे शोधा. त्याचा फायदा खालीलप्रमाणे आहे.

  • १. माणसांची खरी ओळख त्वरित पटते.
  • २. आपली व्यवहारिक कार्यक्षमता वाढते.
  • ३. आपल्या विचारांना धार येते.
  • ४. संसारात राहुन आध्यात्मिक जीवनाच्या उच्च शिखराला गाठु शकता.
  • ५. दुःखाचा स्पर्श मनाला होत नाही.
  • ६. स्वामींचा आधार पदोपदी जाणवतो.
  • ७. मन नेहमी आनंदी राहाते.
  • ८. आपलं अस्तित्व शाश्वत होण्यास समज येते.

धंद्यात प्रारंभिक स्वरुपात यश मिळवण्यासाठी एक प्रभावी उपाय 


माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांमधे काही धंदेवाईक लोक मुळातच बुद्धीमत्तेने हुशार असतात सोबत भांडवलाचीही कमतरता नसते पण त्यांना त्यांच्या व्यापारधंद्यात यश येत नाही. सद्गुरुंना मनोमनी भागीदार केल्याशिवाय कोणत्याही कार्याला यश येणार नाही. आपले प्रयत्न व सद्गुरु ईच्छा एकत्र आली म्हणजेच कार्यसिद्धी होते. व्यापार - उद्योगात लक्ष्मीची प्रतिष्ठा जास्त आहे.


नोकरी करुन फार तर फक्त दोन वेळचं अन्न मिळेल ईतकीच तरतुद होते पण कोणीही कूबेर होणार नाही. लक्ष्मीमाताही महापतिव्रता आहे. नारायणाला सोडुन क्षणभरही ती कुठेही राहाणार नाही. यासाठी अमाप संपत्ती मिळवण्यासाठी घरी विष्णु उपासना करणे आवश्यक आहे. यासाठी रोज एक पाठ विष्णु सहस्त्रनामाचा एक पाठ दररोज करावा. 


या उपासनेमुळे फार थोड्या दिवसातच व्यापार धंद्याची रया पालटुन भाग्योदय होतो हे सत्य. व्यापारी बांधवांनी तुळशी काष्ठाची माळ घेऊन ' ॐ नमो विष्णवे नमः ' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. एकादशीला कडक उपवास करावा. धंद्यात प्रामाणिकपणा अपेक्षित आहे.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील प्रत्यक्ष डोळस भेद कसा करावा...?- Simple and Easy

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग - Step by step



पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!