प्रबोधिनी एकादशी : दत्तमार्गीय आत्मबोध आत्मिक पुण्याईचे केंद्रस्थान Prabodhinee Ekadashi


कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात योग निद्रीस्त सत्पुरुष अथवा दत्त विभुतींना चार महिन्याच्या दिर्घ सुप्तावस्थेतुन जागृत करण्याचा दिवस. प्रबोधन म्हणजे जागृत करणे म्हणुन त्यांना प्रबोधन नामकरण करण्यात आलं. स्मतृगामी दत्त भगवंताचे दासरक्षणापोटी आवाहन करणे ; यासाठी दत्त विभुतींना आत्मियतेतुन स्थानबद्ध करणारी व करवुन घेणारी शक्ती अर्थात दत्तप्रबोधिनी ; एकादशी युक्त करण्यात आली. आपल्यातील शिव तत्व जागृत व्हावे व स्वजबाबदारीचे भान यावे यासाठी हंसः सोहं तत्वांतर्गत नियतीने आपल्याला झोपवले. खरे पाहता दत्त भगवंताला जागवणे म्हणजे स्वतःला जागवणे. 


झोपलेल्याला उठवणारी, बसलेल्याला उभा करणारी, उभा असेल त्याला चालायला लावणारी व चालत असेल त्याला धावायला लावणारी हि जीवंत चैतन्यमय व प्रेरणादायी वैदिक संस्कृती अनुभवली पाहीजे. मानवी जीवन कमळ पत्रावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे. त्याला व्यर्थ प्रमादामध्ये न टाकता माणसाने जागृत राहुन त्याचा सदुपयोग केला पाहीजे. कोंबड्याच्या आरवण्याने किंवा सुर्य उगवण्याने सकाळ होत नाही तर... मानवाच्या उठण्याने सकाळ होते.



वर्तमानात प्रत्येक मनुष्य झोपलेल्या अवस्थेत दिसतो. मात्र जागत असल्याचा देखावा करण्यात तो अतिशय पटाईत आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचे असल्यास तर माणुस दांभिक व बहुचेहारेवादी बनला आहे. आळस, अज्ञान व अंधार यांच्या घोर निद्रेत मस्त असलेल्या मानवाला जागवणारी एकादशी म्हणजे दत्त मार्गीय प्रबोधिनी अर्थात दत्तप्रबोधिनी एकादशी आहे. 

खर्या जागृतीच्या आभावामुळे आपले जीवनातील सर्वच व्यवहार वरवरचे बनले आहेत. जीवनातील अंतर्गाभा अथवा खोली गमावुन बसलो आहे. " आपण चालतो खुप ; पण पोहोचत नाही कोठेच ! " ! कारण आपण मनोमार्गे चालतो तात्त्विक नाही. 


  • १. पायी चालाल तर प्रवास घडतो
  • २. मनोमार्गे चालाल तर सहवास घडतो
  • ३. ह्दयाने चालाल तर यात्रा घडते
  • ४. तत्वाने अर्थात तात्त्विक मार्गाने चालाल तर तीर्थयात्रा घडते. 

आपण पाहातो खुप ; पण प्राप्त काहीच करत नाही. डोळे पाहातात ते दृश्य ; ह्रदय पाहतं ते दर्शन ! 

आपण ऐकतो खुप पण समजत काही नाही कारण तात्विकतेमधे अपेक्षित असलेली ग्रहणशक्ती जागृत केली नाही आणि यापुढेही ती नीच कुटीलतेपोटी होणार नाही !


आपण बोलतो खुप पण वाणी येत नाही कारण  दोन तोंडी सर्प जीभ एकाधिकारवृत्ती उमगु देत नाही. मग सरस्वती जीभेवर येणार तरी कशी !


आपण कामें खुप करतो पण कर्मयोगाची ऊंची गाठु शकत नाही. कर्म मार्गात आत्मज्ञानाचा प्रकाश व सद्भावाची आर्द्रता नाही. प्रवृत्ती व प्रकृती मग्न असुनही जीवन वाटचालीत अक्कलशुन्य भुमिकेत आहे ! 



शिव व जीव मैत्री अखंड व शाश्वत असते. दत्त भगवंत आपली हजारो कामे करत असतात आणि आपण त्यांच्या कामात प्रमाद उत्पन्न करत असतो. स्वयं दत्त महाराज सद्भक्ताला प्रमादातुन जागविण्यासाठी सत्व मार्ग उपलब्ध करुन देतात तसंच आपलंही कधीतरी आत्मोद्धारातुन जीवन पायवाट मोकळी होणार याची खात्री बाळगावी. 

या जीवनात अज्ञानी मतीने आपण जे काही उलट सुलट केले असेल त्याचा अतिशय कडक हिशोब नियतीचक्रचालकाने आपणाकडे मागु नये म्हणुन त्यांचे ध्यान सद्गुरुदास्यभक्तीकडे वळवण्यासाठी मानवाने दत्तदेव चरणी स्वचित्त एकरुप होण्यास तदाकार व्हावे. 


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...



0