व्यवहारीक भगवद्गीता काय आहे ? जीवनात विनियोग करण्याचे फायदे काय आहेत ?


एक परमरहस्यमय ग्रंथ, वास्तविकतेने गीतेचे माहात्म्य वैखरी वाणीने वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही. वेदांचे सार व जीवन जगण्याची कला भगवंताने काव्यस्वरूपात संस्कृत भाषेतुन गायली आहे. गीतेचा मुळ आशय ईतका गहन आहे की, जन्मभर निरंतर अभ्यास करत राहीले तरीही, अंत लागणे अशक्य ! प्रत्येक दिवशी नवनवीन तत्व प्रकट होऊ लागतात ; त्यामुळे भगवद् गोडी निरंतर दाटुन येते. 

दुसऱ्या ग्रंथात बहुधा थोड्या जास्त प्रमाणात संसारीक विषय मिसळलेले असतात. गीतेत भगवंताने एक अनुपम शास्त्र सांगितले आहे. 
श्रीमद् भागवत व श्रीमद् भगवद् गीता यातील सुक्ष्म परस्पर प्रार्थमिक आत्मिक संबंध कोणता ?

माझ्या जीवनात भगवंताने केलेल्या लीला व उपकारांची वाच्यता होणे कठीणच आहे तर परमग्रंथाचे सुक्ष्म कथन कसे होईल ; हा विचार करण्यासारखा विषय आहे. तरीही दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून आज सद्गुरुकृपेस्तव आपल्या समक्ष महत्वाचे आत्मिक अनुसंधान करत आहे. 


श्रीमद् भागवत व श्रीमद् भगवद् गीता यातील परस्पर संबंध खालीलप्रमाणे तीन मुद्द्यांद्वारे समजुन घेता येईल.


१. श्री मद् भागवत ग्रंथ ओळख ! 

२. श्री मद् भगवद् गीता ग्रंथ ओळख !
३. श्रीमद् भागवत व श्रीमद् भगवद् गीता यातील परस्पर संबंध ! 

१. श्री मद् भागवत ग्रंथ ओळख ! 


भागवत ग्रंथराज म्हणजेच परमब्रम्ह भगवान श्रीकृष्णाचे शरीर आहे. ज्याप्रमाणे याअधी दत्तप्रबोधिनीत सांगितल्याप्रमाणे जसे भगवान शिवचे शरीर शिव गण, नंदिगण व भैरव गण असतात. त्याचप्रमाणे भागवत हे श्रीकृष्णाचे शरीर आहे. 
ब्रम्हर्षी शुक मुनींनी राजा परिक्षितकडे सुपुर्द केलेली हे अमृतराज कुंभ ; जे स्वर्गादी देवतांनाही प्राप्त होणे शक्य नाही. अशा सद्गुरुकृपेद्वारे संसारीक मानवाला अभुतपुर्व असा पारलौकीक व परमपुजनीय आध्यात्मिक राजमार्ग प्रस्थापित करुन दिला. ज्यायोगे असंख्य भक्तगणांचा कमी वेळेतच आत्मोद्धार झाला. 


२. श्री मद् भगवद् गीता ग्रंथ ओळख!


आपल्या सर्वांनाच अवगत आहे की, भगवंताने अर्जूनाला कुरुक्षेत्रात कौरव - पांडव युद्ध सुरु होण्यापुर्वी मधल्या युद्ध सीमेवर सांगितलेली संस्कृत काव्यमयी लीला आहे. 


भगवद्गीतेत भगवंताने अर्जुनाद्वारे अथवा गीता वाचकाद्वारे स्थुल व वैखरीयुक्त आत्मिक भुमिका न धारण करण्याचे विशद केले. त्यायोगे खालीलप्रमाणे त्याची भुमिका व उद्दिष्ट व्यक्त केली गेली आहेत. 
अ. वरील चित्राद्वारे दाखवलेल्या रथाचे प्रतीरुप आपले मानवी स्थुल शरीर आहे. 


ब. रथाला जोडलेल्या घोड्यांना भगवंताने ईंन्द्रीयांची उपमा दिली आहे. 


क. रथाला जोडलेल्या घोड्यांच्या लगामास मनाचा आत्मबोध प्रकट केला आहे. 


ड. रथाच्या घोड्यांची लगाम ज्या सारथीच्या हातात आहे ; तो म्हणजे आपला सद्गुरु अथवा देव किंवा भगवंत ; यात तुम्ही सगुणाद्वारे कोणतेही रुप द्या ; तरीही मुळ चैतन्य हेतु मार्ग पुरस्कर ( नियती कार्यकारण भाव ) आरुढ परमात्माच विद्यमान आहे. 


ई. भगवंत सारथीच्या पाठीमागे रथावर तो अद्वैत पुरुष जीव आहे. जो जीवनाच्या युद्ध भुमित स्वतःचे अस्तित्व गमावुन बसला आहे. 


या जीवाचे पुर्वजन्म व प्रारब्ध अकर्मवादी असल्याकारणाने भगवंताची शाश्वत साथ मार्गदर्शक स्वरुपात मिळाली. 


क. या रथावर आत्मा - परमात्म्याच्या आवाहनाने अंजनीसुत मारुती स्थुलदेहाचा रक्षणकर्ता आहे. जो धर्म अधर्म, न्याय अन्याय व नीती अनीती मधील तापांपासुन सद्गुरुमय दासाचे रक्षण करतो. 


३. श्रीमद् भागवत व श्रीमद् भगवद् गीता यातील परस्पर संबंध ! 


ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजु असतात ; त्याच प्रमाणे भगवतकार्यही सर्व अणुरेणू व्याप्तच असते. 


श्री मद् भागवत हे समाधी साधन आहे तर श्री मद् भगवद् गीता ही जीवन जगण्याचे सर्वश्रेष्ठ व्यवहारीक साधन आहे. 


भागवत ही आध्यात्मिक जीवनात मरण्याची उत्तम कला आहे तर गीता भौतिक जीवनात जगण्याची उत्तम व्यवहारीक कला आहे. 

मानवी जीवनात गीतेतुन भागवत ग्रंथाचा विनियोग साधावा तर भागवत ग्रंथातुन आपल्या अंतरंगात भगवद् गीतेचं अनुकरण साधावं. अशा धारणेद्वारे मानवी जीवन हमीपुर्ण आशादायी व इह - परलोकास प्राप्त होते.


व्यवहारिक भगवद्गीता काय आहे ?


लक्ष्मीपती महाविष्णुस्वरुप पद्मनाभस्वामींनी गायलेल्या गीतेचा मुळ दोन भागात अर्थबोध होतो. तो खालीलप्रमाणे आहे. 


१. सांख्य योग

२. कर्म योग १. सांख्ययोग


भगवंताने सांगितलेल्या सांख्ययोगाची परीभाषा विदेही - सर्व चराचर अणुरेणु व्याप्त असलेली आहे. हा योग अद्वैत कर्माच्या सिद्धांतावर आधारलेला आहे ; ज्याद्वारे मनुष्य स्वतःच्या जीवनात कर्म - दुष्कर्म - अकर्म साक्षीभावाने जीवन अनुभवतो. अर्थात तो ईंद्रीयवेधी कर्मबंधनातुन निवृत्त असतो. या जीवा शिवाच्या बैलजोडीस काही लोक सक्तीचा संन्यास असे नाव निरुपण देतात जे मुळात चुकीचे आहे. 


चारित्र्यसंपन्न दत्त विभुतीं सांख्य योगातील अतिसुंदर उदाहरणे प्रस्थापित करतात. त्यांचा अभ्यास करावा. 


२. कर्म योग 


भगवंताने दुसरा मार्गक्रमण निष्काम कर्मयोग दिला आहे. ज्या आधारे मनुष्य त्याच्या जीवनकाळात घडणाऱ्या घटनांना आत्मसमर्पणाच्या भुमिकेतुन सद्गुरु दास्यभक्तीमार्गाद्वारे आपल्या आत्मिक अनुसंधानासोबत जोडतो. ज्या निष्काम कर्मयोगात संबंधित मानवाला अथवा पतितांना सकाम - कामना अर्थात वासनेचा प्रादुर्भाव नसतो. अशा समर्पणवादी आयुष्याला दैविक सान्निध्याद्वारे अंतरिक कलाटणी मिळुन मानव सर्वसामान्य जीवनातुन सुक्ष्म स्तरावर योगी जीवन व्यतीत करतो. 


उदा. नारळ आतुन पाण्याने भरलेलं असतं.परंतु जेव्हा ते सुकतं तेव्हा आतुन सर्व बाजुंनी वेगळं होतं अर्थात ईंद्रीय देहाचा अस्त होउन आध्यात्मिक उर्र्ध्वगमी होतो. 


वरील दोन्ही सांख्य योग व कर्म योगाचे उद्दिष्ट एकच आहे असं तुम्हाला आता कळलं असेल. परंतु भुमिका अर्थात मार्गक्रमणात फरक आहे. जो ज्याच्या त्याच्या प्रकृतीला झेपेल असा स्वीकारावा. 
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

संपर्क : श्री. कुलदीप निकम 
Dattaprabodhinee Author )

भ्रमणध्वनी : +91 9619011227 
Whatsapp Or Sms Only )


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीतीAll about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !


Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below