डोळे बिघडणे व ईंटरनेट व्यसनमुक्ती हेतु आध्यात्मिक उपाय. Mobile vyasanavar upay


तासनतास कंप्युटर स्क्रीन समोर बसुन काम करणारे ; स्वाभाविकपणे डोळ्यांवर अतिरीक्त तणावाचा परिणाम भोगत असतात. त्यायोगे कालांतराने दृष्टी दोषाचे विकार उद्भवु लागतात. 

आपल्या शरिरातील सर्वात नाजुक व अतिसंवेदनशील अवयव म्हणजे आपले चक्षु ( डोळे ). कधीतरी विचार करा ; जर आपल्याला निष्काळजीपणामुळे अर्धअंधत्व अथवा अंधुकतेचा परिणाम भोगावा लागला तर त्याचा परिणाम तुमच्या डोक्यावर व शरीरावर होणार नाही का ? 


आपण संत सुरदास महाराजांसारखे तर नक्कीच नाही जे अंधत्वापोटीही भगवंताला सर्व चराचरात पाहात असत. आपल्या जीवनातील सर्व कर्मांचा 50% अविर्भाव आपल्या दृष्टीतुनच प्रार्थमिक स्तरावर येतो. ते जर हलगर्जीपणामुळे गमावुन बसलात तर जीवनात अतिरिक्त बाह्यमदतीचीच पदोपदी गरज लागेल. कोणालाही भावनापुर्ण मदत करण्यासाठी आज कोणासही निःस्वार्थी वेळ नाही. म्हणुन स्वतःचे डोळे अधि संभाळा. सतर्कतेने निगा राखा. 

मोबाईल स्क्रीन रात्री अंधारात पाहु नये. उशीवरुन एका अंगावर पडुन एका डोळ्यावर मोबाईल स्क्रीन लाईटचा 200% प्रकाश ; तुमचे दोन्ही डोळ्यांमधील संतुलन समीकरण कायमचे बिघडवु शकते. परिणामी भयानक दृष्टी दोषाला सामोरे जाऊन डोकेदुखी, अस्पष्टता, गुंगी येणे, डोळ्यातुन पाणी येणे, डोळ्यात चुरचुरणे अशी प्रार्थमिक लक्षणे अनुभवास येतात. 


रंगीबेरंगी जीवन अधिक अर्थपूर्ण आपली अंर्तबाह्य दृष्टीच बनवते. 
आपली दृष्टी आपल्या जीवनासोबत अबाधीत अवस्थेत चिरकाल दोषमुक्त राहावी यासाठी दत्तप्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून खालीलप्रमाणे उपाय देत आहोत.

हा तोडगा आंधळ्या माणसाला दृष्टी देणार नाही. तसेच मोतीबिंदु असलेल्या व्यक्तींनी हि कृती करु नये. डोळे बिघडलेल्या व्यक्तीने सकाळी सुर्योदयापुर्वी उठुन सचैल स्नानआदी संध्या करुन तयार व्हावे. उघड्या जागेवर अगर गच्ची / गँलेरीत जावे. तेथे एक पसरट भांडे छोटी परात जमिनीवर ठेवुन त्यात थोडीशी नीळ घातलेले पाणी ओतावे. शाई वगैरे वापरुन पाणी निळसर करु नये. त्या पाण्यात पडणाऱ्या सुर्य प्रतिबिंबाकडे नजर ठेऊन " ॐ ह्रीं अर्काय नमः " या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. कमीतकमी १०८ वेळा जप झाला पाहीजे. जप झाल्यावर भांड्यातील थोडे पाणी बंद डोळ्यांना लावा. 


रात्री न चुकता एक चमचा त्रिफळा चुर्ण पाण्यासोबत घ्या व झोपी जा. ३ ते ६ महीने हा उपाय करा. पावसाळ्यात हा उपाय जमणार नाही. प्रतिबिंब उगवत्या सुर्याचेच पाहीजे. मध्यान्ही हि कृती करु नये. उपाय करताना वांगी, टाँमेटो व केळी अजिबात वर्ज्य करावीत. 2 ते 3 महिन्यातच दृष्टी दोष कमी होईल. चष्मा व लेन्स वापरणार्यांचाही नंबर जाईल. 


ईंटरनेट व्यसनमुक्तीचे प्रभावी उपाय :
ईंटरनेट व्यसनाधीनतेची परिभाषा काय आहे ?


आपल्या हातातील मोबाईल / नोटपँड जेव्हा आपल्या शरिरांतर्गत अवयवांसारखे जागृत / अजागृत / सुषुप्तावस्थेत अविरत प्राणवायु स्वरुपातील मोबाईल डेटा अथवा वायफाय आधारे अर्थहिनतेने कार्यरत असतात तेव्हा आपण व्यसनाधीन झालो असे समजावे.


आज वेळ वाया घालवण्याचे दाहक परिणाम तुम्ही गुगलद्वारे समजु शकता ; ते मी ईथे सांगत नाही. माझ्याकडे येणाऱ्या लोकांना ह्या व्यसनाने ईंटरनेट व्यवस्थित ( मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक स्तरावर ) वापरता येत नसल्याने जीवन कोणत्या दिशेला भरकटत चालले ; ते देखील कळत नाही. ह्या व्यसनातुन बाहेर येण्यास स्वतःला अधि व्यवस्थित समजुन घ्यावं लागेल मग ईंटरनेटचा अर्थपूर्ण वापर करता येईल तो समजेल ते सुद्धा पुष्कळ फायद्यासहीत ! 

ईंटरनेटवर व्यसनाधीन राहाणे व व्यस्त राहाणे यात फरक आहे. 
व्यसनाधीनता तर तुम्ही ओळखु शकता पण व्यवस्थित व्यस्त कसे राहायाचे हे तुम्हाला शिकावं लागेल ते जितके लवकर शिकाल तितक्याच लवकर या धावत्या जीवनात टिकाल अन्यथा वेळ काळाच्या ओघात एक दिवस निर्दयतेने नाहक चिरडले जाल. तेव्हा तुम्हाला साथ देण्यास स्वकीय परकीय कोणीही येणार नाही. 

ईंटरनेट व्यसनाधीनतेच्या आभासी दुनियेतुन बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे ईटरनेट व्यस्त जीवन शैली स्थापित करणे. अन्यथा जीवन जगणे / पैसे कमवणे काही काळानंतर अतिकठीणच ठरेल. तेव्हा पश्चात्ताप करुन काहीच होणार नाही. वेळेतच सुधरा. 


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
0