सुखरुप प्रवास होण्यासाठी प्रवास यंत्रासोबत वाहक सुरक्षिततेचे आध्यात्मिक उपाय ! Suraksha Yantra


आज रस्त्यांवर गाडी चालवणे म्हणजे 360° परिसरावर सतत लक्ष ठेवुन सतर्कतेने मार्गक्रमण करणे. आपण वाहन चालवताना दक्ष राहाणे ईतके प्राधान्यतः महत्वाचे असते कि ; सोबतच्या व्यक्तीची जीवित हमी सुद्धा वाहन चालकच असतो.


काही वेळा व काही ठिकाणी कितीही सावधानता बाळगली तरीही अनायासे अपघात घडल्याचे प्रकार आपण सर्वत्रच पाहातो. काही अपघात मानवी दोष ; तर काही यांत्रिक दोष ; तर काही संबंधित घटनास्थळीय नकारात्मक ऊर्जेच्या अस्तित्वने घडतात.कोणतेही वाहन चालवताना अभद्र घटना अर्थात अपघाती कृत्य होऊ नये त्यावर खालीलप्रमाणे यंत्र काढावे.


हे यंत्र एका पाटावर ठेवुन त्याच्यासमोर बसावेत. नंतर चौकटीतील एका आकड्यावर बोट ठेवुन खालील मंत्र जितका आकडा असेल तितक्या वेळा म्हणावा. म्हणजे सात आकड्यावर बोट ठेवल्यास सात वेळा म्हणावा असा अर्थ बोध आहे.


मंत्र :

"अंजनीसुत हनुमान रक्षतु रक्षतु स्वस्ति"

असे प्रत्येक चौकटीवर बोट ठेवुन मंत्रोच्चर करावा. नंतर सहाण्यावर हिरडा उगाळुन त्याचे गंध तयार करावेत. ते प्रत्येक चौकटीला वाहावेत.


दत्तप्रबोधिनी बेवसाईवर याअधी मी श्री काळभैरवनाथ दैवत प्रवास दैवत असल्याचे नमुद केले आहे तशी प्रवासस्थ साधना केल्यास मार्गक्रमण करताना साधक कायमस्वरुपी भयमुक्त होते.उदबत्ती ओवाळुन रुईच्या वाळलेल्या पानांचा धुप लावावा. नंतर यंत्रास फुटाणे गूळ नैवेद्य दाखवावा. इतके झाल्यावर यंत्राची घडी करुन लाल कापडात घट्ट शिवावी. ही गाडी चालवताना नेहमी कमरेपासुन वर ; अर्थात शर्टाच्या खिशात ठेवावी. वाहनाला बांधु नये. हनुमान देवता ड्रायव्हरचे नेहमी रक्षण करेल हे सत्य.


हे यंत्र एखाद्या पौर्णिमेला तयार करावे. चार पौर्णिमा पुर्ण झाल्यावर ; परत पाचव्या पौर्णिमेला नवीन तयार करणे आवश्यक आहे.

वाहानात ड्रायव्हर बाजुला व मागे बसणार्यांनीही हे यंत्र वापरण्यास हरकत नाही. फक्त गाडी चालवण्यापुर्वी व गाडीत बसण्यापुर्वी या यंत्राकडे क्षणभर पाहावे. ते परत खिशात ठेवावे. या यंत्राच्या अगम्य शक्तीवर संपुर्ण श्रद्धा व विश्वास असणे अगत्याचे आहे.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!0