ठ़गेगिरी अथवा फसवेगिरीपासुन बचावासाठी उपाय - स्वरक्षणाहेतु अतिमहत्वपुर्ण साधना


प्रत्येक व्यक्तीला जीवनात सर्वांगीण प्रगतीची कमी जास्त प्रमाणात आशा असतेच. त्यायोगे जनमानसात 'व्यक्ती रेखा' अनंत संकटांना स्वबळाद्वारे लढा देऊन यशस्वी सुद्धा होतातच. परंतु त्यांच्या सभोवताली वावरत असणारे त्यांचे स्वकीय व परकीय नातलग, मित्र मंडळ आणि व्यावहारिक चिकित्सक त्यांच्याशी दुट्टप्पी भुमिकेद्वारे घातपाती कारस्थाने करताना विश्वासघात तृर करतातच ; ज्यायोगे आपली जीवनकाळातील झालेली बहूतांशी मेहेनत फुकट जाते.

अशी वेळ येण्यापुर्वी संबंधित ठग्यांकडुन फसवणूक न व्हावी यासाठी खालीलप्रमाणे काही महत्वपुर्ण उपाय दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून देत आहोत. 



स्वकीय व परकीय फसवणुकीतुन बचाव होण्यासाठी एकुण तीन गोष्टीची नितांत आवश्यकता असते ते खालीलप्रमाणे आहे...

  • १. संबंधित विषय व्यक्तीची पार्श्वभूमी
  • २. स्वतःची जिज्ञासा व डोळस विश्वास
  • ३. साधनास्तरीय दैवी सान्निध्य

साधना स्तरीय दैवी सान्निध्य अनुसरुन दत्तप्रबोधिनी ब्लाँगवरील ईतर लिखाणे व्यवस्थित वाचावीत. 


काही महत्वपुर्ण उपाय खालीलप्रमाणे देत आहोत. 


१. दररोज हातात रक्षा घेऊन " आध्यात्मिक ऊबंटु " करुन झाल्यावर ती रक्षा स्वतःच्या कपाळाला लावावीत व उरलेली रक्षा पांढऱ्या कागदात बारीक पुडी करुन शर्टाच्याच खिशात ठेवावीत व कार्यसिद्धीसाठी तठस्थपणे सामोरे जावे. सद्गुरुनाथ मार्गदर्शन करतात यात संशय घेऊ नका. 


२. दत्तप्रबोधिनी ब्लाँग वरील मारुती स्तोत्र पाठ करताना मारुतीच्या अंगावरील शेंदुर, एक लाल मिरची, एक लोखंडी खिळा व मुठभर उडीद एका पांढऱ्या फडक्यात ठेऊन ती पुरचुंडी लोकरीच्या काळ्या दोर्याने घट्ट बांधावी. हि पुरचुंडी झोपताना उशी खाली ठेऊन झोपावेत. 


ह्या उपायाने नकारात्मक शक्त्या आपल्या जवळ फिरकत नाहीत परंतु तसं आपणही अंतर्बाह्य पावित्र्यही जपावं...! 


३. जुन्या घराच्या कौलाचे पाच तुकडे तापवुन लाल करावेत. नंतर एका मातीच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात घरात शिजवलेले अन्न व थोडी हळद टाकावी. नंतर कौलाचे तापवलेले पाच तुकडे त्या भांड्यात टाकुन त्याचा ' चुर ' असा आवाज होऊ द्यावा. मग एक केरसुणी घेऊन घरातील जी व्यक्ती कोणाच्याही फसवेगिरीत अडकलेली असेल त्या व्यक्तीच्या अंगावरुन त्याच्या गाड झोपेतच दत्तप्रबोधिनी ब्लाँग मधील कोणताही ऊबंटु मंत्र जपताना ७ वेळा फिरवावीत व ती त्या भांड्यावर ठेवावीत. संध्याकाळी त्या भांड्यातील पाणी चार रस्त्यावर टाकून द्यावे. संकट निरसेल. 


४. चुकिची संगत अथवा कार्यसिद्धीत फसवेगिरीपासुन बचाव होण्यासाठी संबंधित माणसाने स्वतःभोवती तुरटी ओवाळावी मग ती तुरटी त्याने डाव्या हाताने कुटावी व ते चुर्ण विहिरीत अगर वाहात्या पाण्यात टाकून द्यावी. विघ्न टळेल.



५. ठग्यांच्या घरी अन्नग्रहण करण्याची वेळ आल्यास स्पष्ट नकार द्यावा. काही स्वार्थी कारणास्तव परान्न ग्रहण करण्याची आवश्यकता भासल्यास त्या ताटातील अन्नापैकी सर्व पदार्थांचा थोडा थोडा भाग बाजुला ठेवावा व त्यावर कोणाच्याही नकळत चिमुटभर गुलाल पेरावा. नंतर ते स्थान सोडुन दुसरीकडे जाऊन बसुन अन्न ग्रहण करावेत. अन्नाचा मनावर व प्रकृतीवर अपायकारक परिणाम होणार नाही.

६. सतत फसणार्या व्यक्तींनी विडाच्या पानातुन गुलाबाच्या सात पाकळ्या दर आठवड्याला एकदा ग्रहण करावेत. मानसिकतेत फरक पडेल.

७. घरातील धान्य सामग्री पक्वान्ने व जिन्नस यांच्यावर ग्रहण काळाचा दुष्प्रभाव होऊ नये यासाठी निंबोणिचे फळ व लोखंडी खिळा ठेवावा. 


८. आघाड्याच्या सात काड्या आणुन त्याचीजुडी हातात धरावी. ' ॐ काळभैरवाय नमः ' या दत्तप्रबोधिनी मंत्राचा १०८ वेळा प करुन ती जुडी एका भांड्यात दुध घेऊन त्यात बुडवावी. ते दुध फसलेल्या अर्थात मानसिक द्वंद्वात अडकलेल्या व्यक्तीस प्यायला द्यावेत. असे लागोपाट सात दिवस केल्यास नकारात्मक वर्तुळाचा नाश होतो. 


९. एखादा इसम त्रासातुन पुर्ण बाहेर जरी आला तरी तो मुळ स्वरुपात निर्भय झाला नाही असे सतत म्हणावेत.


१०. शेणाची छोटी पणती करुन त्यात गुळाचा एक खडा, तेल व वात घालुन ती पणती सकाळी सुर्योदय व संध्याकाळी सुर्यास्त समयी ऊंबरठ्यावर पेटवुन ठेवावीत. 



महत्त्वाची सुचना :


सर्व उपाय संबंधित पीडित व्यक्तीच्या संपुर्ण संमतीनेच आमलात आणावेत. कुठेही कसली लपवेगिरी केल्यास परिणाम उलट होतात याची समज घ्यावी.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...



0