व्यवसाय अथवा नोकरीत त्रास होणाऱ्यांसाठी विशेष तोडगा. Job problem upay todage


माझ्या सर्व विषय लिखाणांवर अनेक तोडगे दिले आहेत.  त्यात ' ॐ नमो विष्णवे नमः '  या मंत्राचा जप व नागकेशराची उपासना फार प्रभावी आहे असा अनेक साधकांचा अनुभव आहे.  

धनदा यंत्राचा अनेक नोकरवर्ग साधकांना अनुभव आला आहे.  या ठिकाणी नोकरी टिकवण्यासाठी एक अनुभुत तोडगा सांगतो.  यासाठी तुम्हाला तुमच्या सरकारी नोकरी अथवा कायमस्वरुपी नोकरी असलेल्या मित्राकडुन ' कृष्णपक्ष अष्टमी ' दिवशी १ रुपयाचे नाणे ; परत करण्याच्या उद्दीष्टाने घ्यावयाचे आहे. जे नाणे तुमचे नोकरीवरील संकट निरसन होताच त्या मित्रास परत करावे.अतिरिक्त काळ नाणे जवळ बाळगु नये.


असे नाणे घरात देवार्यात जपून ठेवावे. गुरुपुष्पामृताच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे.  ही उपासना सूर्योदयाच्या आत संपली पाहिजे.  त्या दिवशी स्नान  करून एखाद्या छोट्या वाटीत अगर तबकडीत ते नाणे देवासमोर ठेवावे. त्याला पंचामृती स्नान घालून ते परत वाटीत अगर तबकडीत ते देवासमोर ठेवावे.  स्नान घालताना अघमर्षण सूक्त म्हणता आले तर अवश्य म्हणावे,  येत नसेल तर " ॐ नमो विष्णवे नमः " या मंत्राचा दररोज जप करावा.  नंतर नाण्याला गंध, फूल, हळदकुंकू वगैरे उपचार नेहमीसारखे करावेत.  धूपदीप ओवाळावा, नंतर ते नाणे उजव्या हातात घेऊन डोळे मिटावेत व " ॐ नमो विष्णवे नमः "  हा मंत्र 108 वेळा दररोज जपावा.  


जप करताना शक्य तो मन एकाग्र करावे व मंत्राकडे लक्ष ठेवावे.  जप संपल्यावर नाण्याला साळीच्या लाह्या व बत्ताशाचा नैवेद्य दाखवावा.  नाणे एका पिवळ्या कागदात ठेवून त्याची घट्ट पुडी करावी व तीही पिवळ्या कापडात  घट्ट शिवून पैशाच्या पाकिटात अथवा आँफिसच्या वरच्या ड्रोवरमधे ठेवावी.  


जो पर्यंत पुडी वरील ठिकाणी आहे तोपर्यंत नोकरी टिकून राहील. यासाठी आठवड्यातुन दर रविवारी विष्णुसहस्त्रनामाचा पाठ अवश्य करावा. त्यावेळी ड्रोवरमधील पुडी देवार्यात ठेवावी. हा अगदी सोपा व प्रत्येक व्यक्तीने करून पाहण्यासारखा तोडगा आहे. परमेश्वर तुमच्या उपजीविकेचे रक्षण करो. हि प्रार्थना !




ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!

वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्

संसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना ! - Solve Your Problems Now !

भौतिक व्यवहारात आध्यात्मिक प्रक्षेपण कसे कराल ? त्याचा फायदा काय ?

व्यवहारीक भगवद्गीता काय आहे ? जीवनात विनियोग करण्याचे फायदे काय आहेत ?





Post a Comment

0 Comments