भगवान श्रीरामचंद्र देवतेची समुळ वंशावली कशी आहे ते नक्की समजुन घ्या • १. ब्रम्हदेवातुन मरीचि उत्पन्न झाले.
 • २. मरीचि चे पुत्र कश्यप ऋषी
 • ३. कश्यप चे पुत्र विवस्वान
 • ४. विवस्वान चे वैवस्वत मनु तेव्हा वैवस्वत मनु समयी जल प्रलय झाला होता.
 • ५. वैवस्वत मनुचे दहा पुत्र झाले त्यापैकी एकाचे नाव इक्ष्वाकु होत. इक्ष्वाकु ने अयोध्या राजधानी बनवली तशाप्रकारे इक्ष्वाकु कुळाची स्थापना झाली.

 • ६. इक्ष्वाकु चे पुत्र कुक्षि
 • ७. कुक्षिच्या मुलाचे नाव विकुक्षि
 • ८. विकुक्षि चा पुत्र बाण
 • ९. बाण चा मुलगा अनरण्य
 • १०. अनरण्य पुत्र पृथु झाले
 • ११. पृथुनीं त्रिशंकु नामक पुत्राला जन्म दिला
 • १२. त्रिशंकु चे पुत्र धूंधुमार
 • १३. धूंधुमार चा मुलगा यवनाश्व
 • १४. युवनाश्व चे पुत्र मान्धाता
 • १५. मान्धाता ने सुसन्धिला जन्माला घातले
 • १६. सुसन्धिला दोन मुले झाली धृवसंधि व प्रसेनजित
 • १७. धृवसंधिचे पुत्र राजा भरत
 • १८. भरत चे पुत्र असित
 • १९. असित चा पुत्र सगर
 • २०. सगरपुत्र असमंज
 • २१. असमंजचे चिरंजीव अंशुमान 
 • २२. अंशुमानचे पुत्र दिलीप
 • २३. दिलीप चे चिरंजीव महात्मा भागीरथ. भागीरथानेच आकाशगंगा पृथ्वीवर उतरवली. भागीरथाचे चिरंजीव ककीत्स्थ होते.
 • २४. ककुत्स्थचे पुत्र रघु.. हे अत्यंत पराक्रमी तेजस्वी सम्राट असल्याने वंशाच नामकरण रघुवंश झाले. तेव्हापासुन प्रभु श्रीरामकुळाला रघुकुल म्हणतात
 • २५. रघुचे पुत्र प्रवृद्ध
 • २६. प्रवृद्धचे पुत्र शंखण
 • २७. शंखणचे चिरंजीव सुदर्शन
 • २८. सुदर्शन पुत्र अग्निवर्ण
 • २९. अग्निवर्ण पुत्र शीघ्रग
 • ३०. शीघ्रगने मरुला जन्म दिला
 • ३१. मरुचे पुत्र प्रशुश्रुक होते
 • ३२. प्रशुश्रुक चे चिरंजीव अम्बरीष
 • ३३. अम्बरीष पुत्र नहुष
 • ३४. नहुष पुत्र ययाति
 • ३५. ययाति चा मुलगा नाभाग
 • ३६. नाभाग चिरंजीव अज
 • ३७. अज पुत्र राजा दशरथ
 • ३८. राजा दशरथाची चार मुले राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न 


ब्रम्हदेवाच्या ३९ वी पिढी श्री राम प्रभुचा जन्म आहे. 
जास्तीतजास्त हिंदु धार्मिकांना याबद्दल परिपुर्ण ज्ञान असले पाहिजे


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...All about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !


Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code BelowPost a Comment

0 Comments