संत कान्होपात्रा Sant Kanhopatra - Shree Swami Samarth


 'पांढुरंग माझा स्विकार करील काय?' त्यावर वारकरी म्हणाला, 'विठ्ठला जवळ जाती, पंथ स्त्री-पुरुष हा भेद नाही'.


 संत कान्होपात्रा ही मंगळवेढ्याच्या शामा नायकिणीची मुलगी. तिचा जन्म १४६८ मध्ये झाला. ती अत्यंत लावण्यवती होती. पण ती प्रपंचात कधीच रमली नाही. तिला पंढरीच्या पांडुरंगाची ओढ होती.

एके दिवशी वारकरी टाळ मृदुंगाच्या घोषात पंढरपूरला जात असतांना तिने पाहिले. ती पुढे गेली व दंडवत करुन त्या वारकरीच्या म्होरक्याला म्हणाली, 'मला आपल्या सोबत पंढरपूरला येता येईल काय? तो पांढुरंग माझा स्विकार करील काय?' त्यावर वारकरी म्हणाला, 'विठ्ठला जवळ जाती, पंथ स्त्री-पुरुष हा भेद नाही' तेव्हा कान्होपात्रा आईची संमती घेऊन पंढरपूरला वारकर्यांच्या सोबत पायी दिंडीत चालू लागली. पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन होताच तिला परमानंद झाला. भक्तीसूखाने ती मोहरुन गेली. एव्हाना कान्होपात्रेच्या लावण्याची बातमी बिदर बादशहाच्या कानावर गेली. त्याने कान्होपात्रेस बिदरला आणण्यासाठी शिपाई पाठविले.

ही बातमी कान्होपात्रास समजताच ती पांडुरंगाच्या देवळात जाऊन त्यांना आळवू लागली ती देहभान विसरुन पांडुरंगाचे भजन गात असतानाच शिपाई तेथे पोहचले ते मंदिराच्या महाव्दाराशी आले. तेथे कान्होपात्रेस सोबत येण्याबाबत बिदरच्या बादशहाचा फतवा तिला दाखवला. काहीच इलाज नाही हे बघून ती शिपायांना म्हणाली, 'मी पंढरीनाथाचा निरोप घेऊन येते, तोवर तुम्ही थांबा' कान्होपात्रा पांडुरंगाच्या पायावर डोके ठेऊन आकांत करु लागली. तिने पंढरीचा धावा केला, टाहो फोडला. त्याचवेळी तिची प्राणज्योत पांडुरंगात विलीन झाली. हे सर्व बडव्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. शिपाई परत गेले त्यांनी बादशहाला सर्व कथा सांगितली. बादशहा स्वतः पंढरपूरला आला विठ्ठलाचे दर्शन घेतले. देहभान हरपून तो पांडुरंगाला अनन्य शरण गेला.

अशा या संत कान्होपात्राची समाधी पांडुरंगाच्या देवळाच्या दक्षिण व्दारी असून तेथे तरटीचा वृक्ष उगवला आहे.

                       * सुविचार *

        अहंकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दुःख आहे.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...








Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !

Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below

Post a Comment

0 Comments

0