संत श्री परीसा भागवत Sant Shree Parisa Bhagvat - Shree Swami Samarth


श्री क्षेत्र पंढरपूर येथे एक ब्राह्मण रहात असे. त्याचे नाव होते भागवत. तो रुक्मिणी भक्ती करत असे. त्याच्या त्या भक्तीवर प्रसन्न होऊन रुक्मिणी मातेने त्याला एक परिस दिला तेव्हापासून तो परीसा भागवत नावाने ओळखला जाऊ लागला.


रूक्मिणी मातेच्या कृपेने तो सोन्याची लंका पाहाण्यास गेला असता तेथे संत नामदेवाचे किर्तन विशभिबणाच्या वाड्यात सुरु होते. कीर्तनात नामदेव महाराज सांगत होते की, " जे पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त आहेत त्यांना या भुतलावर अशक्य असे काहीही नाही." त्यांना नामदेव माहात्म्य कळले व मातेच्याच कृपेने लगेच पंढरपुरात आले. तेथे त्यांचे पुराण सुरु असताना नामदेव महाराज उपस्थित होते. ते म्हणाले, "काल लंकेत विभिषणासारख्या महान रामभक्ताचे दर्शन न घेता, नमस्कार न करताच आपण परत कसे आलात. ?" ते ऐकुन भागवत वरमले, "त्यांनी रुक्मिणी मातेचा धावा केला असता ती प्रकट झाली. तेव्हा परीसने विठ्ठल दर्शन घडवण्याची विनंती केली. तेव्हा माता म्हणाली," ते माझ्या हातात नाही, त्या करीता तुला नामदेवानांच शरण जावं लागेल. परंतु त्या करीता तुळला तुझ्या अहं चा त्याग करावा लागेल.

तेव्हा ते नामदेवांना शरण गेले. त्याच्या दर्शानाने व पादस्पर्शाने परिसा भागवताला प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडले व तो पांडुरंग त्याच्या ह्दयात स्थिरावला.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...






Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !

Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below

Post a Comment

0 Comments