श्री नारायण महाराज गोंदेकर


ज्योतिषीशास्त्राचा यांचा गाढा अभ्यास होता. उत्कृष्ट ज्योतिष म्हणून त्यांचे नाव होते. पण त्यांनी तपश्चर्या व गुरुसेवेला प्राधान्य दिले व गुरुकृपेचा प्रसाद मिळवला.


श्री नारायण महाराज यांचे पुर्ण नाव श्री नारायण बळवंत नागले होते. त्यांचा जनौम कुलाबा जिल्ह्यातील मुरुड या गावी झाला. यांचे माता पिता सात्विक व परमभक्त होते.

शाळेत असताना नारायण महाराज अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांच्या वडीलांच्या अचानक निधनामुळे त्यांचे बालपण व शिक्षण आत्याच्या घरी झाले. दिवसेंदिवस ते अधिकाधिक बुद्धिमान होऊ लागले. पण त्यांच्या मातेचेही अचानक निधन झाले. त्यांना शिक्षण थांबवावे लागले. पोट भरण्यासाठी ते त्यांच्या भावासह मुंबईत आले. एके ठिकाणी त्यांनी हिशेब लिहीण्याचे काम मिळवले. भावाला त्यांनी त्या कामात तरबेज केले व स्वतः पुण्यात आले.

पुण्याहुन अधुनमधुन चिंचवडला जात. तिथे श्री मोरयाची सेवा करीत. भजन किर्तन करत. एके दिवशी त्यांना गणपतीचा साक्षात्कार झाला. देवाच्या कृपेनेच त्यांना श्री श्री कृष्णानंद गुरु म्हणुन मिळाले. त्यांचे कडुन त्यांना गुरुमंत्र मिळाला.

ज्योतिषीशास्त्राचा यांचा गाढा अभ्यास होता. उत्कृष्ट ज्योतिष म्हणून त्यांचे नाव होते. पण त्यांनी तपश्चर्या व गुरुसेवेला प्राधान्य दिले व गुरुकृपेचा प्रसाद मिळवला. त्यांच्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे दिवसातील थोडा वेळ गणेश मंत्राचा ज करत व बाकीचा दिवस विठ्ठलाचे चिंतन करत असे. नाममात्र आहार ते या काळात घेत असत. तरी देखील त्यांच्या मनाचे समाधान होत नव्हते. देवदर्शन होत नाही म्हणुन त्यांना खंत होती. त्या नादातच एके दिवशी त्यांनी खांबाला डोके आपटले व त्यांची शुद्ध हरपली. त्या बेशुद्ध अवस्थेत साक्षात विठ्ठलाने दर्शन दिले व बुक्का कपाळाला लावला. प्रेमाने हाथ फिरवला व मनसोक्त दर्शन दिले. तेव्हा त्यांचे समाधान झाले व पुढील कामाला लागले. त्यांनी दौंडजवळ विठ्ठल मंदिर व स्वावलंबी शाळेची स्थापना केली, गणेश व विठ्ठल नाम घेताघेता ज्ञानेश्वरीचाही प्रसार केला. सरते शेवटी श्रीगोंद्याला जाऊन गुरुगृही स्थायिक झाले तेथेच विठ्ठल विठ्ठल मंत्र उच्चारीत समाधीस्थ झाले.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments