संत ताई महाराज


"जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती" असे म्हटल्या जाते. खरे तर वारुताईंचा जन्म त्याकरीताच होता. म्हणूनच विधात्यानेच त्यांचे पाश एक एक करुन मोकळे केले. वयाच्या केवळ तेराव्या वर्षीच वैधव्यपण नशीबी आले! वारुताई आता विधवा म्हणून वावरु लागल्या.

   संत श्री ताई महाराजांचा जन्म श्रावण व प्रतिपदा शके १८०१ म्हणजेच रविवार दि. ३.८.१८७९ या दिवशी बडोदा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोपाळराव गुर्जर. ताई महाराज म्हणजे त्यांचे दुसरे अपत्य. त्यांना एकूण सहा अपत्ये होती. 

ताई महाराजांचे बालपणचे पाळण्यांतील नाव वाराणसी, परंतु प्रेमाणे सर्व वारु म्हणत असत. तत्कालीन रितीरिवाजानुसार त्यांचा विवाह बालपणीच वयाच्या केवळ दहाव्या वर्षी झाला व त्या वारुच्या वारुताई कागलकर झाल्या.
   "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती" असे म्हटल्या जाते. खरे तर वारुताईंचा जन्म त्याकरीताच होता. म्हणूनच विधात्यानेच त्यांचे पाश एक एक करुन मोकळे केले. वयाच्या केवळ तेराव्या वर्षीच वैधव्यपण नशीबी आले! वारुताई आता विधवा म्हणून वावरु लागल्या. कुठे करुणा तर कुठे उपक्षेचा विषय ठरु लागल्या. पण ही सर्व ईश्वरी योजना समजूनच त्यांनी आपले जवळ शोकाला थारा दिला नाही. 

बालपणापासूनच श्रीकृष्णाची भक्ती मनात जागृत होती. ती आता अधीक उमलू फुलू लागली. सोबत सासू-सासर्यांची सेवा करीत असत. त्यांच्या सेवाभावावर प्रसन्न होऊन आजारी सासू इहलोक सोडतांना वारुताईंना त्यांची कृष्णभक्ती मीराताई प्रमाणेच फलदायी होईल असा मनापासून आशिर्वाद दिला. एकेक पाश कमी कमी होत होता. तशातच एक लहान नणंद, दीर आदि सार्यांचे देहावसान. वारुताईंच्या वयाच्या तेरा ते सतरा या कालावधीत झाले. 

   आता मात्र वारुताई पुर्णपणे मोकळ्या झाल्या होत्या. त्यांचे प्रपंचातून मन अगदी वीटून गेले होते. कृष्णभेटीची तळमळ त्यांना लागली होती. वयाच्या विसाव्या वर्षी सासरे बुवांचे बरोबर काशी यात्रा घडली तेथेच गंगा स्नान करुन गुरु रामचंद्राप्रती वृत्ती स्थिर झाली. त्या सद्गुरु कडून अनुग्रहित झाल्या. "जेव्हा स्मरण तेव्हा दर्शन" असे सद्गुरुंचे शब्द कानावर पडले. त्यांनी सद्गुरुंचा निरोप घेतला. प्रकृती अस्वस्थामुळे त्या माहेरी येऊन राहिल्या. त्यावेळीच मातेचा वियोग त्यांना झाला. त्यावेळी त्या अमरावती येथे बंधूच्या घरीच रहात असत.

   माता वियोगानंतर मात्र त्यांचे ठायी प्रखर असे वैराग्य निर्माण झाले व बंधूच्या प्रपंचाला आपले जगणे त्यांना नकोसे झाले. त्यांनी अमरावतीतच अंबापेठेत पिंपळे यांचे वाड्यांत एक लहानशी खोली घेऊन आपला परमार्थभिमुख प्रपंच थाटला. दिवसभर सद्ग्रंथांचे वाचन, कृष्णभक्ती व सद्गुरुंचे चिंतन हेच त्यांच्या त्या प्रपंचातील सगे सोयरे झालेत. त्या सदैव भजनांत लीन असत. मधूर आवाज ऐकून जवळपासाची मंडळी भजनाला येऊन बसत. आता ती खोली त्या गर्दीला समावून घेण्यास अपात्र ठरली. म्हणून भगवंतानेच त्यांच्या भजनाची व्यवस्था जवळीलच श्री राम मंदिरात केली. 

दर एकादशी, कृष्ण जन्माष्टमी आदि प्रसंगी त्या आता किर्तन करू लागल्या. त्यांच्या कृष्णभक्तीचा परिमल आसमंतात पसरु लागला. भाविक त्यांच्या कडे आकर्षिल्या जाऊ लागले. आता भाविकांनाच वाटू लागले की वेगळे असे भगवान श्रीकृष्णाचे मंदिर बांधावे. "सत्यसंकल्पाचा दाता नारायण " त्यानुसार जवळच जागा घेतल्या गेली. सुंदर, टुमदार मंदिर आकार घेऊ लागले. सभोवताली मोकळा परिसर, आवश्यक तेवढया खोल्या व सेवेकरी मंडळीस रहाण्यासाठी घरेही बांधल्या गेली. हे सर्व घडत असतांना ताई महाराज मात्र त्यावेळी नाशिक येथे पीणधीश्वर श्रीमत् शंकराचार्य डॉ. कुर्तकोरी यांचे कडे अव्दैत तत्वज्ञानाचे धडे घेत होत्या. तेथुन भक्तांनी आग्रहाने अमरावतीला आणले. असेच शेगांवीच्या गजानन महाराजांना गोपाळ बुटींनी नागपुरास नेले होते. पण इकडे शेगांव सुने सुने दिसू लागले. पाटील मंडळींच्या मुखावर तेज उरले नव्हते. म्हणून ते सर्व भक्तगण नागपूरला जाऊन धडकले. गोपाळ बुटींनी मात्र भोजन करुन महाराजांना शेगांवला घेऊन जाण्याची परवानगी दिली. तसेच अमरावतीकरांचे झाले होते. म्हणूनच ते सर्व नाशिकला गेलेत व सर्व परिस्थिती गुरुतुल्य डॉ. कुर्तकोटी यांना सांगितली. त्यांच्याच आज्ञेवरुन व लोकेच्छेपुढे ताई महाराज नतमस्क झाल्यात व मंदिराचा स्विकार केला. तेथे त्यांना गोपालकृष्णाची मुर्ती शंकराचार्यांनी भेट म्हणून दिली. तीच सुबक मनोहारी मूर्ती अश्विन वद्य ५ शके १८५७ दि. १६ अॉक्टोबर १९३५ मध्ये त्या नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठित झाली.
   
सद्गुरुंच्या कृपेने दृढ, अपरिवर्तनीय अपरोक्षानुभूती प्राप्त झाली. जीवनातील सर्व अंधःकार नाहीसा झाला. मुखमंडल तेजोमय झाले. भक्त गणांना आनंदाची दिवाळी वाटू लागली. त्यांनी तीर्थाटन केले. आसेतू हिमाचल प्रवास केला. यज्ञयागादिक केले. मुखातून ओवीबध्द रचना बाहेर पडू लागल्या अनेक पुस्तकांचे लिखाण हातून घडले. त्यांच्या बोधामृताने भक्तगण व शिष्यमंडळी तृप्त होत असत. अशातच एके दिवशी म्हणजे आषाढ व अष्टमी शके १८६३ गुरुवार दि. ३.८.१९६१ रोजी आपल्या पार्थिवाचा त्याग करून त्यांचे चैतन्य श्रीकृष्णरुपी विलीन झाले.

(नोट - त्यांची समाधी अमरावती येथे अंबापेठेत ताई महाराज यांचे गोपालकृष्ण मंदिरात आहे. जरुर भेट द्या.)

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments